Feb 26, 2024
नारीवादी

प्रतारणा .. भाग - 39

Read Later
प्रतारणा .. भाग - 39

प्रतारणा ..


भाग - 39


            पाठवणीची वेळ आली स्वप्निल आणि विजयाने सर्वांना वाकून पाया पडल्या. विजया वैदेहीच्या गळ्यात पडून हुंदके देऊन रडत होती. ती सर्वांना भेटत होती. आजी, मामी सर्वांना मिठी मारून रडत होती. ती तिच्या बाबाजवळ (इंदर) आली. त्यांच्या पाया पडायला वाकली पण इंदरने तिला उठवून घेतले, पायांना हात सुद्धा लावू दिला नाही . घरातील लक्ष्मीनी मुलींनी पाया पडू नये असे त्यांचे म्हणणे होते त्यांनी कोणत्याही मुलीला पाया पडू दिल्या नव्हत्या.


" बाबा , आता तरी पायांना स्पर्श करू द्या?" विजया म्हणाली अन् इंदरच्या मिठीत जाऊन रडू लागली. शेवटी बापाचं काळीज त्यांचे ही डोळे पाणावले. विजयाच्या डोक्यावर हात ठेवून "खुष राहा , काळजी घे ! सांभाळ स्वतःला आणि सगळ्यांनाही असा आशीर्वाद दिला . ती आजी , मामा ,मामी , मावशी काका,काकू , आत्या सर्वांना भेटली त्यावेळी सर्वांचे डोळे पाणावले होते. इंद्रा तर बाहेर आलीच नाही कुठे तरी जाऊन बसली? ती चेहऱ्यावर कोणतेच भाव न दाखवता तिच्या समोर आली पण तिचे डोळे आणि चेहरा सर्व काही सांगून गेला. तिचे रडून लाल झालेले नाक डोळे पाहून विजयाने तिला हात पसवरून जवळ येण्याचा इशारा केला तशी ती धावतच तिच्या मिठीत शिरली. मोठेपणाचा आव आणलेला चेहरा गळून पडला अन् लहान मुलीसारखी ती रडू लागली. तिला पाहून सोनू ने भोकाड पसरवलं त्याने विजयाचा पदर घट्ट पकडून घेतला. विजयाने खाली वाकून त्याला मिठीत घेऊन त्याच्या कपाळावर गालावर पप्पी दिली तर भाऊसाहेब जाऊ देत नव्हते.

" ताई, जाऊ नको !"ही एकच रट लावली. इंद्राने त्याला कडेवर उचलून त्याची समजूत काढली. वेदू आणि सिद्धू ने डोळ्यांवर गॉगल लावून ठेवला होता. ते त्यांचे आसवे लपवत होते. विजयाला कळलं त्यांनी का लावले आहेत .

" गॉगल लावून डोळ्यातील आसवे लपवू नका ?" ती दोघांना मिठी मारत म्हणाली.

"चकऽऽ आम्ही नाही रडत " वेदांत म्हणाला. तिने वेदांत च्या डोळ्यांवर चा गॉगल काढला. तर तो ही रडत होता. तिने त्याला मिठी मारली.सुप्रिया स्वप्नालीने विजयला धरून गाडीत बसवले.

"ताई , विजयाकडून काही चुकले तर मुलगी समजून माफ करा तिला ! " वैदेही हात जोडत म्हणाली .

 "अहो वहिनी , ती आता माझीच मुलगी आहे तुम्ही निश्चिंत राहा !" सुप्रिया वैदेहीला आश्वस्त करत म्हणाली. त्यांची गाडी निघाली. काही वेळातच ते पोहचले. दारी मांडव घातलेला, घर फुलांनी लाईटांनी झगमगून निघालेल. स्वप्नालीने गाडीचे दार उघडून तिला हात दिला. स्वप्नालीचा हात पकडून अलगद उतरली. आज ती पहिल्यांदा तिच सासर पाहत होती. मोठं घर काय तो तर बंगलाच होता. तिचं लक्ष वेधले ते तिथल्या गार्डनने , सुंदर रंगबेरंगी टवटवीत फुलांची बाग तयार केली होती. सुप्रियाने ताट घेऊन, त्यांचे औक्षण केले. उखणा घेऊन माप ओलांडून ती आत आली. देवाला नमस्कार करून , थोर मोठ्यांच्या पाया पडून तिला स्वप्नालीच्या रुममध्ये विश्रांती करायला पाठवले. 

