Jul 04, 2022
नारीवादी

प्रतारणा ... भाग - 34

Read Later
प्रतारणा ... भाग - 34

प्रतारणा ...


भाग - 34


                   स्वप्निलचा आनंद तर आज गगनात मावत नव्हता. विजया त्याच्या सोबत जोडली गेली होती. घरी आला तरी त्याच्या चेहर्‍यावरचा आनंद सर्वांनाच दिसत होता. आल्या आल्या सर्व फ्रेश झाले. स्वप्निल आईच्या रूममध्ये आला. आईचे हातात हात घेऊन त्यावर ओठ ठेवले.

"आई, खूप थँक्यू , पण तुम्ही हे कधी केले. मला कुणी काहीच सांगितले नाही. तू तर नाराज झाली होती ना माझ्यावर ? मग हे कधी झालं ?"

"स्वप्निल बाळा, मला माहिती होतं की तू इतका मोठा निर्णय घेतला आहे तर तो विचारपूर्वक घेतला असणारच आधी थोडा राग आला पण नंतर समजलं की तू तिच्यासोबत आनंदी असणार मग तू आनंदी तर आम्हीही आनंदी आणि मी बाबांसोबत बोलले, स्वप्नालीला तर आधीच 
विजयालक्ष्मी पसंत होती. त्यात विजयाचे मामा आणि तुझे बाबा मित्र, मग जुळवून आणले आणि तुला सरप्राइज द्यायचं ठरवलं."

"सरप्राइज द्यायचं ठरवल होतं आणि त्यावर आईच पाणीही फिरवणार होती." स्वप्नाली दारातून आत येत म्हणाली.

" काय तर तू , देवदास झालेला बघवत नव्हतं तिला, म्हणत होती सांगून टाकते मग मीच तिला थांबवल तिने तर तुझ्यासाठी फोटो पण आणला वहिनीचा पण तू तर तू आहेस नाहीच पाहिला मग आम्ही काय करणार?

" मागे ज्या मुलीचा फोटो आई दाखवत होती ती विजया होती ." स्वप्निल न कळून म्हणाला.

" होऽऽ बंधूराज होऽऽ!"

त्याला त्यावेळेचे आठवले. आई स्वप्निलच्या रुममध्ये गेली .

" स्वप्निलऽऽऽ, ही मुलगी पसंत केलीय मी तुझ्यासाठी ,एकदा फोटो बघून घे!"

"आईऽऽऽ,मला नाही पाहायचं आहे हा फोटो."

"स्वप्निल लग्नं तुला या फोटोतल्यामुली सोबतच करावे 
लागेल. तुझ्या टेबलवर हा फोटो ठेवला आहे बघून घेऽऽऽ."

"आईऽऽऽ मी लग्नच करत नाही."

"तरीही एकदा फोटो बघून घे ! फोटो पाहिल्यावर तू म्हणतो त्या मुलीलाही विसरून जाशील !"

" नाही आईऽऽऽ, हे शक्य नाही." तो रागाने घराबाहेर गेला. जाऊन बाप्पाच्या मंदिरात बसून होता. आईने टेबलवर फोटो ठेवून बाहेर निघाली,आल्यावर पाहिलं म्हणून पण स्वप्निल आल्यावरही त्याने एकदाही फोटो कडे वळून बघितले नाही. आणि दुसऱ्या दिवशी स्वप्निल हॉस्टेलला निघून गेला.

"तेव्हा तोंड फुगवून गेला होता." सुप्रिया .

"आईऽ, सॉरीऽ ."त्याने त्याचे कान पकडले.

"आईऽऽ, कुठे आहे तो फोटोऽऽ?"

"माझ्याकडे नाहीयेऽऽ, तुझ्याच रुममध्ये असेल जाऊन शोधऽऽ !

"वो फोटो मेरे पास है जानी!" राजकुमारची अक्टिंग करत स्वप्नाली गळ्यावर हात फिरवत म्हणाली .

"लेकिन वहिनी की फोटो मैं तुम्हे नही दुंगी ।" ती ठेंगा दाखवून पळाली.

"स्वीटूऽऽ स्वीटूऽऽ" म्हणून तो ही मागे मागे धावला .

