प्रतारणा .. भाग - 33

"ही कोण आहे ?" स्वप्निलने त्या फ्रेम कडे हात दाखवत म्हणाला. " माझी ताई आहे ती " " हीच का जी हॉलमध्ये साडी नेसून बसली आहे."" हो … तुम्ही पाहिले नाही का तिला ? का विचारताय असं ! मग केव्हाचेच काय पाहत होता तुम्ही, का तुम्हाला पसंत नाहिय का ती " सोनू विचित्र नजरेने त्याच्याकडे पाहत होता.

प्रतारणा ..


भाग -33



" एक मिनिट थांबा स्वप्निलराव, सोनू यांना बेसिन जवळ घेऊन जा." मुलीच्या बाबांनी त्या सात वर्षाच्या सोनूला सांगितले. आणि तो उठून निघाला. स्वप्निल ही उठून उभा राहिला. तो जाण्यासाठी सोनूच्या मागे गेला. हॉलमध्येच एक मोठा फॅमिली फोटोफ्रेम होती. त्यात विजया तिचे 
आईबाबा, बहिण आणि भाऊ होते. समोर चेअरवर आई बाबा आणि त्यांचे मागे हे तिघेही उभे होते. त्याने ती फ्रेम पाहिली.इथेही त्याला विजयाच दिसली. जाता जाता त्याला एक खोली दिसली त्याचे दार उघडेच होते समोर बेड च्या वरती दोघी बहिणीचा फोटो लावलेला होता त्याने पटकन बेसिनजवळ जाऊन डोळ्यांवर पाण्याचे हबके मारले. सोनूने त्याला रुमाल दिला.

"जिजू, तुम्हाला केस विंचरायचे असतील नं तिथे त्या रुममध्ये ड्रेसिंग टेबल आहे .तिथे करा ." तो आत गेला त्या रुममध्ये विजया आणि इंद्राचे फोटो होते.

"ही कोण आहे ?" स्वप्निलने त्या फ्रेम कडे हात दाखवत म्हणाला. 

" माझी ताई आहे ती " 

" हीच का जी हॉलमध्ये साडी नेसून बसली आहे."

" हो … तुम्ही पाहिले नाही का तिला ? का विचारताय 
असं ! मग केव्हाचेच काय पाहत होता तुम्ही, का तुम्हाला पसंत नाहिय का ती " सोनू विचित्र नजरेने त्याच्याकडे पाहत होता. 

"ते ती या फोटोमध्ये खूप वेगळी दिसतेय ना म्हणून ।" काय सागावं म्हणून त्याच्या तोंडात जे आले ते तो हसून सांगून मोकळा झाला.

'म्हणजे माझा भास नाहिय तो ती खरीच आहे. म्हणजे तिला बघायला आलोय मी. आणि मी मूर्ख कितीवेळचा बघत नाही स्वीटू सांगतेय …वहिनी ही म्हणाली …बघ नंतर पस्तावशील म्हणाली किती हिंट दिल्या तिने , मला कळतच नव्हते . त्याने पटक्यात आवरले. चेहरा ठीक केला, केसांवरून कंगवा फिरवला. आता तर त्याला हॉलमध्ये जाण्याची खूप घाई झाली. कायच्या काय आनंदित झाला तो .. चेहरा एकदम टवटवीत झाला .

"चलायचं जिजू?" सोनू म्हणाला .

" काय म्हणाला मला." स्वप्निलचे आता जिजू शब्दवर लक्ष गेले

" चलायचं जिजू म्हणालो मी."

"जिजू म्हणाला तू मला ."

" हो . का? म्हणू नको तुम्हाला ."

" मला आवडले तुझ्या तोंडून जिजू ." स्वप्निलने जिजू शब्दावर जोर देत म्हणाला. त्याला खुषीतच उचलून घेतले आणि त्याच्या गालावर पप्पी दिली. हे वेगळे की त्याने पटकन हाताने पुसून घेतली.

"काय रे आवडली नाही का माझी पप्पी ?"

"तुमची मिशी टुचतेय मला आणि माझ्या ताईंशिवाय मला कुणाचीही पप्पी आवडत नाही. "

" मला पण तिचीच पप्पी आवडेल." तो ओठांत बडबडला.

" काय म्हणालात तुम्ही?" त्याने दाताखाली जीभ चावली.

"काही नाही, चल जाऊया !" म्हणत रुमच्या बाहेर आला. तितक्यात त्याच्या समोर स्वप्नाली आली.


