प्रतारणा ... भाग - 40

"तुम्ही?" तिने पटकन मागे वळून खोचलेला पदर सरळ करून समोरूनही झाकून घेतले."हो .. इंद्राचा फोन आला होता थोडावेळापूर्वी, तुझ्या शी बोलायचं आहे तिला ! तू आल्यापासून त्यांना फोन नाही केलास ना !" स्वप्निल तिच्या हातात मोबाइल देत म्हणाला." माझ्याकडे कुठे मोबाइल आहे आणि सर्व कामात होते म्हणून मग मी मागितला नाही ."" ठीक आहे. बोलून घे !" स्वप्निल बोलून निघून गेला.तिने फोन लावून सर्वांसोबत बोलून फोन कट केला. तेव्हा तिला मोबाईल वॉलवर त्या दोघांचा एंगेजमेंट च्या फोटो पैकी एक फोटो लावलेला होता. दोघी एकमेकांच्या डोळ्यांत पाहत असतांनाचे. तिला तो क्षण आठवला आणि चेहर्‍यावर गोड हसू झळकले.

प्रतारणा ..


भाग - 40


     स्वप्निल अंघोळ करून आवरून आला पण विजयाला थोडा वेळ लागला. तो स्वप्नालीच्या रुममध्ये आला. तेव्हा ती नुकतीच शॉवर घेऊन आलेली. चेहऱ्यावर कुठेही मेकअप नव्हता. मनाचा ठाव घेणारे काळेभोर डोळे, लांब दाटसर पापण्या त्यांच्या उघडझाप करण्याने समोरचा त्या डोळ्यात हरवून जाईल इतके सुंदर बोलके डोळे, कपाळावर छोटी टिकली आणि भांगेत कुंकू लावलेलं, गळ्यात मंगळसुत्र तिचे हे साधे रुप पाहून त्याच्या हृदयाची गती जलद होऊ लागली. ती ड्रेसिंग टेबल समोर उभी राहून टॉवेलने केस पुसत होती. स्वप्निल तिला दरवाज्यातून पाहत होता. मोरपंखी रंगाची प्लेन साडी त्याला मॅचिंग ब्लाऊज पाठीमागचा गळा तिला थोडा मोठा वाटत होता म्हणून तिने पाठीमागून पदर घेऊन कमरेला खोचून ती केस पुसत त्याला पाठमोरी उभी होती. साडी खोचल्यामुळे तिची नाजुक गोरी कंबर आणि थोडा पोटाचा भाग दिसत होता. तिने त्या केसांना झटका देऊन मागे टाकले . त्यातील काही तुषार त्याच्या चेहर्‍यावर पडले. तिने मागे वळून पाहिले तर तो समोर उभा होता. 

"तुम्ही?" तिने पटकन मागे वळून खोचलेला पदर सरळ करून समोरूनही झाकून घेतले.

"हो .. इंद्राचा फोन आला होता थोडावेळापूर्वी, तुझ्या शी बोलायचं आहे तिला ! तू आल्यापासून त्यांना फोन नाही केलास ना !" स्वप्निल तिच्या हातात मोबाइल देत म्हणाला.

" माझ्याकडे कुठे मोबाइल आहे आणि सर्व कामात होते म्हणून मग मी मागितला नाही ."

" ठीक आहे. बोलून घे !" स्वप्निल बोलून निघून गेला.
तिने फोन लावून सर्वांसोबत बोलून फोन कट केला. तेव्हा तिला मोबाईल वॉलवर त्या दोघांचा एंगेजमेंट च्या फोटो पैकी एक फोटो लावलेला होता. दोघी एकमेकांच्या डोळ्यांत पाहत असतांनाचे. तिला तो क्षण आठवला आणि चेहर्‍यावर गोड हसू झळकले.
  
       केस व्यवस्थित करून ती बाहेर आली. 

"चल नाश्ता करून घे ! मग आपल्याला दुपारी निघायचं आहे लॉनवर, तिकडेच ब्युटिशियन येणार आहेत ." सुप्रिया.

 " सर्वांचा नाश्ता झाला का?आपण सोबत बसूया ना ! स्वीटू कुठे आहे?"

" सर्वांचा की स्वप्निलचा ?" सुप्रिया तिला चिडवत म्हणाली .

 "आई ऽ ." ती लाजतच म्हणाली.

"सर्वांचा झाला आहे. स्वप्निलचा ही ! तू ,मी आणि स्वीटू बाकी आहेत पण ती बाहेर गेली आहे . येईल इतक्यातच ! तू सुरू कर ."

" मी थांबते स्वीटू साठी !"

