प्रतारणा ... भाग - 36

"काय यारऽऽ या मुली किती बोलत आहेत. मला बोलायला भेटत नाहीये, विजया घरी आल्यावर सुद्धा मला बोलायला भेटणार नाही." वैतागून तो बाहेर निघून गेला. एंगेजमेंट झाल्यापासून तो एकदाही फोनवर बोलला नव्हता. नेटसेट एक्झाम देण्याची तयारी करत होता. महिनाभरात त्याची परिक्षा होती म्हणून तो लागलीच अभ्यासाला लागला होता. म्हणून त्याला आता एक शब्द तरी तिच्याशी बोलावं असे त्याला वाटत होते, पण बोलने तर झालेच नाही. बाबांनी तिच्याकडून फोन काढून घेतला.

प्रतारणा ..


भाग - 36 

           

                 स्वप्निलचा रिझल्ट लागला आणि त्याने टॉप केले. त्याने सर्वात आधी सुप्रिया संजयच्या पाया पडल्या. मग देवाच्या, आईने देवापुढे पेढे ठेवले मग एकमेकांना भरवला.सगळ्यांना खूप आनंद झाला होता. आणि संजय सुप्रियाने त्यांच्या व्याही इंदरला फोन करून बातमी कळवली.त्यांनाही खूप आनंद झाला, सगळ्यांसोबत बोलणे झाले . मग सुनबाईसोबत बोलून घेतले सुप्रियाजवळ फोन दिला तीही बोलत बसली, स्वप्नालीने आईकडून फोन घेतला आणि जी बोलायला लागली एक तास झाला, तरी तिचे बोलणे संपत नव्हते. स्वप्निल तिथेच खूर्ची वर बसून तिची बोलणं संपण्याची वाट पाहत होता. त्याने सात ते आठ वेळा बोलायचं म्हटल्यावर त्याला अजून फोन भेटला नव्हता. तो खूर्चीवर मान टेकवून बसला. पण फोन काही हाती आला नाही.

"काय यारऽऽ या मुली किती बोलत आहेत. मला बोलायला भेटत नाहीये, विजया घरी आल्यावर सुद्धा मला बोलायला भेटणार नाही." वैतागून तो बाहेर निघून गेला. एंगेजमेंट झाल्यापासून तो एकदाही फोनवर बोलला नव्हता. नेटसेट एक्झाम देण्याची तयारी करत होता. महिनाभरात त्याची परिक्षा होती म्हणून तो लागलीच अभ्यासाला लागला होता. म्हणून त्याला आता एक शब्द तरी तिच्याशी बोलावं असे त्याला वाटत होते, पण बोलने तर झालेच नाही. बाबांनी तिच्याकडून फोन काढून घेतला.

"काय बाबा ऽऽ, असा का फोन घेतला तुम्ही? आमचं बोलणं बाकी होत बाबा !"

"अगं गेले दिड तास तुम्हीऽऽ बोलत होता, इतकं काय बोलत होता ? " दरवाज्यातून आत येत स्वप्निल त्रासिक सुरात म्हणाला.

" मुलीं मुलीचं पर्सनल होतं आमचं !" तो बारीक डोळे करून पाहत होता. तो आता डोक्याला हात लावून बसाला. त्याची रिअँक्शन पाहून हिला हसू आवरेना ..

नेटसेट परिक्षा देऊन त्यात हि तो अव्वल आला. त्याने गर्वमेंट, प्रायव्हेट कॉलेज मध्ये निवेदन पाठवले होते. 

लग्नाला एक महिना राहिला होता. तशी कामाची यादी जवळ जवळ पूर्ण होत आली होती. वैदेहीच्या घरात पहिलंच लग्न असल्यामुळे तयारीला आणि सर्वांच्या आनंदाला उधाण आले होते. मिळून त्यांनी कपड्यांची खरेदी केली ऐन तेव्हा विजयालक्ष्मी आजारी असल्यामुळे तिला खरेदीला कुणी सोबत आणले नव्हते. आता ही त्याचा हिरमोड झाला होता आणि तिच्याविषयी काळजी ही होती. त्याने इंद्राला बोलवून तिची विचारपूस केली.

