प्रतारणा .. भाग - 31

आज मैं उपर आसमा नीचे,आज मै आगे जमना है पीछे ।त्याचे अचानक मागे लक्ष गेले तर स्वप्नाली हाताची घडी घालून त्याच्याकडे हसून बघत होती ."काय दादा आज लय खुष आहेस तू , वहिनी हो म्हणाली का?""स्वीटी, तूला कसं काय कळत ग माझ्या मनातील ?" काय आहे ना दादा , मी तुझी बहिण आहे आणि तूझा चेहरा वाचू शकते. बरं हे सांग आधी वहिनी हो म्हणाली ना ?"

प्रतारणा ..


भाग - 31


                       विजयालक्ष्मी निघून गेली तरीही स्वप्निल मंदिरात बसून होता. त्याने देवाचे आभार मानले, राहुलला फोन करून मंदिरात बोलवून घेतले. परिक्षेच सोडून त्याने सर्व राहूलला सांगून दिले. राहूलने आनंदाने स्वप्निलला मिठी मारली. आणि ते घरी निघाले. आनंद तर स्वप्निललच्या चेहर्‍यावर ओसंडून वाहत होता. हा आनंद घरच्यांच्या नजरेतून खास करून स्वप्नालीच्या नजरेतून सुटला नाही. सर्वांचे जेवण झाल्यावर ती त्याच्या रुममध्ये आली.तो त्याच्याच धुंदित गाणं गुणगुणत होता .
आज मैं उपर आसमा नीचे,
आज मै आगे जमना है पीछे ।

त्याचे अचानक मागे लक्ष गेले तर स्वप्नाली हाताची घडी घालून त्याच्याकडे हसून बघत होती .

"काय दादाऽ , आज लई खुष आहेस तूऽ , वहिनी हो म्हणाली का?" तिने भूवया उंचवत म्हणाली.

"स्वीटी, तूला कसं काय कळत ग माझ्या मनातलं ?

" काय आहे ना दादा , मी तुझी बहिण आहे आणि तूझा चेहरा वाचू शकते. बरं हे सांग आधी वहिनी हो म्हणाली ना ?"

"हो म्हणाली ती, पण लवकरात लवकर घरी रितसर बोलणी करावी लागणार आहे. तिच्या घरांच्याची संमती असल्याशिवाय ती लग्नाला उभी राहणार नाही. असं तिचं ठाम मत आहे."

" दादा, तू अजिबात टेंशन घेऊ नको. तुझं लव मॅरेज अरेंज करून घेऊ." स्वीटी त्यांच्या खांद्यावर हात ठेवत म्हणाली.
थांब एकमिनिट म्हणून ती पळत पळत खाली आली आणि फ्रिजमधून तिने आईसक्रिम दोन वाटीत काढून ती घेऊन आली.

"दादा , आपण सेलिब्रेट करूया ! " म्हणून ती चमच्याने तिच्या भावाला आईस्क्रीमचा घास भरवला मग त्यानेही त्याच्या लाडक्या बहिणीला आईस्क्रीमचा घास भरवला. आईस्क्रीम खाऊन ती शुभरात्री बोलून निघून गेली. 
         अभ्यासा करिता सुट्ट्या मिळाल्या होत्या विजयाही अभ्यासाला लागली होती . स्वप्निल ही त्याचे शेवटच्या वर्षाचे पेपर साठी जीव तोडून अभ्यास करत होता. त्याला चांगलेत चांगले मार्क्स मिळावायचे होते. पेपरांना सुरवात झाली. विजया आणि स्वप्निल दोघही पेपर देत 
होते,कधीकधी जातांना विजया स्वप्निलला दिसत होती. पण ती मात्र त्याला अनोळखी असल्याचे दाखवत होती, पण तरीही तो जवळ असल्याचे संकेत तिला तिच्या हृदयाकडून मिळतं होते. तिने तिच्या मनातील भावना कधी चेहर्‍यावर दिसू दिल्या नाही. शेवटचा पेपर होता स्वप्निल मुद्दाम बाहेर थांबला होता. तिचा पेपर संपला तशी ती बाहेर आली. तो दूर झाडाखाली थांबून तिच्याकडे पाहत होता. तिने आजूबाजूला पाहिले तिला तर तो दिसला नाही. "नेहमीच तर तो इथे उभा राहतो पण आज दिसत का नाहीये ?" ती आणखी आजूबाजूला नजर भिरभिरवली .