"स्वीटू बाळा प्लिज दे ना ! ऐक ना माझं ! " तो तिच्या मागे धावत बोलत होता. घरभर यांची पळापळी सुरु होती. एकमेकांच्या मागे पळून दोघे ही दमले होते. जाऊन सोफ्यावर बसला.

"ठीक आहे दादा, मी देते पण मला काय मिळणार?"

"तू म्हणशील तेऽऽ! " तो ही लगेच म्हणाला .

"प्रॉमिस दादाऽ !" तिने त्याच्यासमोर हात पुढे केला

"प्रॉमिस स्वीटूऽऽ " त्यानेही हातावर हात ठेवून प्रॉसिम करून तिचे गाल ओढले .

"आता नाही मागत पण नंतर मागेल हं ऽऽ." स्वप्नाली .

"ठीक आहे." त्याने तिच्या डोक्यावर टपली मारली आणि तिला कुशीत घेतले.

"थांबऽऽ ! आधी डोळे बंद कर ,आणि चिटिंग करू 
नकोसऽ ! त्याच्या डोळ्याला पट्टी बांधून ती त्याला तिच्या रुममध्ये घेऊन गेली.

"वन, टू ,थ्री ,आता डोळे उघड !" तिने त्याच्या डोळ्यांवरची पट्टी काढली. डोळे उघडून समोर बघितले तर समोर विजया आणि त्याचा क्लोजअप फोटो फ्रेम मध्ये लावून बेडजवळच्या एका बाजूने टेबलवर ठेवलेला होता. तर दुसऱ्या बाजूने आईबाबांचा फोटो होता. स्वप्नालीने विजयाला मनापासून स्विकारली होती . हे पाहून तर त्याला काय बोलावे सुचत नव्हते. त्याने तिला एका साइडने कुशीत घेतले.

" थँक्यू स्वीटू बाळा ! "

"किती छान फ्रेम बनवली स्वीटू !" तो फ्रेम हातात घेत म्हणाला. हा तोच फोटो होता जो तिने स्टूडियोत काढलेला होता.

"आणखी थांब दादा , तुझ्यासाठी काहीतरी आहे."

"कायऽऽ ?" स्वप्नालीने पर्समधून काहीतरी काढून त्याच्यासमोर एक सेंकदच पकडून खाली केला.

"अगं व्यवस्थित बघू तर दे, कोणाचा आहेऽ दाखव तर ?" 

"नाही नाही. "करत ती मागे लपवत होती आणि तो फोटो काढायचा प्रयत्न करत होता अन् त्याच्या हातात फोटो आला. तो तिथून त्याच्या रुममध्ये गेला आणि आतून दार लावून घेतले. तिने बाहेरून दार ठोठावले तरीही त्याने दार उघडले नाही.

"दादा उघड ना ! मला पण येऊ दे ना आत , मी मागून घेतलाय तो
फोटो !"

" स्वीटू बाळा प्लिजऽ !" आतून तो हळू आवाजात विनवणी करत म्हणाला.

" ठीक आहे, जाते मी !" दादाला थोडा एकांतात वेळ देऊया म्हणून ती निघून गेली. उलट असलेला फोटो त्याने सरळ केला . आकाशी कलरच्या ड्रेसमध्ये फुलाचा सुंगध घेतांनाचा कैडींड पीक होता. त्यात केस मोकळे सोडलेले चेहर्‍यावर कुठलाच मेकअप नव्हता. गोरे गाल,ब्राऊन केस गुलाबी ओठ, कपाळावर तशीच छोटीशी टिकली , लांब नाक आणि नाकातील खड्यांची नथ त्यात सूर्यकिरणांचे रिफेक्लेशन पडून चेहऱ्यावर आलेले त्यामुळे ती अजूनही चमकत होती. तो एकटक तिच्या फोटोकडे पाहत होता.

"विजूऽ, किती सुंदर आणि तितकीच निरागस दिसतेय यातही , प्रत्येक रुप तुझं मला घायाळ करते. " विजयाचा फोटो समोर पकडून बोलत होता. यात त्याला वेळेचे भानच राहिले नाही. फोटोकडे पाहतच त्याचा डोळा लागला. दारावर टकटक आवाज आला .

" स्वप्निल चल जेवायला! "

"कायऽऽऽ जेवणाची वेळ झाली काऽऽ? तो एकदम हडबळून झोपेतून उठत म्हणाला. त्याने पटकन दार उघडले.

