प्रतारणा .. भाग - 37

" या बोक्याने का रस्ता अडवला माझा ?" ती हळूच ओठातल्या ओठात पुटपुटत म्हणाली. "खूपच तिखट दिसत आहे हो.""आहेच मी तिखट इतकी की, जवळ आल्यावर सुद्धा आग होईल आग." ती मोठ्या तोऱ्यात म्हणाली. "असंही मला तिखटचं आवडते." त्याने ही तिच्या नजरेला नजर देत म्हणाला.

प्रतारणा ..


भाग - 37 


                   खिडकीतून सूर्याची सोनेरी किरणे विजयाच्या चेहर्‍यावर आली तसे तिने डोळे किलकिले करून उघडले.

"कशाला उठलीस ? झोपायचं थोडा वेळ !" वैदेही ने तिला उठतांना पाहून त्या तिच्या प्रेमाने गालावरून हात फिरवत म्हणाल्या.

" किती गडद लाल रंग चढलाय तुझ्या मेंहदीवर." वैदेही विजयाचे हात पाहत म्हणाली.

" हो .. मस्त रंग चढलाय ना आई." विजया मेहंदी लावलेल्या हातांकडे पाहत म्हणाली.

"स्वप्निलच खूप प्रेम आहे म्हणून तर रंग चढलाय मेंहदीवर." निता विजयाच्या रुममध्ये येत म्हणाली.

"काही असत तुझं ताई, कुठली गोष्ट कुठे जोडते."

"मी बरोबर जोडतेय गं , अनुभवाचे बोल आहेत हे म्हणून सांगतेय !" तसे दोघेही हसायला लागल्या.

" आता जितकं झोपायचं तितकं झोपून घ्या ! विजयालक्ष्मी, लग्न झाल्यावर सर्वात आधी उठून सर्व आवराव लागतं." निता विजयला घाबरवत म्हणाली.

"काय ताई तू घाबरवू नको ना."

"अगं खरचं, त्यात रात्रीच जागी राहणे होतं असते आणि सकाळी लवकर उठवावं लागतं." ती एक डोळा मिचकवत म्हणाली.

"काही काय सांगते ताई मला .. मी नाही जागी राहणार अशी ! " ती उठून बाथरूममध्ये पळाली.

"तू नको जागी राहू गं तुला तर स्वप्निल रात्री जागी ठेवेल!" जाता जाता ताईचे शब्द तिच्या कानावर आले आणि लाजून तिने दोन्ही हातांनी चेहरा झाकला. तिने तिचे आवरले. तयार होऊन बाहेर आली. सगळे कामात ह्या नाहीतर त्या कामात होते. आईने तिला तिच्या आवडीचा नाश्ता तिच्या समोर ठेवला. ती गोड हसली.

"आईऽऽ तूऽऽ नाश्ता केला का?"

"नाही. करते थोड्यावेळाने."

 "मग मी ही नंतरच करते." तिने नाश्ताची प्लेट वैदेहीकडे दिली.

"अगं अलका मामी राहिलीय नाश्त्याची , आम्ही सोबत बसू." विजयाने अलका मामीला बोलवून घेतले. मग त्यांनी सोबत नाश्ता करायला बसवले.

"सकाळपासून काम करत आहेत ना दोघीही ते ही फक्त चहा पिऊन ! हो नं ?"

"होऽऽ ." अलका म्हणाली. थोडं खाऊन ते पुन्हा कामाला लागल्या. विजया ही तिच्या भावंडाच्या गप्पांमध्ये रंगली. यशोदा आजी त्यांच्या सोबती होत्या . सर्वच खी खी करत हसत होते. अशातच त्यांची जेवणे झाली. तिला थोडा आराम करायला लावला ती यशोदा आजीच्या मांडीवर डोक ठेवले . आजीचे बोट विजयाच्या केसांमध्ये हलके हलके फिरवू लागले अन् तिचा डोळा लागला. बाकीचे संध्याकाळच्या तयारीला लागले. विजयाला जागी आली तेव्हा ती आजीच्याच मांडीवर डोक ठेवून झोपली होती.

"काय गं आजी मला उठवलं का नाही. इतका वेळा अशी अवघडून बसली आहेस." ती उठत तिच्या आजीला म्हणाली.

"असू दे वेदिका बाळा, मला काय नाय झालं. थोड पायाला मुंग्या आल्या बस !" आजी तिला समजवत म्हणाली. तिने आजीला पाय लांब करायला लावून आजीचे पाय चोळले.आजीला बरं वाटायला लागलं तसं आजीने वेदिकाच्या डोक्यावरून हात फिरवून तिच्या कपाळावर आणत कडकडा बोटं मोडली.

"काय आजी, मी काहीही केलं तरी तू माझं कौतुकच करते."