"विजयालक्ष्मी, कोणाला शोधतेय?" सीमा.

" कोणाला नाही गं?"

"मग इकडे तिकडे काय पाहतेय?" 

"काही नाही चल !" ती थोडी हिरमुसली,पण कोणीतरी आज खुष होत तो होता स्वप्निल तो कितीवेळचा तिच्याकडे पाहत होता. तिच्या डोळ्याची अस्थिरता, तिच्या चेहऱ्यावरची उदासिनता त्याला हेच दाखवत होती की तिला ही त्यांच्याबद्दल ओढ आहे. चालता चालता तो दिसला तर तिच्या चेहऱ्यावर चमक आली. तो तिच्याकडे पाहून गालात हसत होता दोघांची नजरानजर झाली. तिने लगेच नजर खाली केली. गालावर टोमॅटो सारखे लाली चढली.

"अग विजया तुझे गाल लाल का झालेत?"

"कुठे झाले लाल ? अगं उन्हामुळे झाले असतील, म्हणून तूला तसे दिसताय ."

"आज शेवटचा पेपर आता उद्यापासून सुट्ट्या. मी लवकरच मामाच्या गावाला जाणार आहे. म्हणून मी आनंदी आहे." कसेतरी तिने सीमाला आनंदाचे कारण सांगितले खरे पण थोडफार सत्य तर होतेचे
त्यात." घरात स्थळांचा विचार तरी कोणी करणार नाही. आणि आत्या जर आली तर तिथे नक्कीच तिच्या मुलाविषयी बोलणार ,त्यापेक्षा नको मामाकडेच जाते ! मामाच्या मुली सोनाली विजया समवयस्क असल्याने त्यांचे छान जमत होते. सिद्धु त्यांना खूप हसवत होता. कधी रात्री त्यांना भूतांच्या गोष्टी सांगून घाबरवून मस्करी करत होता आणि मग हे रागवून त्याच्या पाठी मारायला धावत सुटतं. तो इकडेतिकडे धावत होता आणि ह्या त्यांच्या मागे मागे .विजया तिघही मामांच्या घरी जाऊन आली. सुट्ट्या संपल्या विजयाचा पहिल्या वर्षाचा निकाल लागला विजया चांगल्या मार्कांनी पास झाली. तर स्वप्लिनने कॉलेजमध्ये टॉप केले.ती ऐकून आनंदली. स्वप्निल ने MA Ed साठी दुसऱ्या शहरात प्रवेश घेतला आणि तिथेच हॉस्टेलला राहून जोमाने अभ्यास करू लागला. पहिल्या वर्षी तो चांगल्या मार्कांनी पास झाला. इकडे विजयाला एक एक करून पाहुणे येत होते. कधी मुलाकडच्यांना आवडायचे नाही तर कधी मुलीकडच्यांना आवडायचे नाही.अशातच तिचे दुसर वर्ष पूर्ण केले. विजयालक्ष्मी ने एकदिवस वैदेहीला विश्वासात घेऊन स्वप्निलबद्दल सांगून टाकले. ते बोलणी करायला येणार आहेत आणि हेही सांगितले की, तू आणि बाबांनी जर नकार दिला तर मी लग्न करणार नाही. स्वप्निलला टेंशन आले होते घरी कसं सांगायच ? सुट्टी असल्याने तो घरी आला, त्याला विजयाबद्दल माहिती होतं होते प्रत्येक पाहुण्याखेरिज स्वप्निल देवाला सांगड घालत होता. त्याचाच विचार तो करत होता. एक दिवस आईने त्याला विचारलेच .
" स्वप्निल काय झालयं , तू खूप टेंशनमध्ये दिसतोय? कसलं टेंशन घेतोय,जेवणही व्यवस्थित करत नाहीये? सुप्रिया काळजीने विचारत होत्या.

" आई, कसं सांगू ग तुला , तू अजिबात चिडणार नाही ना? मला भिती वाटते तू रागवशील म्हणून ?"
" नाही रागवणार तू बोल!" स्वप्निलने त्याच्या हातात आईचा हात घट्ट पकडून घेतला.