"इंद्रा, विजया कशी आहे, काही कळवले नाही मला ?"

"काय हो जिजूऽऽ, मला ही विचारा ना कशी आहेस म्हणून , एकच तर साली आहे तुमची, तिला ही विचारत नाही."ती थोडी तक्रारीच्या सुरात म्हणाली.

"मी विचारतो की, कशा आहात तुम्ही?" राहुल मध्येच म्हणाला.

"मिस्टर, मला अनोळखी लोकांशी बोलायला आवडत नाही.तर पुढचं पुढेच !" ती एक भुवई उडावत म्हणाली.

"अगदी झणझणीत तिखट लवंगी मिरची आहे ही !" तो मनातल्या मनात म्हणाला.

" जिजू ,ताईची तब्बेत काल अचानक बिघडली. तिला दवाखान्यातून आणलं पण तिला थोडा ताप होता म्हणून आणली नाही अन् आता ती बरी आहे. हे घ्या बोलून ह्या तिच्यासोबत." इंद्राने मोबाइलवर कॉल लावून दिला.


 " हॅलो, मामी ताईकडे फोन द्या बरं " इंद्रा 

"हो , एक मिनिट थांबा इंद्रा ." अलका मामी. 

 अलका मामींनी तिच्याकडे मोबाइल दिला. इंद्राचा फोन आहे म्हणून सांगितल ही !

"हा बोल पिंकू !" आवाजात ही शीणपणा वाटत होता. हीच लाडाने पिंकू म्हणायची . 

"पिंकू, खरेदिला ते पण आले आहेत का गं ! कसे आहेत ते ?.. आई, बाबा , स्वप्नाली सोबत बोललीस का तू ?" तिचे प्रश्नांवर प्रश्न सुरू होते पण इंद्रा मात्र उत्तर देत नव्हती. उत्तर द्यायला तिथे तर पाहिजे होती. इंद्राने फोन लावून मामीसोबत बोलून स्वप्निल जवळ फोन दिला होता. किती वेळची तो तिचा आवाज ऐकत होता.

"काय झालं पिंकू, भैताडावानी चूप काऊन बसलीऽऽ!"
    
"मी आहो स्वप्निल!" तो म्हणाला.

"तु ..म्ही !" तिच्या हातून मोबाइल खाली बेडवर पडला. तिने उचलून कानाला लावला तिकडून त्याचा 
 \"हॅलोऽऽ हॅलोऽऽ\" आवाज येत होता.

 "हॅ ..लो ऽऽ " विजया चाचरत म्हणाली.

" विजू ऽऽ,कशी आहेस?" त्याच्या प्रेमाने विचारल्यावर असंख्य फुलपाखरू पोटात नाचायला लागली.

" मी बरी आहे. तुम्हीऽऽ कसे आहात ? आई,बाबा, स्वप्नाली कसे आहेत ?" तिने विचारले.

"आम्ही सर्व छान आहोत, आजारी आम्ही नाही तू आहेस, पण तुझी तब्बेत कशी बिघडली अशी अचानक?" त्याच्या आवाजात काळजी जाणवत होती

"हो, थोडा ताप आला होता. आता ठीक आहे."

" काळजी घे! जेवण,औषध वेळवर करं."
स्वप्नाली इंद्रा आली तसा स्वप्निलने बोलून फोन कट केला.
सगळ्यांनी मिळून छान खरेदी केली. विजयाच्या साड्या स्वप्निलने पसंत केल्या. दागिन्यांची खरेदी ही बायकांच्या पसंतीची झाली. सुप्रियाने नवीन 
डिझाईनचे मंगळसुत्र पसंत केले सर्वांनाचा ते 
आवडलेही. खरेदी करून एखाद्या हॉटेलात जेवण झाले आणि सर्वांनी एकमेकांचा निरोप घेतला आणि आपआपल्या घरी गेले.

 इंदरने पत्रिका आणल्या. पहिली निमंत्रण पत्रिका देवघरात जाऊन देवाजवळ ठेवली आणि दुसरी पत्रिका त्यांचे व्याही संजयरावांना देण्यासाठी त्यांच्या घरी गेले. 

