प्रतारणा .. भाग - 27

म्हणजे माझी तिची काही खास ओळख नाही गं, एकदा काय मी पायऱ्यांवरून जात होतो. मला तिथे काम असल्यामुळे मी तिथे गेलो होतो .ती माझ्या पुढे मी तिच्या मागे होतो. चालता चालता तिचा पाय मुरगळला आणि तिचा तोल गेला , ती मागे पडणार होती तर मी फिरलो आणि ती माझ्या पाठीवर आली. तिने घाबरून माझा हात पकडला पण तिने पटकन स्वतःला सावरलं आणि उभी राहिली पण तिला उभही राहता येत नव्हते. तिच्या पायातील वेदना तिच्या चेहर्‍यावर दिसत होती.

प्रतारणा ..



भाग - 27

      

   

              स्वप्निल खुषीतच घरी गेल्यावर स्वप्नालीने त्याला विचारून विचारून हैराण केले होते . तिने त्याची चोरी पकडली होती . त्याने तिच्यासमोर हात टेकवले आणि तिला सर्व सांगण्याचे कबूल केले .

स्वप्निल संजयराव शिंदे . मधुकररावांचे चिरंजीव त्यांना प्राध्यापक व्हायचे होते आणि त्यांच्या घरातील चिव चिव करणारी चिमणी म्हणजे स्वप्नाली . स्वप्नाली ही स्वप्निल पेक्षा पाच वर्षानी लहान होती. संजयराव हे जिल्हा परिषद शाळेल शिक्षक म्हणून कार्यरत पदावर आहेत आई सुप्रिया ही गृहिणी आहे. असे हे चौकोनी सुखी कुटूंब. स्वप्निल
 एम ए च्या शेवटच्या वर्षाला होता . त्याने तिला वरती त्याच्या रुमच्या गॅलरीत घेऊन गेला.

"हं बोल चिमणी , काय चिव चिव करायचे आहे तूला !"

तिने नाक फुगवून एक फटका मारला.

"दादा याचा ना असा सूड घेईल तूझं लग्न झाल्यावर बघच तू !"

" नको नकोऽऽ बाई , तुझे काही खरं नाही तू घेशील ही." त्याने पुन्हा हात जोडला.

"आता कसा बोललास ! " तिने अंगठा दाखवून त्याला जीभेने वाकुल्या दाखवीत चिडवले. तो हसला आणि तो थोडवेळ शांत बसला.

" काय झालं दादा तू असा शांत का बसला , काय विचार करतोय
इतका ?"

" स्वीटी, माझं प्रेम मिळेल का मला ?"

" का नाही मिळणार दादा ? , तू प्रेम जर खरं असेल तर नक्की मिळेल."

"खरं म्हणजे काय स्वीटी खरचं आहे गं ! तिला अजून यातल काहीच माहिती नाही आणि आज तिला पाहुणे आले होते बघायला !" त्यांच्या बोलण्यात प्रेमाची आगतिकता दिसून येत होती.

" कायऽ तिला ही माहिती नाही आणि तूला कसे कळले की , तिला पाहुणे आले होते बघायला."

"आज ती तिच्या बाबांसोबत स्टुडिओत फोटो काढायला आली होती, आपल्याकडे साडी कधी नेसतात मूली ?पण ती आज साडीत अतिशय सुंदर दिसत होती." विजयालक्ष्मी पुन्हा काही क्षण त्याच्या नजरेसमोर आली . सांगतांना सुद्धा तो ब्लश करत होता. 

"ओय होय !किती लाजतोय माझा भाऊ ,आणि ती जर तुझ्या जवळ आली तर .."

"तर माझं काही खरं नाही." तिच्या जवळ येण्याच्या बोलल्याने स्वप्निल चे हृदय उड्या मारत होते.

"आता पहिल्यापासून सांग काय ते."