"होऽऽ जेवणाची वेळ झालीयऽऽ. आता कुठे तुझं लक्षात येणार? काही दिवसांनी तर माझा आवाज ही तूला ऐकू येणार नाही ."सुप्रिया तोंड पाडत म्हणाली.

"आई असं का म्हणतेस तू? मला तुझा आवाज येणार 
नाही." तो एकदम सिरियस झाला.

" अरे मी मस्करी केली तुझी, इतका काय सिरियस 
होतोऽ."

"विजया येणार म्हणजे तुझ्या माझ्यात अंतर नाही येणार आई अगदी माझ्या शेवटच्या श्वासपर्यंत !" स्वप्निल.

"असं नको म्हणू वेड्या, काहीही काय बोलतो." त्यांनी हलकेच चापट मारली.

"आता कुठे तुझ्या आणखी एका सुंदर प्रवासाला सुरवात होणार आहे. या प्रवासात तुला तिला घेऊन चालायचं आहे." तसा तो गालात हसला.

"ओऽ होऽ लाजता ही येत तुला,मी पहिल्यांदाच पाहत आहे."

"आईऽ, चिमणी कमी आहे काऽऽ ,की तू ही सुरु झालीसऽ?"

तोपर्यंत चिमणीही आली ना . 

"बघ ! शैतान का नाम लिया और शैतान हाजीर !" तो स्वप्नाली कडे हात दाखवत म्हणाला .

"शैतान म्हणाला ना मला , मग लक्षात ठेव. मैं चुन चुन के बदला लूँगी!" ती बोट त्याच्यासमोर नाचवून नाक उडवून गेली.

" येऽऽ माझी आई, काय करणार आहेस सांग तरी ? चुकलं माझं ! सॉरी सॉरी ! " तो हात जोडत म्हणाला.

"अब आया ऊँट पहाड के नीचे !" ती चेअर उभी राहत म्हणाली .

"ओयऽ पहाडसिंग खाली उतरा, आधीच ती चेअर तुटलेली आहे . पहाड पडून तुकडे होतील त्या चेअरचे !" आई हसू दाबत म्हणाली.

" कोण पहाडसिंग ?" संजयराव आत येत म्हणाले.

" ही पहाडसिंग तुमची लेक !" 

" पहाडसिंग तर नाही काकडीसिंग दिसते ती मला ." संजयनेही सुप्रियाच्या सुरमध्ये सुर मिसळला. आता तर स्वप्निलला खूप हसायला आलं.
"पहाडसिंग, काकडीसिंग "म्हणून जोरजोरात हसत होता.

"बाबाऽऽ आईऽऽ माझा पचका केला काय? सबको बराबर देख लूँगी.काकडीच्या ऐवजी चवळीची शेंग म्हटलं असते मला ! " तिने नाक फुगवून म्हटले. " 
 
"बाबा,आई रागवल्यावर माझी मदत तर लागेलच ना ,तेव्हा बघू आपण ! " हे ती हळूच बाबांच्या कानात म्हणाली. तसा बाबांचा चेहरा उतरला. 

"असं नको ना म्हणू स्वीटी !" ते लहान मुलांसारखा केविलवाणा चेहरा करत म्हणाले.

" ठीक आहे . मला दादाच्या एंगेजमेंटला घागरा पाहिजे. ओके."

" ओके बाबा , तू म्हणशील तसं !" संजयराव स्वप्नालीला म्हणाले तशी तिची कळी खुलली.तिला जिंकल्यासारखी भावना आली. हसत गप्पा मारत सर्वांचे जेवण झाले. रात्री राहुलसोबत बोलून झाले त्यानेही अभिनंदन केले. फोनवर बोलून झाल्यावर,आजचा विचार करतच,आज सकाळपासून त्याला सुखद धक्के मिळाले होते .त्याच विचारात सुंदर स्वप्नात तो झोपी गेला. दुसऱ्या दिवशी सकाळीच तो हॉस्टेलला निघून गेला पण जातांना बॅगमध्ये विजयाचा फोटो घ्यायला विसरला नव्हता.


क्रमश ..

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
Circle Image

@* धनदिपा*@

Housewife

"Simplicity is the true beauty".