"नको थांबू मी आलेच वहिनी फ्रेश होऊन !" ती आत येत म्हणाली तशीच फ्रेश व्हायला गेली. फ्रेश होऊन ती नाश्ता करायला बसली. 

नाश्ता करून झाला तसे तिला सुप्रियाने आराम करायला पाठवले. स्वप्नाली आणि ती रुममध्ये निघून गेली. विजया बेडवर आडवी झाली आणि लगेचच तिचा डोळा लागला. स्वप्निल त्याचा मोबाईल घ्यायला आला तेव्हा ती त्याला झोपलेली दिसली.

"स्वीटू काय झालं तब्बेत बरी नाहीये का?" त्याने विजयाकडे डोळ्यांनी खूण करून विचारले

" तसं काही नाही बरी आहे ती, काल ना ती झोपलीच नव्हती. सकाळी चारला का पाचला झोपली. आता तिने डोळे मिटून घेतले तर तिला झोप लागली. झोपू दे तिला थोडावेळा !" ती हळू दबक्या आवाजात सांगत होती.

'म्हणजे ती रात्री मी आलो तेव्हा जागीच होती. !' तो मनातच बोलत होता.

 "मग मी कुठे उठवतोय तिला ! " बोलतांना त्याचा आवाज हलकासा वाढला .

"दादा हळू बोल ना उठेल ना ती ! बरं मी आलेच , तू जातांना दार ओढून घे !" आणि ती रुमच्या बाहेर पडली. त्याने मोबाईल आजूबाजूला पाहिलं तर मोबाईल तिच्या उशीखाली दिसला. तो बेडवर गुडघे टेकवून तिच्या उशी जवळ आला, त्याने हलकेच उशीखाली मोबाईल घ्यायला हात घातला तशी ती त्या बाजुने टर्न झाली. डावा हात चेहऱ्याखाली आणि उजवा हात त्याच्या हातावर ठेवला. ती गाढ झोपेत होती. त्याचा हात घेऊन तिने तिच्या चेहऱ्याखाली ठेवला. आणि त्यावर गाल हलके चोळू लागली. तिच्या स्पर्शाने त्याच्या शरिरात गोड स्पंदने उठत होती .झोपेतही तिच्या चेहर्‍यावर स्माईल आली. तो एकदम तिच्या जवळ होता . तो तिला एकटक न्याहळत होता. गोरीपान नितळ कांती आणि त्यावर आलेले नव्या नवरीचे तेज दिसत होते. तिचे गरम श्वास त्याच्या हाताला जाणवत होते. ती तशीच साडीवर झोपली होती. तिचे पाय दिसत होते . नाजुक पाय , पायांवर मेंहदी लावलेली त्याच पायात पैंजण, जोडवी सौभाग्य अलंकार घातले होते . पायांच्या बोटातील नखांना नेलपेन्ट लावलेल्या मुळे अधिकच सुंदर दिसत होते. त्याच्या मनात तिच्या विषयी भावना जागृत होत होत्या. त्याने अलगद हात सोडवून मोबाइल काढून घेऊन पटकन रुमच्या बाहेर आला. बाहेर भिंतीला टेकून डोळे मिटून 'हुश्शऽऽ' केले.


"काय झालं ? स्वप्नाली त्याच्या समोर उभी राहिली .

"का काय झालं ? तो भोळपणाचा आव आणत तिलाच म्हणाला.

"तेच विचारतेय मी, काय झालं ? असा आलास ! सुस्कारा सोडतोय."

"ते होय ! काही नाही. मी मोबाइल शोधत होतो. मग सापडला तिच्या उशीखाली होता. तिची बाजूला होण्याची वाट बघत होतो ती बाजूला झाली आणि मी पटकन मोबाइल काढून बाहेर आलो . म्हणून !" दुसरे काय सांगणार होता तो  त्याने अर्धसत्यच सांगितले .

"हो का , बरं !"
 ती आत गेली आणि आतून दार लावून घेतलं .


थोड्यावेळाने सर्वांनी जेवण करून ते सर्व लॉनवर निघाले. आल्यावर एका रुममध्ये ब्युटिशियन विजयाला तयार करत होती. विजयाने गोल्डन क्रिम कलरची कांजीवरम साडी, केसांचा अंबाडा त्यावर गजरा माळलेला, भांगेत ठसठशीत कुंकू लावलेला. त्यावर साजेसा मेकअप आणि तिच्या आकर्षित ओठांवर चेरी रेड लिपस्टिक, गळ्याशी एक सिम्पल नेकलेस आणि लांब काळ मण्यांच स्वप्निलच्या नावाचे मंगळसुत्र. ती रेडी झाली तशी स्वप्नाली आली. तिही रेडी होत होती.

