प्रतारणा .. भाग - 35

"आवडला का?" स्वप्निल म्हणाला." कायऽ " तिने चमकून वर पाहिले . " तू ज्याला पाहत होती ते आवडला का?"तो तिच्या डोळ्यात मिश्किलपणे गालात हसत म्हणाला.

प्रतारणा ..


भाग -35


                स्वप्निलने पूर्णपणे अभ्यासात लक्ष घातले होते पण रात्री झोपतांना तिचा फोटो पाहिल्याशिवाय किवा बोलल्याशिवाय जात नव्हती .. स्वप्नाली, सुप्रिया , संजय मात्र कधी कधी फोनवर विजयासोबत बोलत होते. स्वप्निलची परिक्षा सुरु झाली तशी स्वप्नालीने विजयाचा "ऑल द बेस्ट "निरोप दिला. तो खुष झाला. सर्व पेपर एकदम छान गेलेत आणि तो घरी आला. आता साक्षगंध करायचा होता. संजयरावानी इंदरसोबत बोलून घेतले. त्यांनी तसा जवळचा मुर्हत काढून घेतला.  स्वप्नालीने संजयकडून तिच्या आवडीचा घागरा घेतला होता.सुप्रियाने सर्व साक्षगंधची पूर्ण तयारी केली. विजयाने आधीच तिच्या होणाऱ्या सासूबाईच्या पसंतीची साडी घेतली होती. तिच्यासाठी नेकलेस, अंगठी , बांगड्या, पायातील पैंजण घेतले. त्यांना माहिती होत तिला पायातील पैंजणाची आवड आहे म्हणून त्यांनी तिला नाजूक असे पैजण घेतले .दामले परिवारात ही सर्वतोपरी तयारी झाली होती. विजयाचे तिघे मामा, मामी , त्यांची मुले, निता निताचा नवरा , मुलगा ,मुलगी सर्व आले होते . विजयाच्या हातावर मेंहदी काढली. त्यात स्वप्निलच्या आद्यक्षरावरून \"S \" मध्येच डिझाईन काढली गेली.. साक्षगंधाचा दिवस उजाडला आणि घराबाहेरच मंडप टाकला गेला होता. स्टेज तयार करून सजवण्यात आले होते. स्वप्निल ही व्हाईट शेरवानी आणि पिंक कलरच्या जॅकेट, हातात वॉच, पायात मोजडी आणि केस सेट केलेले एकदम जबरदस्त हॅण्डसम दिसत होता. स्वप्लानीने ही पिंक कलरचा घागरा घातला एका साइडने ओढणी घेतली. स्वप्निलची गोडुली खूप सुंदर दिसत होती. सर्व निघाले दामले सदनला जाण्यासाठी ,इकडे विजयाला तिच्या लहान बहिणीने म्हणजे इंद्राने तयार केली. विजयाने पिंक कलरची साडी आणि निळा कलरची काठ आणि त्यावर खड्यांची टिकल्यांची वर्क केलेली साडी चापून चोपून नेसलेली होती. गळ्यांत नेकलेस, कानात मोठे झुमके. डोळ्यांत काजळ ओठांवर हलकीशी पिंक लिपस्टिक लावलेली. नाकात तिची नेहमीची खड्यांची नथ, समोरचे केस छोट्या पिनमध्ये टाकून, बाकीच्या झुपेदार केसांची वेणी पाडून खाली मोकळे सोडलेले आणि त्यावर मोगऱ्याचा गजऱ्यांची लांब माळ जी पूर्ण लावून खांद्यापर्यंत आलेली होती.. नवरामुलाकडचे म्हणजे स्वप्निल कडेची मंडळी आली. स्वप्निलच्या आत्या , मावशी , मामी , काकू काका सर्व जवळचे नातेवाईक आले होते. स्वप्निलचे दोन चार मित्र ही आले त्यात राहुल तर त्याचा जीगरी होता.राहुलही खूप जास्त हॅडसम दिसत होता. तोच तर स्वप्निलच्या प्रेमाचा साक्षीदार होता. वैदेहीने स्वप्निलचे औक्षण केले .सर्वांना आत बोलवले. वैदेही सर्वांचे आदरातिथ्य करत होती . .भटजी आले आणि साक्षगंधाला सुरवात झाली. स्वप्निलला पाच सुवासिनी टीळा लावला, त्याच्या हातात श्रीफळ आणि कपडे दिले. त्याला कपडे चेंज करायला सांगितले. विजयालाही पाच सुवासिनी कुंकू तिची ओटीत साखरपुडा, फळ , सुकामेवा , साडी नेकलेस , मेकअप चा सामान देऊन तिला साडी चेंज करायला पाठवले . दोघे ही तयार होऊन आल्यावर स्वप्नालीने सजवलेल्या तबकातील अंगठ्या त्यांच्यासमोर धरले.