"तू हाय तशी तूझ कौतुक तर करायलाच पाहिजे." आजीने जवळ घेऊन तिला मिठीत घेतले.

****

मांडव सजला, दाराला तोरण बांधली, झेंडूच्या पिवळ्या फुलांची सजावट केली. लाईटांची रास लावलेली त्यामुळे सगळीकडे झगमगाट दिसत होता. नवरदेवाकडून त्याच्या आत्याने आणि राहूलने हळद आणून दिली. ते आले तेव्हा इंद्रा अलमोस्ट पूर्ण रेडी झाली होती. पिवळा रंगाचा पटियाला सुट, जाळीदार ओढणी गळ्याशी लावलेली ,कानात मोठे झुमके, केसांची सागरवेणी, हातात बांगड्या, गुलाबी ओठांवर गुलाबी रंगाची लिपस्टीक, पायात सँडल. ती तिच्या मैत्रिणींना घ्यायला जाणार होती. म्हणून स्कूटीवर बसून निघतच होती तर मध्येच राहूल आला .

" या बोक्याने का रस्ता अडवला माझा ?" ती हळूच ओठातल्या ओठात पुटपुटत म्हणाली. 

"खूपच तिखट दिसत आहे हो."

"आहेच मी तिखट इतकी की, जवळ आल्यावर सुद्धा आग होईल आग." ती मोठ्या तोऱ्यात म्हणाली. 

"असंही मला तिखटचं आवडते." त्याने ही तिच्या नजरेला नजर देत म्हणाला.

"हूँऽऽ." तिने नाकाचा शेंडा उडवला. तितक्यात तिचा फोन वाजला."आलेच गं " म्हणून फोन कट केला. वेदांतला आवाज देऊन राहूलला आत नेण्याचे सांगून ती स्कूटीवर निघून गेली. राहूल आत आला तर आत्या वैदेही सोबत बोलत होती. वैदेही त्यांना चहा नाश्ता देत होत्या .त्याला बोलवून चहा नाश्ता देण्यात आला. त्याने चहाच घेतला आणि थोड्यावेळात ते परतले. स्वप्निलकडे ही कार्यक्रम चालू होता. 

विजया पिवळी साडी नेसून आणि फुलांचे दागिने घालून रेडी होऊन बाहेर आली. तिची एन्ट्री झाली . 

गोऱ्या गोऱ्या गालांवरी
चढली लाजंची लाली
गं पोरी नवरी आली
सनईच्या सुरांमंदी चौघडा बोलतो दारी
गं पोरी नवरी आली
सजणी, मैत्रिणी, जमल्या अंगणी
चढली तोरणं मांडवदारी
किणकिण कांकणं रुणझुण पैंजणं
सजली नटली नवरी आली


नवऱ्या मुलाची आली हळद ही ओली
हळद ही ओली लावा नवरीच्या गाली
हळदीनं नवरीचं अंग माखवा
पिवळी करून तिला सासरी पाठवा
सजणी मैत्रिणी जमल्या अंगणी
चढली तोरणं मांडवदारी
सासरच्या ओढीनं ही हासते हळूच गाली
गं पोरी नवरी आली
सनईच्या सुरांमंदी चौघडा बोलतो दारी
गं पोरी नवरी आली

तिला पाटावर बसून पारंपारिक पद्धतीने तिला स्वप्निलची उष्टी हळद लावण्यात येत होती. पाच सुवासिंनीनी तिला ओवाळले आणि वैदेहीने पहिले हळद लावून सुरवात केली. मग सर्वांनी येवून हळद लावू लागले. एकीकडे गाणे वाजवत होते.



आला नवरदेव वेशीला, वेशीला गं
देव नारायण आला गं
मंडपात गणगोत सारं बैसलं गं
म्होरं ढोलताशा वाजि रं

सासरी मिळू दे तुला माहेराची माया
माहेराच्या मायेसंगं सुखाची गं छाया
भरुनीया आलं डोळं जड जीव झाला
जड जीव झाला लेक जाय सासरा
किणकिण कांकणं रुणझुण पैंजणं
सजली नटली नवरी आली
आनंदाच्या सरी तुझ्या बरसु दे घरीदारी
ग पोरी सुखाच्या सरी
सनईच्या सुरांमंदी चौघडा बोलतो दारी
गं पोरी नवरी आली

            एकीकडे विजयाला हळद लावली जात होती आणि वैदेहीचे डोळे भरून आले होते. तिला न्याहळतच ते गालावर ओघळू लागले. विजयलाची नजर वैदेहीला शोधत होती. तिला वैदेही दिसली आणि तिच्या डोळ्यातील अश्रू ही दिसले अन् तिचे ही डोळे पूर्ण काठोकाठ भरले होते. निता ने तिचे डोळे पुसले. सगळ्या भावडांनी विजयाला हळदी लावली. डिजे वाजायला सुरुवात झाली आणि सिद्धूने विजयाला उचलून खांद्यावर बसून नाचू लागला. इकडे विजयाला भिती वाटत होती खाली पडण्याची.