"वहिनुळी काय दिसतेस तू ऽऽ , आज माझ्या दादा चं खरं दिसत नाही ." ती चेहरा पाडत म्हणाली.

"इतकी खराब दिसतेय मी,अहो ताई हे पुसा हो ! खूप जास्तच फासलयं माझ्या चेहर्‍याला, कोणी नाहीच ओळखल मला तर .. ताई पुसा हो हे !" ती घाबरत त्या ब्युटिशियनला म्हणाली.

"वहिनी काही काय , अग इतकी सुंदर दिसतेस न तू दादाची नजर हटणारच नाही तुझ्यावरून ! " ती हसत म्हणाली.

" मी किती घाबराले स्वीटू !"

"झाले का रेडी." सुप्रिया आत येत म्हणाली.

"किती सुंदर दिसतेस विजू !"

" थॅक्यू आई." ती हसत म्हणाली. सुप्रियाने तिच्या आल्याबल्या घेतल्या आणि काजळाचं दिट तिच्या कानामागे लावले. 

"आई मी कशी दिसतेय ?"

"तू पण खूप सुंदर दिसतेस स्वीटू ." सुप्रिया तिला ही काळजाचा दिट लावत म्हणाली आणि निघून गेली.

स्वप्निल ही रेडी झाला होता. ब्लॅक कलरचा थ्री सुट त्यावर ब्रोच लावलेला, केस सेट केलेले. क्लीन 
सेव केलेला ,ओठाखालचा हनुवटीजवळचा तीळ उठून दिसत होता . सुप्रिया त्याच्या रुममध्ये गेली. त्यांच्याही आल्याबाल्या घेऊन त्याच्या कानामागे दिट लावला.

"काय आई हे मी काय पोरगी आहो का नजर लागायला?"


" पोरींनाच नाही पोरांनाही नजर लागते बरं का ! आणि दिसतोस तसा एखादा राजबिंडराजकुमार सारखा, ये बाबा सोड नाहितर माझीच नजर लागायची !"


" आईची तिच्या बाळाला नजर लागते का ! काहि ही बोलतेस !"

"चल लवकर ये खाली वेळ होतोय " ती तिथून निघून आली . इकडून स्वप्निल बाहेर पडला त्या रुममध्ये विजया येत होती . दोघांची नजरानजर झाली तिने खाली नजर झुकवली. तो मात्र एकसारखा तिच्याकडे पाहत दुसऱ्याच ठिकाणी गेला होता. स्वप्नाली ने त्याला गदागदा हलवले. ते सोबतच लॉनवर आले सगळे त्यांच्याकडे पाहून टाळ्यांनी स्वागत करत होते. ते स्टेजवर उभे राहिले.राहूल जवळचा उभा होता. काही काम आले तर तो तिथून बाहेर पडला . मित्र ,नातेवाईक ,आप्तेष्ट , एक एक करून त्यांच्या सुखी वैवाहिक जीवनाच्या शुभेच्छा देत होत्या. स्वप्निल एक एकांची ओळख करून देत होता. ती हसून मोठ्यांच्या पाया पडून बोलत होती. एक क्षण निवांत भेटला आणि तिची नजर समोर बसलेल्या चेअर कडे गेले तर समोर तिला इंद्रा दिसली . तिच्या चेहर्यावर मोठ्ठी स्माईल आली. इंद्रा रेड कलरच्या वनपिस मध्ये, हलकासा मेकअप , ब्राऊन डोळ्यांवर काजळ ,आयलायनर ,ओठांवर रेड लिपस्टिक लावलेली होती. आणि केस मोकळे सोडलेले . तिने इंद्राला जवळ येण्याची खूण केली तशी ती तिच्याकडे आली .

"कधी आलात तुम्ही? "

" वेळ झाला येऊन सोनु, रोहित, भाऊ, वेदू , बाकीचे कुठे आहेत?"

"महिला मंडळ तुझ्या सासूबाई सोबत त्या कोपऱ्यात आहे. आणि पुरुषी मंडळी ह्या कोपऱ्यात बसून गप्पा मारताय आणि बच्चे कंपनी तिकडे जेवणाच्या टेबलाकडे जाऊन कुणी जेवण करत आहे तर कुणी आईस्क्रीम खात आहे. इंद्रा डोळ्यांनी इशारा करून सांगत होती. राहूल तिला केव्हापासून एकसारखा न्याहळत होता. 

" सिम्पली गोजेस ! " राहूल पुटपुटला. राहूला बाहेर त्यांची गाडी दिसली तसा तो धावत स्टेज कडे आला. 


क्रमश ...

©® धनदिपा


🎭 Series Post

View all