प्रतारणा .. भाग - 22

"बरं ठिक आहे." इंदर ने तात्पुरता विषय थांबवला . विजया दुरुनच तिच्या पप्पांना पाहत होती. तिला त्यांना तसे पाहून वाईट वाटत होते. इंदर झोपल्यावर ती त्याच्याजवळ जाऊन त्या जखमा पाहून त्यावर अलगद हात लावून वैदेहीच्या कुशीत जाऊन रडू लागली. वैदेहीने तिला समजावले, शांत केले. रोहित झोपेतून उठून रडू लागला. विजया त्याला घेऊन बाहेर फिरायला घेऊन गेली.
भाग - 22 



"बरं ठिक आहे." इंदर ने तात्पुरता विषय थांबवला . विजया दुरुनच तिच्या पप्पांना पाहत होती. तिला त्यांना तसे पाहून वाईट वाटत होते. इंदर झोपल्यावर ती त्याच्याजवळ जाऊन त्या जखमा पाहून त्यावर अलगद हात लावून वैदेहीच्या कुशीत जाऊन रडू लागली. वैदेहीने तिला समजावले, शांत केले. रोहित झोपेतून उठून रडू लागला. विजया त्याला घेऊन बाहेर फिरायला घेऊन गेली.





घरी आल्यावर गावकरी मंडळी एक एक करून त्याला पाहायला आले येताना सोबत नारळपाणी घेऊन येत होते तर कुणी फळ घेऊन येत होते. वैदेही त्यांना चहा नाश्ता करण्यात व्यस्त झाली . गावकरी मंडळी झाली की मग नातेवाईक येत होते मग त्यांचे खाणे पिणे चालायचे. वैदेही तर पुरती बिझी झाली होती .यातून ही तो लवकर बरा होत होता. रोहितच्या येण्यामुळे तिघे मुलांचे मन त्याच्यात रमत होतं ,त्याच्यासोबत खेळण्यासाठी एक एकेचा नंबर लागत होता. काही महिन्यांनी त्यांच्या छातीत पाठीत खूप दुखते होते. दोघं ठिकाणी मुक्कामार लागलेला होता. त्याचे टेस्ट केल्या तर त्याच्या छातीत पाणी झालेले आढळले. कार्डियाक सर्जन ने इंदरच्या छातीतून , पाठीतून इंजेक्शन व्दारे पाणी काढत होते .त्याला शहराच्या हॉस्पिटला जावे लागत होते. इंदर वैदेही आणि वेदांत तिघे मिळून हॉस्पिटला गेल्यावर , विजयालक्ष्मी आणि इंद्राजवळ माया नावाची मुलगी राहत होती. वैदेही तिला छोटी बहिणीप्रमाणे सगळे करीत होती .विजयालक्ष्मी आणि इंद्रा तिला माया मावशी म्हणत होत्या मायाच्या कुटूंबात आई वडिल, दोन भाऊ , दोन बहिणी होत्या.माया ही सर्वात लहान होती. सर्वांचे लग्न व्हायचे होते. सर्व कुटूंब सदस्य रोज वैदेहीच्या घरी जात होते. वैदेहीच्या घरचेही मायाच्या घरी जात होते. इंदर छाया मायाची चेष्टा करत असे.
माया फक्त ,



"पाहा न गं ताई." वैदेहीला गाल फुगवून म्हणत होती. 



"चेष्टा करताय गं तुझी." वैदेही तिला समजवत म्हणाली.
लवकरच छायाचे लग्न ठरले. वैदेही इंदरने छायाच्या लग्नाला खूप मदत केली. विजयालक्ष्मी इंद्रा तर अभ्यासासाठी त्यांच्या माया मावशीला बोलवून घेत होते. इंदर घरी नसतांना माया रात्रीला झोपायला येत होती.


 