" आई, मी एका मुलीवर प्रेम करतो आणि मला तिच्यासोबत लग्न करायचं आहे. आई प्लिज रागवू 
नको नाऽऽ ."

"कोण आहे ती ,कशी आहे, कोणाची मुलगी आहे ?" सुप्रिया.

"तिचं नाव विजयालक्ष्मीआहे. " तो तिची संपूर्ण माहिती सुप्रियाला सांगतो. आई तेच ऐकून घेत असतांना अचानक उठून रुममध्ये निघून गेली.स्वप्निल आई आई आवाज देत असूनही सुप्रिया उत्तर देत नव्हती..

"आई नक्की रागवली आहे. " आईच्या मागे जाऊन रूमचा दरवाज्यावर टक टक करूनही आईने दरवाजा उघडला नाही. मग मात्र तो त्याच्या रुममध्ये निघून गेला. त्याच्या रुममध्येही चेहरा पाडून बसला होता. त्याने खूपवेळा बोलण्याचा प्रयत्न केला पण आई याविषयावर काहीच बोलत नाही, आणि तो ही मग हॉस्टेलवर निघून गेला काहीकरून त्याला त्याचं ध्येय साध्य करायच होते, सर्व विचार बाजूला सावरून अभ्यास करू लागला. आईबाबांसोबत स्वप्नाली सोबत फोनवर बोलणे होतं होते आई मोजकेच बोलत होती. सुप्रियाने संजयने स्वप्निलला फोन करुन अर्जंट बोलवून घेतले. स्वप्निल घरी आला .

" आई बाबा तुम्ही मला इतकं अर्जंट का बोलवून घेतले ?"

"आधी तू फ्रेश होवून येऽऽ, मग आपण बोलू?"

" ठीक आहे ."स्वप्निल रुममध्ये जाऊन छान अंघोळ करून आला. प्रवासाचा थकवा गरम पाण्याने निघून गेला. बाहेर येऊन बसला आणि सुप्रियाने त्याला कडक चहा दिला. चहा पिऊन तो म्हणाला ,

"बाबा सांगा ना काय झालं?"

"स्वप्निल आपण उद्या तुझ्या करीता मुलगी बघायला जाणार आहोत. असं ही तुला आता जॉब लागेलच तोपर्यंत मुलगी पाहायला सुरवात करू. मुलांची लग्न वेळेत व्हायला हवी."

" पण बाबा .."
" पण नाही आणि बिन नाही मी त्यांना उद्या येण्याचे सांगितले आहे. सकाळी अकरा वाजता निघायचं आहे, तर लवकर आवरून तयार राहा. आणि आधी ती वाढवलेली दाढी आहे ना ती काढ, कसा दिसतोय तूऽ? एकदम भगवे वस्त्र परिधान केलेल्या महाराजांसारखा ." संजयराव मध्येच त्याचे शब्द तोडून म्हणाले.
" तेच बनायचे राहिले आहे आता " तो मनातच म्हणाला. त्याने आईकडे बघितले तर आईने त्याच्याकडे लक्षच दिले नाही. रुममध्ये जाऊन तो डोकं धरून बसला होता. डोळ्यात पाणी येत होते. फायनल परिक्षा झाल्यानंतर तो बाबांना सांगणार होता त्या आधीच त्यांनी मुलगी बघण्याचा प्रोग्राम ठरवला. आता काय करू मी? स्वप्नाली बाहेर गेलेली होती ती आली आणि सरळ त्याच्या खोलीत गेली.

" दादा कधी आलास ?" स्वप्नाली म्हणाली पण त्याचे लक्ष नव्हते ,डोळ्यांत अश्रू दाटलेले होते ,तिने पाहिले आणि त्याच्या जवळ जाऊन त्याच्या खांद्यावर हात ठेवून म्हणाली.

"काय झालं दादा तू असा अवतार करून बसलास ? बोल ना ."

" स्वीटू, बाबांनी उद्या मुलगी बघायला जायचं ठरवलं 
आहे."


क्रमश ...


©® धनदिपा 

🎭 Series Post

View all