गृहप्रवेश झाला, विजया स्वप्नालीच्या रुममध्ये तर स्वप्निल ही त्याच्या रुममध्ये गेला. फ्रेश होऊन तो बेडवर आडवा पडून विचार करून गालात हसत होता. तोच बाबांनी त्याला खाली बोलवून घेतले. बाबांनी त्याच्या हातात एक पाकीट दिले. ते पत्र वाचून त्यांच्या चेहऱ्यावर चे भाव झरझर बदलले आणि त्याला अत्यांनादित झाला . ते त्याचे जॉइनिंग लेटर होते . मुलाखत दिलेल्या कॉलेजमधून ते आले होते .


" सुनबाईचा पायगुण आल्या आल्या लगेच तुला हे लेटर मिळालं." संजयराव . सुप्रियाने ही त्यांच्या सूर मध्ये सुर मिसळला. देवापुढे साखर ठेऊन नतमस्तक झाला. 

" सुनबाईंना बोलवून सांगा ."

" ती फ्रेश होऊन आराम करू द्या तिला बाहेर आल्यावर बोलू. त्याच्या जाइनिंग लेटरचे" सुप्रिया

" अभिनंदन स्वप्निल , आता तर पार्टी झाली पाहिजे काका? " राहुल आत येत म्हणाला.

"हो नक्की." संजयराव .

तिची बॅग आतमध्ये आणली. सुप्रियाने तिला फ्रेश होऊन तिला चेंज करायला सांगितले. स्वप्नालीने भरजरीत दागिने काढायला मदत केली. ती फ्रेश होऊन ती हलकीशी फेंट स्काय ब्ल्यू कलरची साडी नेसून ती बाहेर आली.


"वाह ! वहिनी किती सुंदर दिसतेस तू, अश्या सिम्पल साडीत ही ! " हाताचा मोर करून दाखवले .तिने विजयाला मिठी मारली. 
विजयाने प्रेमाने तिच्या गालावर हात फिरवला.

"मी नाही तू सुंदर दिसतेस एकदम स्वीट सारखी ! " तिचे दोन्ही गाल ओढत म्हणाली.

"पण तुझ्यासारखी नाही ना ऽऽ !"

"माझेपेक्षा कैकपटिने सुंदर आहेस . ज्यांचं मन सुंदर तेच सुंदर असता . बाह्यरंगावरून कोणी सुंदर ठरत नाही. समजलं बाळा ! "

"हो .. गं जशी की तू .." स्वप्नाली हसत म्हणाली.

"म्हणजे मला आज तू  खाली पाडायचं ठरवलं आहेस?"

" मी कशाला तूला पाडू ?"

"अगं मला तू हरभऱ्याच्या झाडावर चढवतेय तर मी खाली पडणार नाही का?"

 "तू खाली पडायला आली की दादा तुला दोन्ही हातांवर उचलून घेईल. " ती दात दाखवत म्हणाली .

"आणि ते मला घेऊन पडले तर त्यांना कोण उचलणार ?" दोघेही खळखळून हसायला लागले.


"वहिनी चल जेवण करून घेऊ !" 

" मला भूक नाही गं स्वीटी तू जेव बाळा ."

" जाऊ दे मी पण नाही जेवत ." ती चेहरा पाडत म्हणाली.

"चल खाली, आपण जेऊया !" तशी कळी खुलली.

 दोघेही खाली गेले. तिथे खांद्यावरून पदर घेऊन साडी आवरत खाली गेली.

 "आई मी काही मदत करू का? " विजयाने सुप्रियाला 
विचारले .

"आराम करायचा होता ना कशाला आलीस खाली . विजया काही करू नकोस, तुला आनंदाची बातमी सांगायची आहे ती म्हणजे स्वप्निल ने मुलाखत दिल्या होत्या नं त्यातील गर्व्हमेंट कॉलेजमधून अपॉइंटमेंट लेटर आले आहेत."

"खूप छान बातमी आहे आई ही तर !"

" हो ."

" तुझ्या हातानेच पेढे दे सर्वांना " सुप्रिया पेढे चा बॉक्स देत म्हणाली. तिने पहिला स्वप्नालीला भरवला नंतर सुप्रियाला , संजयला मग राहूल आला त्याला ही दिला. स्वप्निल च्या हातात दिला. हळूच त्याला ऐकू जाईल असेच \"अभिनंदन \" म्हणाली. 

"तुझे ही अभिनंदन !" म्हणून तो ही बाजूला झाला.