"म्हणजे माझी तिची काही खास ओळख नाही गं, एकदा काय मी पायऱ्यांवरून जात होतो. मला तिथे काम असल्यामुळे मी तिथे गेलो होतो .ती माझ्या पुढे मी तिच्या मागे होतो. चालता चालता तिचा पाय मुरगळला आणि तिचा तोल गेला , ती मागे पडणार होती तर मी फिरलो आणि ती माझ्या पाठीवर आली. तिने घाबरून माझा हात पकडला पण तिने पटकन स्वतःला सावरलं आणि उभी राहिली पण तिला उभही राहता येत नव्हते. तिच्या पायातील वेदना तिच्या चेहर्‍यावर दिसत होती.

" तुम्ही ठीक आहेत का?" मी म्हणालो.

" हो .. थँक्य यू . माझ्यामुळे तुम्हाला कुठे लागलं नाही 
ना ?" ती म्हणाली.

" नाही मला काही नाही झालं, पण तुम्हाला चालता येत नाही . मी काही मदत करू का?" मी म्हणालो.

" नको नाही, दोघांना असे एकत्र पाहिले की कॉलेजमधील मुले सर्वीकडे पसरवतील , चिडवतील आणि माझ कॉलेज येणे ही बंद होईल. थँक्य यू सो मच " म्हणून ती लंगडत निघून गेली. मी ती गेल्या दिशेनेच पाहत होतो. तिचा हाताचा मुलायम स्पर्श झाला तेव्हा माझा रोम रोम हर्षित झाले होते. हलकासा मोगऱ्याचा सुवास दरवळला, तो सुगंध माझ्यातूनच येतोय की काय ? कसे मला वाटत होते मी कितीवेळा माझ्या हाताकडे पाहत राहिलो मग मी माझ्या कामाला निघालो. मी तिला रोज कॉलेजला येतांना पाहतो. अनोळखी मुलांशीच काय तर मुलींशीही ती बोलत नाही. तिच्या गावातील पाच सहा मूली येतात त्यांच्या सोबत असते ती आणि तिची एक मैत्रिण सिमा तिच्यासोबत असते.पण रोज माझी नजर तिला शोधत होती. ती दिसली की माझ्या चेहर्‍यावर आनंद दिसत होता. नाजूकशी विजयालक्ष्मी कधी माझ्या मनात घर करून गेली मला कळलेच नव्हते.राहूल ने नोटिस केली मी माझी नजर कोणाला शोधत असते. असाच मी आणि राहूल बाहेर उभे होते. तर ती कॉलेजच्या आत येत होती आणि मी तिच्याचकडे पाहत होतो. अबोली कलरच्या चुडीदार ड्रेस परिधान करून येत होती. राहुल बोलत होता पण माझ लक्षच नव्हत त्याच्याकडे म्हणून त्याने माझ्याकडे पाहिले तर मी तिला पाहत होता. त्याने माझ्या नजरेला नजर लावून पाहिले तेव्हा त्याला कळले .

"कही पें निगाहे कही पें निशाणा !" त्याचे गाणे म्हणणे चालू झाले होते. ती आत गेली. मी ती गेलेल्या दिशेने पाहत होतो.

"सुंदर दिसत होती ना ती आज ."

 "हो. तो अबोली रंग खुलून दिसत होता तिला ." मी माझ्याच तंद्रीत बोललो.

" येऽऽ , येऽऽ फसलाऽऽ. "

"कोण फसलं " मी भानावर येऊन म्हणालो.

" तुला काय वाटतं ? मी ,तू आणि कोण?" त्याने मलाच प्रश्न विचारला .

" चल हट मी नाही ." मी टाळाटाळ करत होतो.

" नजर के सामाने जिगर के पार , 
कोई रहता है , वो हो तूमऽऽ " राहूलचे पुन्हा गाणे म्हणणे चालू झाले. मी त्याच्या पाठीत एक धपाटा घातला . मग तो मागेच लागला सांग काय ते मग सांगितल त्यालाही . मग रोज तिला दुरूनच पाहत होतो. तिला तर याची कल्पना ही नाही. म्हटले आता व्हॅलेंटाईन डेला तिला मनातील भावना व्यक्त करू पण ती आलीच नाही. राहिल ते राहिलचं आणि आज कळलं की तिला बघायला पाहुणे आले होते." असं बोलून तो थांबला.