तिकडे सुप्रिया आणि संजय तिला प्रश्न विचारत होते आणि ती त्या प्रश्नांची उत्तरे देत होती. सुप्रियाला मुलगी पसंत होती तिने तिथेच संजयरावांना डोळ्यांनीच हो सांगितले होते. 


" दादा , किती वेळ करतोय ! साफ झाला का डोळ्यातील कचरा? माझी वहिनी वाट पाहत आहे. तिला असं वाट पाहायला लावू नको काय " ती एक हात कमरेवर ठेवत म्हणाली. एक बोट त्याच्यासमोर नाचवत त्याला ऐकू जाईल अशा आवाजात म्हणाली.

" स्वीटू, अजूनही तुला माझी खेचायचीच आहे का? लबाड़, नाटकी !" तो प्रेमाने रागवत म्हणाला .
" आता नको रागवू ! घरी जितके लागेल तितके बोल पण आत्ता नको ! सर्व वाट पाहत आहे तुझी , चल लवकर !" म्हणत ती दोन पाऊल पुढे गेली आणि पुन्हा माघारी आली.

" बाय द वे दादा , तुला मुलगी पसंत आहे की नाही ?" पटकन बोलून, त्याला चिडवून ती लगेच बाहेर गेली . तो हसला आणि हॉलमध्ये येऊन बसला.

" स्वप्निलराव ,तुम्हाला मुलीला काही विचारयचे असेल तर विचारू शकता?" मुलीचे मामा म्हणजे रवी म्हणाला.

" नाही मामा, मला काही विचारायचं नाही. माझ्या आई बाबाने तर विचारले ना बस ! मला काहीच विचारायचे नाही."

" बरं काही हरकत नाही."

" मग सुपारी फोडून घ्यायची का? दामले साहेब." स्वप्निलचे वडिल संजयराव म्हणाले इंदरने, रवी ने आणि घरातील महिलामंडळ, छोट्या भावांनीही संमती दिली. हा दुसरा झटका होता स्वप्निलसाठी म्हणजे त्याच आणि विजयाचे लग्न फिक्स झाले. आता तो नाचायचा बाकी होता . पण सगळ्यांसमोर नाचू ही शकत नव्हता. संजयने स्वप्निलची फायनल परिक्षा संपल्यावर साक्षगंध करू असे सांगितले. तोपर्यंत आपण सुपारी फोडण्याचा निर्णय घेतला आणि सुपारी फुटली.

कुठल्याही आईवडिलांना आपल्या मुलाच्या आनंदातच त्यांचा आनंद असतो. अगोदर मुलाला रागवणारी आई , मुलासाठी हो तर होते पण विजयाला परखायचेती होते. आणि परखल्याशिवाय त्या हो म्हणाले नाही. आणि सर्व जुळवून मुलाला आश्चर्याचा धक्काच दिला.

स्वप्नाली तर सगळ्यांसोबत अशी बोलत होती ती आधीपासूनच सर्वांना ओळखत आहे. स्वप्निल दोन छोट्या साल्या सोबत बोलत होता. मोठा साला वेदांत कामात मदत करत होता. कारण आता जेवण झाल्याशिवाय जाऊ देत नव्हते.. पुरुषमंडळी हॉलमध्ये बसून गप्पा मारत होते. अधून मधून सप्निल ही त्यात सामील होत होता. तर कधी त्या गप्पांमध्ये बोर होत होता. त्यात त्याला मनभरून विजयाला पाहताच आले नाही. आधी त्याने पाहिले नाही नंतर सगळे त्यांच्याकडे पाहत होते म्हणून पाहिले नाही. स्वप्नाली आणि विजया विजयाच्या रुममध्ये गेल्या. स्वप्नाली विजया खूप बोलत होत्या. इकडे स्वप्निल बाबू झुरत होते बोलायला एक नजर पाहायला, जेवण बनवले तसे सर्व पुरुष मंडळी जेवाणाला एका पंगतीत बसले.

"सुनबाईंनी जेवण वाढव असं आमची इच्छा आहे दामले साहेब !"

"हो . मी बोलवतो विजयालक्ष्मीला !" त्यांनी विजयाला बोलवून घेतले. विजया ताट घेऊन आली . बासुंदी, पुरणापोळी , बटाट्याची भाजी , वरण , भात , आमटी , कांदाभजी, पापड, कुरड्या .. इतके पदार्थ पाहून तर सर्व खुष झाले रोहित आणि सोनूला तर सण असल्यासारखेच वाटत होते. तिने प्रत्येकाला वाढलं आणि ती त्यांना गरमा गरम आणून वाढत होती. सगळ्यांना वाढत असतांना स्वप्निलच्या ताटातील पुरुणपोळी आणि बासुंदी संपली होती तरी त्याला वाढायला जात नव्हती. त्याला तर वेदांत वाढत होता.