वैदेहीचे बाबा रिटायर्ड झाल्यावार त्यांनी वैदेहीजवळ असलेल्या गावात घर घेऊन तिथे राहत होते .वैदेही आणि यशोदा आई मुलांना उन्हाळ्याच्या सुट्टीत मामाकडे वाघोलीला घेऊन गेली. मुलांना खूप आनंद होत होता . रेल्वे गाडीतून प्रवास करायचा सकाळी लवकर उठून पाच वाजताची गाडी होती . मामाच्या गावी जाण्यासाठी कधीच उठायला कंटाळा करत नव्हते. हौशीनी उठून आवरत होते .गाडी बसल्यावर तिघांची खिडकीजवळ बसण्यासाठी भलता हट्ट चालत होता . "तो म्हणतो मी बसणार , ती म्हणते मी बसणार !" मध्ये हे चालत होते. वेदांत छोटा असल्याने त्याला खिडकीजवळ बसायला मिळत होते . तर इंद्रा खूप हट्टी होती . विजयालक्ष्मी मोठी असल्याने तिला समजावत आणि तीही समजून घेत होती. विजयालक्ष्मीला भावूकहून बोलले की, झालचं मग ती हसतच देऊन टाकत होती. विजय मामाकडे गेल्यावर विजया इंद्रा वेदांत खूप आनंदी राहत होते विजय मामाला ही एक मुलगा दोन मुली होत्या . त्यांच्यामध्ये आणि यांच्यामध्ये जास्त वर्षाचा फरक नव्हता त्यामुळे त्यांना तिथे आवडत होते. मामाकडे बकऱ्या आणि कोंबड्या होत्या. वेदु त्या बकरीच्या छोट्या कोकरूला उचलून घेत होता. त्यासोबत खेळत होता. ते पटकन त्यांच्या हातांतून टणकन उडी मारून पळत असे आणि वेदांत त्यांच्या मागे. विजयातर लक्ष्मीमामीची लाडाची होती .लक्ष्मी नेहमी त्यांच्या सोनाली मोनालीला विजयालक्ष्मीचे उदाहरण देत होती . लक्ष्मी आणि वैदेही नवस बोलल्याने मंदिरावर जाऊन नवस पूर्ण करून आणि वेदांतला आशिर्वाद घेऊन आले. हे दोन दिवस अगदी हसत खेळत जात होते ,जातांना मात्र लक्ष्मी यशोदाआईचे आणि वैदेहीचे अश्रू अनावर होत होते. नंतर मोठ्या दादाकडे दोन दिवस पण तिथे या तिघांचही मन लागत नव्हत. कारण तिथे सर्व मोठी मंडळी यांच्या वयाचे कोणीच नव्हते मग त्यांना खेळायलाही जाऊ देत नव्हते.. निता आता खूप मोठी झाली होती.. दिसायला तर ती वैदेहीची कार्बन कॉपीच होती. सोबत चालले तरी पहाणाऱ्यांना ती वैदेहीची लहान बहिण वाटत होती . 
बस्सं !रंगाचा काय तो फरक त्यांच्यात दिसत होता. तिथला पाहुणचार होऊन त्यांची घरी जाण्याची वेळ आली. गाडीत बसून आधी आईच्या घरी गेले . तिथे चहा पाणी घेतले . विजया तिथचं आई बाबांकडे राहिली. वैदेही इंद्रा आणि वेदांतसोबत तिच्या घरी निघाली. घरी गेल्यावर पाहते त काय ? तिथे माया आणि इंदर एकाच ताटात जेवणं करत होते. माया इंदरला घास भरवत होती . वैदेहीने ते पाहिले आणि तिने तिथेच बँग पटकन खाली 
टाकली.





"काय चाललंय हे ?" वैदही तिच्या जवळ जाऊन संतापून म्हणाली. मायाची घाबरगुंडी उडाली.





"काय नाही ताई ."





"ताई म्हणू नको मला , कधीपासून चालू आहे तुमचे ? विजयाचे पप्पा तुम्हाला काहीच कसं वाटलं नाही मला असं फसवतांना ?" ती रडत रडत म्हणाली. वैदेहीने तिला वार्निंग देऊन घरी पाठवली. वैदेही इंदर सोबत बोलत नव्हती. कामाचेच ती बोलत होती. इंदरने गोड बोलून वैदेहीचे मन वळवून घेतले आणि तिनेही मायाच्या घरी काहीच सांगितले नाही. एक वेळेस इंदरने त्याच्या मानलेल्या बहिणीकडे जायचे होते वैदेही नाही म्हणत होती त्याच कारणावरून त्यांच्या वाद झाला आणि इंदरने तिला नाकातून रक्त येईपर्यंत मारले . तिचा हात जोरात वाकवला. ती जोरात कळवळून  रडत होती . तिघही मुल एकमेकांना बिलगून रडत होते तिच्या अंगावर गालावर मारण्याचे वण्र पडले होते . इंदर बाहेर गेल्यावर मुलं तिच्याजवळ जाऊन तिचे अश्रू पुसून सांत्वन करत होते.





"आईऽऽऽ रडू नको .." मुलही रडत होते .एक डोळे पुसत होता तर दुसरा पाणी पाजत होती . एक व्रणावर गरम तेल लावून देत होती. वैदेहीने बॅग भरली आणि तिघे मुलांना घेऊन तिच्या आईबाबाकडे गेली. वैदेहीला असे पाहून आई संतापली.