 "नमस्कार ." सगळ्यांनीच एकमेकांना केला. स्वप्निलने त्यांच्या पाया पडल्या मग चहापाणी झाले आणि त्यांनी संजयरावांच्या हातात पत्रिका देऊन हात जोडले. सुप्रियाने त्यांना जेवणाचा आग्रह करून थांबवले. त्यांनीही इंदरचे यथेच्छ पाहुणचार करून ते त्यांच्या घरी परतले.

स्वप्निलने पाच ते सहा कॉलेजमध्ये मुलाखती दिल्या होत्या. 
लग्नासाठी भव्य हॉल बुक करण्यात आला होता.
निता स्पेशली लग्नाच्या पंधरा दिवस आधी आली होती
रुखवतच्या सर्व वस्तू तयार करण्यात आल्या होत्या. वैदेहीने इंदरने मानपान आहेरच्या साड्या घेतल्या. अलमोस्ट सर्व खरेदी संपली होती. पार्लरवाली बुक झाली होती. हळहळू पाहुण्यांनी घर भरत होतं. मेहंदीचा दिवस उगवला. बाहेर सुंदर सजावट केली होती. संध्याकाळी एका मोठ्या फुलांच्या ताटात मेंहदी ठेवण्यात आली होती. मेंहदीवालीने मेंहदी काढायला सुरवात केली. हात भरून आणि पायांवर सुंदर अशी मेंहदी काढली हातांवर स्वप्निल नाव विराजमान झाले होते. सोनाली मोनालीने गाणे लावले आणि नाचायला सुरवात केली.

ये कुड़ियाँ, नशे दियाँ पुड़ियाँ
ये मुण्डे, गली ते गुंडे
नशे दियाँ पुड़ियाँ
गली दे गुंडे  

 इंद्रा कुर्ता पायजमा घालून, डोक्यावर रुमाल बांधून जबरदस्त नाचत होती. म्हणजेच काय ती शाहरूख खान झाली होती. 

मेहँदी लगा के रखना, डोली सजा के रखना
लेने तुझे ओ गोरी, आएँगे तेरे सजना
सहरा सजा के रखना, चेहरा छुपा के रखना
ये दिल की बात अपने, दिल में दबा के रखना

सोनाली यात काजोल आणि मोनाली मंदिरा बेदी बनल्या होत्या. तिघांची जुगलबंदी रंगली होती. नाचता नाचता त्यात फनी अँक्ट करून हसवत होते. 


उड़-उड़ के तेरी ज़ुल्फ़ें, करती हैं क्या इशारे
दिल थाम के खड़े हैं, आशिक़ सभी कंवारे
छुप जाएँ सारी कुड़ियाँ, घर में शरम के मारे
गाँव में आ गए हैं, पागल शहर के सारे
नज़रें झुका के रखना, दामन बचा के रखना
लेने तुझे ओ गोरी...

इंद्राने सर्वांना उठवून नाचायला लावले. सर्व उठून मामा मामी , आत्या ,मावशा , काका , बच्चे कंपनी नाचायला लागले.



मैं इक जवान लड़का, तु इक हसीन लड़की
ये दिल मचल गया तो, मेरा क़ुसूर क्या है
रखना था दिल पे क़ाबू, ये हुस्न तो है जादू
जादू ये चल गया तो, मेरा क़ुसूर क्या है
रस्ता हमारा तकना, दरवाज़ा खुल्ला रखना
लेने तुझे ओ गोरी, आएँगे तेरे सजना
कुछ और अब न कहना, कुछ और अब न करना
ये दिल की बात अपने…

सगळ्यांनी मनसोक्त दाद दिली तिघींना ! सर्व आपआपल्या जागी बसले गाणे चेंज झाले.


मेहँदी है रचनेवाली
हाथों में गहरी लाली
कहें सखियाँ..
अब कलियाँ..
हाथों में खिलने वाली हैं

तेरे मन को
जीवन को
नई ख़ुशियाँ मिलने वाली हैं
 
 या गाण्यावर निताताई , माम्या सर्व मावश्या नाचत होत्या. विजयालक्ष्मी बसून पाहत होती. इंद्रा तयारी करून आली. तिने हातानेच इशारा केला आणि तिची पोझिशन घेतली. गाण वाजायला सुरवात झाली.