"दादाऽ "  स्वप्नालीने इशारा केला. तसा त्याने तिचा हात पकडुन तिच्या बोटात अंगठी घातली. त्याचा असा हात पकडल्याने विजायलक्ष्मी कमालीची लाजली. त्यांच्यावर स्वप्निलच्या मित्रांनी फुलांचा वर्षाव केला. त्याने हात पुढे केला आणि विजयाने ही त्याच्या बोटात अंगठी घातली. बाहेर फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. थोर मोठ्यांचे पाया पडले आणि त्यांचे फोटोसेशन सुरू झाले. सगळ्यांसोबत, परिवारासोबत फोटो काढले .विजया स्वप्निल दोघही खूप लाजत होते. त्यात त्याचे मित्र त्याला चिडवत होते. त्यांचे कपल फोटो काढायचे होते. फोटोग्राफर त्यांना गार्डनमध्ये घेऊन गेला .

फोटोग्राफरने स्वप्निनला विजयाच्या खांद्यावरती हात ठेवायचा सांगितला. 

\"सगळ्यांसमोर ? बापरे !\" तो विचार करत होता. सगळ्यांसमोर त्याला ही तिला ऑकवर्ड वाटत होतं आणि मित्र चिडवण्याची संधी सोडत नव्हते.

शेवटी त्याने थरथरत तिच्या खांद्यावर हात ठेवला अन् त्याच्या हाताच्या थंड स्पर्शाने तिच्या अंगभर शहारे आले पाठीचा कणा ताट झाला. तो जवळ आल्याने तिची धडधड वाढली.

\" समोर यांचे मित्र आमच्याकडेच बघताय! स्वप्नाली आहे समोर कसं वाटतेय ते ! किती लाज वाटतेय.\" मनातच म्हणाली. स्वप्निलने राहुलला इशारा केला तसा तो सर्वांना तिथून घेऊन गेला. त्याला समजले की सगळ्यांसमोर तिला सगळ्यांसमोर आँकवर्ड वाटत होते. विजयाने लाजतच फोटो काढले. 

एकमेकांचे डोळ्यांत पाहायचे सांगितल्यावर पाहतांना सुद्धा तिला धडधड वाढत होतं त्याच्या डोळ्यांत प्रेम, काळजी दिसत होती  . ती आज त्याला इतक्या जवळून निरखून पाहत होती. त्याच्या खालच्या ओठाच्या खाली हनुवटीच्या वर लेफ्ट साईड एक तीळ होता. त्याच्या गोर्‍या चेहर्‍यावर एकदम उठून दिसत होता. तिला तो तीळ भयंकर आवडला. ती एकटक पाहत होती. तिला त्या तीळावर ओठ ठेवायची इच्छा झाली. मनात आलेल्या विचारावर स्वतः च चमकून लाजून नजर खाली केली.गाल झरझर गुलाबी झाले. स्वप्निल इतका वेळा तिच्या चेहर्‍यावर आलेले एक्स्प्रेशन पाहत होता. त्याच्या तीळला एकटक पाहताना त्याने पाहिले होते.

"आवडला का?" स्वप्निल म्हणाला.

" कायऽऽ." तिने चमकून वर पाहिले . 

 " तू ज्याला पाहत होती , ते आवडला का?"
तो तिच्या डोळ्यात मिश्किलपणे गालात हसत म्हणाला. 

" हम्म " तिने हुंकार भरला. तिला समजले तो काय म्हणाला तिने खालूनच हुंकार भरला.

" तेवढच का ? की ज्याच्यावर आहे तो ही " हसत कानात हळूच म्हणाला. त्याचे गरम श्वास तिला तिच्या कानाच्या पाळीवर जणावले आधीच असलेली धडधड आणखीच वाढली .
पोटात गोळा उठला,काहीतरी कालवाकाल झाली . पण काय? तिलाच समजले नाही . तिने एक हात पोटावर ठेवला .

" दोघं !" बोलून ती जाण्यासाठी वळली आणि त्याने तिचा हात पकडला. आणि फोटोग्राफरने त्याचे काम अचूक केले होते. एकदम कँडिड पिक्चर्स कॅप्चर केले होते. 