" असं आहे तर ... ' यू डोन्ट टेक टेंशन .. मैं हू ना भाई ." स्वप्नाली त्याच्या गळ्यात हात टाकत म्हणाली. तो थोडासा हसला.

"मला लवकरात लवकर माझं ध्येय पूर्ण करून तिला रितसर मागणी घालायची आहे . परमेश्वरा तोपर्यंत तिला कोणाचा होकार येऊ नये म्हणजे झालं ." तो हात जोडत म्हणाला.

"होईल होईल तसचं होईल !" स्वप्नालीने त्याच्या म्हणण्याला दुजोरा
दिला .

" दादा, तू आधी वहिनीशी बोल ! तिला सांग तूझ्या मनात काय आहे ते."
 
"हम्म ती बोलली पाहिजे ना,ती तर पाहत ही नाही माझ्याकडे."

" तू बोल आधी तिच्यासोबत मग पुढचे पुढे बघू ! " त्याला तिच्या शब्दांनी धीर आला आणि त्याची इच्छाशक्ती आणखीनच प्रबळ झाली.

*****
विजयालक्ष्मी फोटो काढून आल्यावर तिथल्या स्टुडिओतील गंमती सांगत होती.

"आई त्या फोटोग्राफरने मला असे पोझेस सांगले की मला हसायलाच येत होते . मग दोन तीन साधे पोझ दिले. मला राहून राहून ते आठवून आता ही हसू येते. त्या फोटोग्राफरने करून दाखवल्या होत्या. म्हणून मला जास्तच हसू येतय, मी तिथे हसू ही शकले नाही." विजयाने वैदेहीला फोटोग्राफरची नक्कल करून दाखवली. तशी आई आणि इंद्राही हसायला लागली.
 
रात्री जेवण करून झोपले . सकाळी लवकर उठून कॉलेजला जावे लागत होते .यासाठी वैदेही तिला उठवायला आली ,वैदेहीने तिच्या कपाळावर हात फिरवायला हात लावला आणि वैदेहीला तिच्या कपाळाचा चटकाच बसला. इतकी ती तापाने फणफणली होती. वैदेहीने तिच्या कपाळावर थंड पाण्याच्या पट्ट्या ठेवल्या.  वैदेहीने तिला झोपू दिले. तिच्या अंगावर गरम दुलई पांघरली. ती गाढ झोपली. तिला स्वप्न पडले तिचे आजोबा वैदेहीचे बाबा तिच्या स्वप्नात आले. कारण ती त्यांची आजी आजोबांची लाडाची होती, बाबा तिला दिसले. ती त्यांच्या जवळ गेली तर दूसरे एक तिच्या आजोंबासारखे दिसणारे आजोबा दिसले आणि पुन्हा तेच आता तिला तिचे आजोबासारखे दिसणारे आजोबा पूर्ण वर्तुळ करून उभे राहिले होते ती मध्ये होते. यातून तिला तिचे आजोबा शोधायचे होते. ती एका जवळ जात होती तर तिला त्यांच्या दोन्ही हात जळालेले पाहिले , ती व्यक्ती तिच्याजवळ जाण्याचा प्रयत्न करत होती आणि ही मागे मागे जात होती. आता तिला पकडणारच होते तर ती पळाली. तिने तिच्या आजोबांना शोधले तिथेच त्यांच्या मांडिवर बेशुद्ध होऊन पडली. आता तिला खूप ताप चढला होता. ती उठतही नव्हती,तिला चालायचीही शुद्ध नव्हती , ती बेशुद्ध झाली होती.म्हणून तिला रिक्षात घेऊन तालुक्याच्या हॉस्पिटला नेले. तिथे तिला एँडमिट करून घेतले. तिचा ताप चेक केला तर 105 degree दाखवत होते. डॉक्टरांनी त्वरित तिच्यावर उपचार सुरु केले. तिला सलाईन लावयला घेतली तर तिची नस सापडत होती . खूप वेळा शोधून ती सापडली आणि आय व्ही कॅन्युला लावून तिला सलाईन मधून इंजेक्शन दिले. तिचा ताप उतरला होता .


क्रमश ..


©® धनदिपा




🎭 Series Post

View all