मेहँदी लगाके आयी
है
बिंदिया सजाके आयी
ओए होए होए होए
मेहँदी लगाके आयी
बिंदिया सजाके आयी
चूड़ी खनकाके आयी
पायल छंकाके आयी
हो अब गीत मिलन के गाना है
गाना है गाना है

अप्रतिम असं नृत्य सादर करत होती ती. तिने विजयालक्ष्मीला हाताला धरून उठवून नाचायला लावले. आधीपासून आवड असलेल्या विजयाला नृत्य करायला फार आवडत होते. सगळे त्यांच्यात नाचण्यात हरवून पाहत होते. इतका जबरदस्त नृत्य करत होते .

मुझे साजन के घर जाना है
मुझे साजन के घर जाना है
मुझे साजन के घर जाना है
मुझे साजन के घर जाना है
   
        फोटोग्राफर व्हिडिओ शुटिंग करत होता तर कुणी मोबाइल मध्ये कैद करत होते.

"आता येत आहे विजयाताई!" वेदांत मोठ्याने म्हणाला.

विजया मध्ये उभी राहिली. गाणे सुरु झाले . ..

हाथों में, इन हाथों में
लिखके मेंहदी से सजना का नाम
लिखके मेंहदी से सजना का नाम
हाथों में, इन हाथों में
जिसे पढ़ती हूँ मैं सुबह-ओ-शाम
जिसे पढ़ती हूँ मैं सुबह-ओ-शाम
हाथों में, इन हाथों में
लिखके मेंहदी से सजना का नाम
लिखके मेंहदी से सजना का नाम
 
तसे तिने गाण्यांच्या प्रत्येक शब्दांवर फुल एक्सप्रेशन करून दाखवत होती. 


याद मुझे जब, उनकी आये
आये रे हाये बड़ा सताये
याद मुझे जब आं आं उनकी आये
आये रे हाये बड़ा सताये
देखूं सूरत मैं उनकी सुबह-ओ-शाम
देखूं सूरत मैं उनकी सुबह-ओ-शाम
 

अब उसके बिन, लागे ना मन
वो जोगी है, मैं हूँ जोगन
अब उसके बिन आं आं लागे ना मन
वो जोगी है, मैं हूँ जोगन
सपने देखूं साजन के सुबह-ओ-शाम
सपने देखूं साजन के सुबह-ओ-शाम


हाथों में इन हाथों में
लिखके मेंहदी से सजना का नाम
लिखके मेंहदी से सजना का नाम

हाथों में इन हाथों में
जिसे पढ़ती हूँ मैं सुबह-ओ-शाम
जिसे पढ़ती हूँ मैं सुबह-ओ-शाम




प्रत्येकाला असे वाटत होते की , एखादी नृत्यांगना अभिनय करत आहे की काय? .. यशोदा आजी कौतुकाने तिच्याकडे पाहत होत्या. कारण आजीच तिची गुरु होती. आजीनेच तिला कथ्थक शिकवले होते. म्युझिक, गाण्याचे बोल , प्रत्येक बिट्स ऐकूनच तिचे पाय थिरकत होते. आता तिचे लग्न होणार म्हणून मन भरून आले होते त्यांचे .. जेव्हा ती नाचायला लागली तेव्हा सर्व अवाक होऊन पाहू लागले. इंद्राने तिच्या मोबाइलवर तिचा डान्स करतांनाचा व्हिडिओ काढून घेतला. मग सर्वच तिच्यासोबत नाचायला लागले. नाचून नाचून थकले आणि लगेच झोपी गेले कारण दुसऱ्या दिवशी हळदी होती. त्यात अजून डबल धमाल करायचा होता.

(  मज्जा आली ना ? मग कुठेही जाऊ नका. हळदीला ही अशीच डबल धमाल करायची आहे. )

क्रमश ...



🎭 Series Post

View all