" विजया स्वप्निल रावांना पोळी आणि बासुंदी वाढ!" तिच्या बाबांनी सांगितले . ती किती वेळचा विचारच करत होती . तिकडे जाऊ कि नाही म्हणून. पटक्यात तिने गरम साजूक तुपाची पोळी आणि वाटीत बासुंदी एक चमचा वाढली.

" बस !" तो म्हणाला तरीही तिने आणखी एक चमचा बासुंदी घेतली आणि त्याच्या ताटातील वाटीत टाकली. वाढून तर ती निघून गेली. स्वप्निलने गालात हसून त्याने संपवली आणि संपवणार कसं नाही ,इतके प्रेमाने वाढली आहे तर खाऊन संपवावलाच पाहिजी होती ना. 
'ही अशीच वाढत राहिली तर लवकरच माझ पोट बाहेर येईल. ' त्यांच्या मनात विचार चमकला .
सगळ्यांची जेवण झाली. माणसे हॉलमध्येच गप्पा मारत होते तर स्वप्निल , वेदांत बाहेर छोट्या बगीचात आले. बगीचात छान सावली होती आणि बसायला एक बाक हि होता

"कोणी बनवला हा बगीचा ?"

"विजयाताईने बनवला आहे. तिला खूप आवड आहे फुला झाडांची, तिनेच लावले आणि खूप काळजी घेते ती ! अगदी छोट्यांमुलासांरखी !" वेदांत त्याच्या ताई बढ्दल भरभरून बोलत होता. आणि स्वप्निल खुष होत होता.

विजयाने सुप्रियालाही जेवण वाढले. आणि स्वप्नालीला तर एक मैत्रीण मिळाली तिने तर जबरदस्तीने विजयाला तिच्याच ताटात जेवयाला बसवले. गप्पा करतच सगळ्यांची जेवणे झाली.

"स्वप्निलच्या परिक्षेनंतर आपण साक्षगंध करूया !" म्हणत ते सगळ्यांचा निरोप घेऊ लागले. विजया येऊन सगळ्यांच्या संजयराव, सुप्रियाच्या पाया पडली. ती स्वप्नालीच्याही पाया पडायला खाली वाकली. पण स्वप्नालीने तिला उठून उभं केले.

"काय करतेस वहिनी तूऽ, दादा माझ्यापेक्षा वयाने मोठा आहे तू मोठी आहेस. दादा माझा बाबांसारखा आहे तर तू आईसारखी मैत्रिणीसारखी आहे. आणि आई मुलीच्या पाया पडत नाही." स्वप्नाली.

"आव स्वप्नाली ताई, पडूद्याकी लहान नणंदेच्याही पाय पडण्याची पद्धत असते." आजी म्हणाल्या.

" नाही आजी मला नाही पटले हे, मी लहान असतांना त्यांनी का पाया पडावं माझ्या ! अशी पद्धत काय कामाची आजी तो फक्त दाखवण्यापुरती असते. नाते तर मनाने जपली जातात मानाने किंवा पद्धत म्हणून नाही." स्वप्नाली आजीला समजवत म्हणाली. आजी समवेत सगळ्यांनाच तिचे खूप कौतुक वाटले. तिने विजयाला मिठी मारली. विजयाने तिच्या मिठीत घेऊन तिच्या डोक्यावरून हात फिरवून तिच्या कपाळाची किशी घेतली. स्वप्निल ही सर्वाच्या पाया पडल्या आजीच्याही. मग स्वप्नालीने आजीच्या पाया पडली आजीने तिच्या अल्याबल्या घेऊन डोक्यावरून हात फिरवून तिच्या गावावर पप्पी दिली. 

"अशी नणंद असली तर कुठेच नणंद भावजय मध्ये भांडण होणार
नाही ." आजी म्हणाली .

"आजी काय हरभऱ्याच्या झाडावर चढवताय , माझ्या वजनाने तुटून जाईल की ते !" स्वप्नाली म्हणाली आणि सर्वच हसायला लागले .
रोहित सोनूला स्वप्निलने चॉकलेट दिल्या. सगळ्यांचा निरोप घेऊन ते गाडीत बसले. सर्व बाहेरपर्यंत सोडायला आले. सर्वात शेवटी विजया होती. स्वप्नाली गाडीतून सर्वांना हात हलवून बाय करत होती . गाडी लांब जाईपर्यंत सर्व त्यांना बाय करत होते.

क्रमश ..
 



🎭 Series Post

View all