"इथून खाली पडली ना भाऊ, तर मग दोन तीन हड्डी तुटल्याशिवाय राहणार नाही. उद्या लग्न मंडपात नाही तर हॉस्पिटलमध्ये राहिल !"

" नाही पाडणार तुला !" सिद्धु म्हणाला. सर्व नाचायला लागले होते .

एक व्यक्ती इतकी कामात होती की ,ती ज्या घरातील कपड्यांवर होती त्यातच बाहेर आलेली. आणि सर्वांनी तिला चेंज करायला सांगितले तरीही ती चेंज करायला जाईना, " निता पूर्ण शुटिंग मध्ये तू या गाऊनमध्येच दिसतेस बाई. आता तरी तू छान रेडी होऊन ये!" तरीही ती रेडी होऊन आलीच नाही.

विजया मोठ्याने ओरडली.

"थांबा, जो पर्यंत ताई रेडी होऊन येणार नाही तोपर्यंत कार्यक्रम इथेच थांबवा."

"अगं राहू दे ना काय बिघडतय ! "

"ताई रेडी हो, मला काहीच सांगायच नाही. हा कार्यक्रम थांबला तर हे मुल बघ किती नाराज होतील." तिने सर्व बंद करून एका खूर्चीवर पलीकडे चेहरा करून बसली. आता ताईला जावेच लागले. ताई आत गेली छान रेडी होऊन आली. आणि पुन्हा बच्चेकंपनीने डीजे लावायला सांगितले आणि नाचायला लागले.

गुलाबाची कली बघा हलदीनं माखली
आली लाली गोऱ्या गाली उतू उतू चालली
नटून थटून लाजते जनू चांदनी
नटून थटून लाजते जनू चांदनी
गुलाबाची कली बघा हलदीनं माखली
आली लाली गोऱ्या गाली उतू उतू चालली…
कुणासाठी कुठे, कशी, कधी कधी कळेना
कुणासाठी कुठे, कशी, कधी कधी कळेना
कुण हळुवार गाठ रेशमाची बांधतो
कुण हलकेच तार काळजाची छेडतो
कधीकधी कधीकधी,कधीकधी देतो कुणी नजरेचा इशारा

मध्येच विजयाचा हात पकडून नाचायला ओढले. विजयाने नाचायला सुरवात केली. तिची प्रत्येक मुव्हमेंट मनमोहक होती.

कुणी हरपून देह भान त्यात गुंतातो
कुणी हरपून देह भान त्यात गुंतातो
गुलाबाची कली बघा हलदीनं माखली
आली लाली गोऱ्या गाली उतू उतू चालली…
चढते भिडते जादू नजरेची अशी
चढते भिडते जादू नजरेची अशी
नकळत वेड बावऱ्या जीवाला लावते
मन विसरून वाट सैरवैर धावते
अरे गुलाबाची कली कशी हलदीनं माखली
आली आली लाली लाली उतू उतू चालली…
कुणासाठी कुठे, कशी, कधी कधी कळेना
कुण हळुवार गाठ रेशमाची बांधतो
कधीकधी कधीकधी,कधीकधी देतो कुणी नजरेचा इशारा
कुणी हरपून देह भान त्यात गुंतातो
गुलाबाची कली बघा हलदीनं माखली
आली लाली गोऱ्या गाली उतू उतू चालली
नटून थटून लाजते जनू चांदनी
नटून थटून लाजते जनू चांदनी
गुलाबाची कली बघा हलदीनं माखली
आली लाली गोऱ्या गाली उतू उतू चालली…

ती काही नाचायची थांबत नव्हती. गाणे बदलत गेले. तरीही ती नाचत होती. विजयाची एक एक कृती घायाळ करणारी होती. स्वप्निल जर इथे असता तर तो पुन्हा तिच्या अदांच्या प्रेमात पडला असता.


बाबुल का ये घर गोरी कुछ दिन का ठिकाना है 
बन के दुल्हन एक दिन तुझे पिया घर जाना है 
बाबुल तेरे बगिया की मैं तो वो कली हूँ रे 
छोड़ तेरी बगिया मुझे घर पिया का सजाना है 
क्युं छोड़ तेरी बगिया मुझे घर पिया का सजाना है 
बेटी घर बाबुल के किसी और की अमानत है 
दस्तूर दुनिया का हम सबको निभाना है  
बाबुल का ये घर गोरी कुछ दिन का ठिकाना है
मैया तेरे आँचल की मैं हूँ कैसी गुड़िया रे 
मैया तूने मुझे जनम दिया तेरा घर क्यों बेगाना है 
मैया पे क्या बीत रही बहना तू ये क्या जाने 
कलेजे के टुकड़े को रो रो के भुलाना है 
बाबुल का ये घर गोरी कुछ दिन का ठिकाना है
भैया तेरे अँगना की मैं हूँ ऐसी चिड़िया रे 
रात भर बसेरा है सुबह उड़ जाना है 
यादें तेरे बचपन की हम सबको रुलाएगी 
बहना तेरी डोली को कांधा तो लगाना है
बाबुल का ये घर गोरी कुछ दिन का ठिकाना है 
बन के दुल्हन एक दिन तुझे पिया घर जाना है 
बाबुल का ये घर गोरी कुछ दिन का ठिकाना 
 