"येऊ दे आता त्यांना चांगली बोलते मी , दुसऱ्यांसाठी हातापाय तोडेपर्यंत मारावं का? बहिण म्हणता हे तर दोन वेळेस खंब्यावरून पडले तेव्हा का नाही ही बहिण तेव्हा भाऊ आठवला नव्हता का? "




आईने तिला दवाखान्यात नेले तर जोरात वाकवल्यामुळे हाताला सूज आली होती .डॉक्टरांनी पट्टया बांधून दिला. गोळ्या औषधी लिहून दिली. पंधरावीस दिवसांनी इंदर तिला घ्यायला आला तेव्हा वैदेहीची आई शांत पण कडक शब्दांत सुनावले. ती त्यांच्यासोबत जाण्यासाठी नाही म्हणाली तरीही इंदर तिथून गेलाच नाही .अंगणात बाजेवर झोपला. संध्याकाळी ती त्याच्यासोबत घरी गेली. घरातील स्त्री ही एकच गोष्ट धरून बसत नाही. नवरा थोडा चांगला वागला बोलला की ,मग बायको भुलते त्याच्या बोलण्याला .आणि इथेही असेच झाले होते. 

**************
                 

                   काही दिवसानंतर निताचे लग्न होते म्हणून वैदेहीने कपड्यांची खरेदी केली. मुलींना घागरा ,शरारा वेदांतला ड्रेस घेतला. लग्नाला जायचे असल्याने तिने केसांना मेंहदी लावली तर त्यावरूनही तिला मारले. मारतांना इंदर गालावर आणि कानावर मारत होता.तिने लगेच केस धुतले. लग्नाला हळदीच्या दिवशी गेले. लग्न झाले आणि नवरीसोबत तिच्या आक्काला पाठवले तिथे एक दिवस राहयचे होते. तर इंदर लग्न झाल्यावर वैदेहीसोबत भांडून लगेच निमगावाला परतला होता. कारण इकडे मायाच्या मोठ्या भावाचे लग्न होते. त्या लग्नाला इंदरला हजर राहायचे होते. तिथल्या प्रत्येक प्रोग्राममध्ये इंदर हजर होता आणि सगळे आवर्जून करत होता. वैदेही घरी आली. आल्यावर तिला कळले की मायाच्या भावाच्या लग्नात खूप आनंदात सहभागी झाला होता . इंदरने मायाला घागरा घेऊन दिला होता . तिच्या भावाच्या लग्नात इंदरने पैसा पाण्यासारखा खर्च केला होता. हे आता वैदेहीला माहिती पडले होते. किराणा दुकानात जाऊन इंदरच्या नावाखाली फिरणा घेतला जात होता. हे सुद्धा इंदरनेच सांगितले होते त्या दुकानदाराला . हे ही तिला माहिती पडले होते. यावरून घरात वाद होत होते . मग तिघही मुलांवर त्या इंदरच्या राग निघत होता. होता मुलांकडून एखादी चूक जर झाली असली तरी त्यांना इंदरचा खूप मार बसत होता . भांडण करून इंदर घरात जेवण करत नव्हता . मध्येच रात्री दचकत असे तर ,मध्येच झोपेत रडत असे , तर कधी झोपेतून डोळे बंद करून चालत चालत बाहेर पडत होत होता . उभ्यानेच अंग टाकून देत होता . वैदेही रात्र रात्र जागी राहून इंदरकडे लक्ष देत होती.चूक इंदरची असल्यावरही वैदेहीला त्याची खुशामत करावी लागत होती. जेवणासाठी मुलांच्या शपथ देऊन जेवण करायला लावत होती.


क्रमश ..


नमस्कार,

         वाचक मित्र मैत्रिणींनो … खर तरं मी कुणी लेखिका नाही . मी ही तुमच्यासारखी वाचन करते. मी ही ईरावर असलेल्या कथा वाचत असते. काहींना वाटतेय की ही कथा बोरिंग आहे तेच तेच दाखवत आहे. पण ही कथा काल्पनिक नसून , घडलेले प्रसंग जसा की इंदरचा अपघात .. हो हे खरे आहे. ते मी प्रामाणिकपणे कथेत मांडायचा प्रयत्न करत आहे. तुम्हाला बोरिंग वाटत असेल तर त्यासाठी मी क्षमस्व आहे..


धन्यवाद 


©® धनदिपा 




🎭 Series Post

View all