"झाले का तुमचे फोटो काढून आता माझा नंबर आहे वहिनीसोबत फोटो काढायचा !चल हट बाजूला हो!" स्वप्नाली स्वप्निलला बाजुला करत म्हणाली. तो तर अवाक होऊन तिच्याकडे पाहतच राहिला. विजयाला खूप हसू येत होते, ती तोंड दाबून हसत होती. तो दोघींकडे आळीपाळीने पाहत होता. स्वप्नालीने जीभ काढून वाकुल्या दाखवल्या. तिच्या अशा जीभ दाखवल्याने विजयाने तिला टाळी देऊन ती खळखळून हसायला लागली. तो तिला पाहतच बसला. तिला आज तो पहिल्यांदाच असा खळखळून हसतांना पाहत होता. हसल्यावर तिच्या एका गालावर खळी पडली. स्वप्निल तिला भान हरपून पाहू लागला त्याच्या एकटक असे पाहिल्याने ती आणखीनच लाजून तिथून निघून गेली.

" काय हो जवाईबापू,असे काय पाहून राहिले तिकडेऽऽ !" त्याला असं एकटक एका जागेवर पाहतांना, रवी मामा त्यांच्याकडे येत म्हणाले. पाहतो तर काय कुणीच नाही ?

\"आता काय सांगू मी?\" मनातच विचार करत होता.

"काय नाही मामा,जरा मान अटकली माझी !" 

\" हे सगळे मला सोडून निघून गेले. मी बघतो होतो असा वेड्यासारखा,बघतोच आता स्वप्नालीला आणि तिलाही !\"

"जवाईबापू , मूव स्प्रे देऊ का?"

"नाही नाही." तो इकडे तिकडे मान फिरवत म्हणाला.

"ठीक आहे.चला मी तुम्हालाच जेवायला बोलायला आलो होतो."

" चला मग !" दोघेही गेले. सर्व पाहुण्यांचे जेवण झाले होते. घरचेच मंडळी बाकी होते. सर्व जेवणाच्या पंगतीला सोबत बसले होते. विजया स्वप्निल दोघेही बसले. पहिला घास एकमेकांना गुलाबजाम खाऊ घातला. जेवण झाले. दोन महिन्यांनी लग्न तारीख काढायची असे ठरले.विजयाच्या आई वडिलांनी मानपानाच्या साड्या घेतल्या. विजयाने सर्वांच्या पाया पडत सुप्रिया जवळ येऊन पाया पडली. त्यांनी तिला उभं केले आणि मिठी मारली. स्वप्निलनेही आजी समवेत सगळ्यांच्या पाया पडल्या.त्याला आणि संजयने ही सगळ्यांना गळाभेट केली. 

"तुझीच वाट पाहतेय, लवकर ये !" सुप्रिया विजयाच्या गालाल हात लावत म्हणाल्या. स्वप्नालीने हि तिच्या लाडक्या वहिनीला मिठी मारली आणि कानात काहितरी खुसरफुसूर केली.

 एकमेकांचा निरोप घेऊन गाडीत बसून ते निघाले. आधीच सर्व दमलेले असल्यामुळे अंथरूणावर पडल्या पडल्याच सर्व झोपी गेले पण विजया मात्र जागीच होती. ती तिच्या हाताच्या अंगठीकडे पाहत स्वप्निलचा विचार करत होती. तसाच स्वप्निल ही तिला आठवत होता. मध्येच गालात हसत होता. त्याच विचारात तो झोपी गेला. अशीच एका व्यक्तीची झोप उडाली होती. तो होता राहुल जेव्हापासून त्याने इंद्राला पाहिले होते. त्याच्या डोळ्यांसमोर इंद्राचा चेहरा येत होता. ब्राऊन मोठे कमळासारखे डोळे, कुरळे पाठीवर येणारे केस, रंगाने विजयापेक्षाही उजळ, गोल चेहरा , दोन्ही गालावर उमटणाऱ्या दोन खोल अशा खळ्या. छोटुस नाक आणि त्या नाकावर असणारा भला मोठ्ठा राग.. खरंतर वैदेहीला तिचे फार टेंशन येत होते लहानपणापासून तिला समोरच्या व्यक्तीला त्यांच्याच समोर खरं बोलून मोकळी होत असे. मग ते कुणीही असो. तिला काही फरक पडत नव्हता. समोरचा व्यक्ती तिच्यासमोर बोलतांना विचार करूनच बोलत होता. आणि तिच्या पासून दूर पळत होता .फटकळ स्वभावाची अशी इंद्रा पुण्यात इंजिनिअरचे शिक्षण घेत होती, पण इकडे तिने राहुलची झोप उडवली होती.


क्रमश ..



🎭 Series Post

View all