तिला नाचता नाचता भरून येत होते. डोळ्यांत पाणी जमा झाले होते.. आता डोळ्यांतील अश्रू अनावर झाले आणि ती तिच्या रुममध्ये आली. भरून आलेले मन डोळ्यांतून रित होत होते. 

तितक्यात इंद्रा आली जिथे गाणे वाजवले जात होते तिथे ते गेली.

"काय हो भैय्या, काय भंकस लावलयं तुम्ही,तुम्हाला आजच आमच्या नवरीची बिदाई करायची आहे का? आमची नवरी रडत बसली आहे. हे असले गाणं लावून मी माझ्या पाठवणीच्या वेळेस ही रडणार नाही आणि आता जर छान गाणे नाही लावले तर बाकीचा पेमेंट विसरा, काय !" ती धमकीच्या सुरात म्हणाली.

जिस देख मेरा दिल धडका 
मेरी जान तडपती है
कोई जन्नत की वो हूर नहीं
मेरे कॉलेज की एक लड़की है  

इंद्रा विजयला घेऊन आली आणि फूल जोश मध्ये नाचायला लागली. सर्वच नाचायला लागले. विजयाचा मूड चेंज झाला अन् ती ही सामिल झाली. नंतर झिंगाट गाण लागलं तसा एकच कल्ला झाला. या गाण्यावर कोण नाचणार नाही? असं कुणीच नाही की या गाण्यावर त्यांचे पाय थिरकरणार नाही.बायकांनीही मग या गाण्यावर ठेका धरला. थकून भागून सर्व झोपी गेले. विजया अंघोळ करून फ्रेश झाली . वैदेहीने विजयाला डोक्याला तेल लावून दिले आणि ती लगेच झोपेच्या आधीन झाली.

******

स्वप्लिनला पाटावर बसला. पाच सुवासिंनीनी त्याला हळद लावली आणि मग सर्वांनी सुरवात केली. सर्वांची लावून झाली तशी राहूलने आणि त्याच्या इतर मित्राने स्वप्निलच्या डोक्यावर भरलेल्या ताटातली हळद ओतायला सुरवात केली. त्याने डोळे घट्ट बंद करून घेतले. डोक्यापासून तर पायांच्या नखापर्यंत त्याला हळदीने भरवून सोडले होते. स्वप्निल अंघोळीला गेला. ताटातील थोडी हळद घेऊन आत्या आणि राहूल घेऊन गेले. आवरून तो बाहेर आला. पिवळी शेरवानी तो खूप हँडसम स्मार्ट दिसत होता. रोज वर्कआउट करत असल्याने पिळदार ,बळकट शरीर त्याने तयार केले होते. ती शेरवानी त्याला शोभून दिसत होती. त्यात त्याचा उजाडलेला चेहरा खुलून दिसत होता. स्वप्नाली तर आज खूप मटकत होती. इकडून तिकडे ,तिने पिवळा नारंगी मिक्स असलेला फुलांचा वर्क असलेला घागरा घातलेला होता. त्या घागऱ्याला शोभेल अशी हेअरस्टाईल केलेली होती. चेहऱ्यावर थोडा मेकअप केलेला, खूपच सुंदर दिसत होती. ती त्याच्या अवतीभोवती गाण्यांवर नाचत होती.

प्यारा भैया मेरा 
दूल्हा राजा बन के आ गया
प्यारा भैया मेरा
रेशम की पगड़ी पे सेहरा
घर आँगन महका गया
प्यारा भैया मेरा

राहूलही खूष होता. कारण त्याच्या मित्राचे लग्न त्यात त्याला लवंगी झणझणीत मिरची जी भेटली होती. उत्साहानेच हळदीचा कार्यक्रम पार पडला आणि सर्व झोपायला निघून गेले. बारा वाजले तरीही स्वप्निलला काही झोप येत नव्हती. त्याला सकाळची थोडी अनामिक धडधड, आनंद , भिती, वाटत होती. "बारातासानंतर तू माझी होशील विजया कायमची !" त्याच्या गालावर हसू उमटले. त्या गोड स्वप्नांत तो झोपी गेला.


क्रमश ..


   काय मजा येतेय नं?



🎭 Series Post

View all