" माझे का करताय हे ?" तिला प्रश्न पडला. तो विचार बाजूला ठेवून ती स्वप्नाली सोबत जेवायला बसली. सर्व सोबत बसले होते. जेवण झाले तसे तिला सुप्रियाने रुममध्ये पाठवले. दुसऱ्या दिवशी सकाळी त्यांची हळद उतरवणार होते. रुममध्ये आल्यावर स्वप्नाली बेडवर पडल्या पडल्या झोपली पण विजयाला झोप येत नव्हती. सर्व वातावरण शांत होते. तिला तिथे नवीन जागा असल्याने झोप लागत नव्हती. ती गळ्यातील मंगळसुत्र हातात घेऊन पाहत होती. लग्न झालं , नाव बदललं, पूर्ण आयुष्य बदलले होते आजपासून. तेवढ्यात दरवाजा उघडला गेला आणि तिने डोळे मिटून घेतले. दरवाज्यातून स्वप्निल आत आला. दोघींच्या अंगावर ब्लॅकेट ओढून तिला दोन मिनट तिच्या झोपलेल्या शांत निरागस चेहऱ्याला पाहून तो त्याच्या रुममध्ये गेला. तिने डोळे उघडून पाहिले.
हुश्शऽ केले. तो असा अचानक आला तेव्हा किती हार्टबिट्स वाढले होते. तरीही गप डोळे बंद करून घेतले होते. ती स्वप्निलचा विचार करत होती.

"वहिनी तुला झोप नाही येत आहे का? बरं वाटतेय न तूला आठवण येतय का घरची ?"

" नाही . नवीन जागा आहे ना म्हणून .. तू झोप !"

"हूँऽऽ, होत असं , झोप नाही लागत पण तुला लवकर सवय होऊन जाईल. झोप आता उद्या हळद उतरायची आहे. " स्वप्नाली म्हणाली तसे विजयाने डोळे बंद करून घेतले. थोड्यावेळात ती झोपली.

तिला लवकरच जाग आली. तशी तिने ब्रश करून फ्रेश होऊन तिचं आवरून घेतल. तिने यलो कलरची सिम्पल प्रिंटेड साडी नेसून तयार झाली.


"वहिनी तू उठलीही आणि तयार झाली ही , झोपली होतीस की नाही?"

" गुड मॉर्निंग, हो .. मी तयार झाले. थोडी उशिरा झोप लागली आणि लवकरच जाग आली मग उठले." तिने हसून उत्तर दिले .

" गुड मॉर्निंग वहिनुळी मी पण आलेच फ्रेश होऊन . आपण सोबतच खाली जाऊ !"

दोघेही फ्रेश होऊन खाली आल्या.
थोड्यावेळात स्वप्निल ही सॅन्डो बनियान, नाईट पॅन्ट घालून आला. तेव्हा तिने एक क्षण पाहून खाली नजर केली. मग विजयाने त्याच्याकडे पाहणे टाळत होती. दोघींना अंगणात एकमेकांच्या समोर पाटावर बसवले. एका हाताने काकण सोडायला लावली. स्वप्नाली तिला चिअरअप करत होती . 

"लगेच पार्टी चेंज केलीस चिमणे ? " स्वप्निल म्हणाला .

"हो ." स्वप्नाली

"बघतोच तुला नंतर !"

"आता तू काकण सोडायचं त्याकडे लक्ष दे ."

 "बघ लगेच सोडतो मी !" स्वप्नालीने त्याला जीभ दाखवली.

पहिले तिने सोडवले तिचे लांब नखांमुळे लवकर सुटली. मग त्याने एका हाताने सोडवण्याचा प्रयत्न केला पण लवकर सुटत नव्हती. स्वप्नाली हसत होती. तिला हसताना पाहून विजयाच्या चेहर्‍यावर हलकेच हसू पसरले. त्याने लगेचच काकण सोडली.
मग त्यांच्या डोक्यावर परडी पकडली त्यात हळदकुंड टाकले. त्यातून त्यांच्या अंगावर पाणी ओतले . पाण्याचा जोर इतका होता की त्या जोराने तिचा पिन लावलेला पदर हलला आणि त्याला खांद्याच्या खाली ब्लाऊजच्या गळ्याशी काहतरी काळ तीळ सारखं दिसलं .. खरचं होत का? की भास झाला त्याला ? डोळ्याची पापणी न लवता तिने पदर सावरून घेतला नंतर त्याला काही दिसलं नाही. दोघांनी अंघोळ करून आवरून आले.

क्रमश ..

©® धनदिपा ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
ईराच्या कथांचे कुठलेही भाग मिस करू नका, आजच जॉईन करा ईरा वाचनालय. व्हाट्सएप: व्हाट्सएप:
Circle Image

Dhandipa

Housewife

"Simplicity is the true beauty".

//