प्रतारणा .. भाग - 16

वैदेही ,बाळा जाऊ नकोस तुझी वेळ आली आहे. कधी होईल सांगता येत नाही. वैदेही आणि तिच्या आई बाबाला सांगण्यात आले ." पण मला घरी जायचं होत डॉक्टर, मला दिवाळीचा फराळ खायचा आहे." वैदेही छोटासा चेहरा करत म्हणाली."मी आणून देते फराळ ! मग तर झालं" डॉक्टर म्हणाल्या आणि तिनेही मान डोलवली.वैदेही आणि तिच्या आईबाबांनीही घरी जाणे रद्द केले. त्यांना डॉक्टरांचे म्हणणे पटले होते.ती तिथेच थांबली. दिवाळी असल्यामुळे हॉस्पिटला जास्त गर्दी नव्हती मोजकेच पेशन्ट आणि हॉस्पिटलचे कर्मचारी होते .. त्यांनी घरी जाणार होते पण जाता आले नाही .अचानक थांबल्यामुळे त्यांना डब्यांची अडचण येत होती . डॉक्टरांनीच स्वतः जेवणाचा डबा आणून दिला होता आणि सोबत वैदेहीला फराळ ही आणून दिला. तिने आधी नाही म्हटले पण ज्योती डॉक्टरांनी खूप आग्रह केला मग वैदेहीला तिच्या आईला घ्यावाचं लागला होता. वरण,भात, भाजी,पोळी लोणचं, पापड इतके त्या डब्यात दिले होते. आणि फराळ चिवडा , करंज्या ,लाडू , चकल्या, शंकरपाळे असे सर्व तिला आणून दिले.दोघेही मायलेकी डॉकरांच्या प्रेमाने, काळजीने भारावल्या गेल्या होत्या. फक्त डॉक्टर पेंशटचे नातं असतांना त्यांनी इतक प्रेमाने डबा पाठवून काळजी घेतली. जेवण झाली. वैदहीने मनसोक्त फराळ खाल्ला. ती डॉक्टरांना धन्यवाद म्हणाली. हॉस्पिटलच्या आवारात फिरली आणि नंतर झोपायला गेली.

प्रतारणा ...


भाग - 16


"अगं थांब, आधी तपासून घेऊ दे , मग जा !" डॉक्टर म्हणाल्या. त्यांनी तिला आत नेऊन तपासले आणि त्यांना कळले की,तिची लवकरच डिलिव्हरी प्रसुती होणार आहे. त्यांनी तिला जाऊ दिले नाही. 


"वैदेही ,बाळा जाऊ नकोस तुझी वेळ आली आहे. कधी होईल सांगता येत नाही. वैदेही आणि तिच्या आई बाबाला सांगण्यात आले .

" पण मला घरी जायचं होत डॉक्टर, मला दिवाळीचा फराळ खायचा आहे." वैदेही छोटासा चेहरा करत म्हणाली.

"मी आणून देते फराळ ! मग तर झालं" डॉक्टर म्हणाल्या आणि तिनेही मान डोलवली.वैदेही आणि तिच्या आईबाबांनीही घरी जाणे रद्द केले. त्यांना डॉक्टरांचे म्हणणे पटले होते.ती तिथेच थांबली. दिवाळी असल्यामुळे हॉस्पिटला जास्त गर्दी नव्हती मोजकेच पेशन्ट आणि हॉस्पिटलचे कर्मचारी होते .. त्यांनी घरी जाणार होते पण जाता आले नाही .अचानक थांबल्यामुळे त्यांना डब्यांची अडचण येत होती पण डॉक्टरांनीच स्वतः जेवणाचा डबा आणून दिला होता आणि सोबत वैदेहीला फराळ ही आणून दिला. तिने आधी नाही म्हटले पण ज्योती डॉक्टरांनी खूप आग्रह केला मग वैदेहीला तिच्या आईला घ्यावाचं लागला होता. वरण,भात, भाजी,पोळी लोणचं, पापड इतके त्या डब्यात दिले होते. आणि फराळ चिवडा , करंज्या ,लाडू , चकल्या, शंकरपाळे असे सर्व तिला आणून दिले.दोघेही मायलेकी डॉकरांच्या प्रेमाने, काळजीने भारावल्या गेल्या होत्या. फक्त डॉक्टर पेंशटचे नातं असतांना त्यांनी इतक प्रेमाने डबा पाठवून काळजी घेतली. जेवण झाली. वैदहीने मनसोक्त फराळ खाल्ला. ती डॉक्टरांना धन्यवाद म्हणाली. हॉस्पिटलच्या आवारात फिरली आणि नंतर झोपायला गेली.


वैदेहीला रात्री प्रसुतीकळा सुरु झाल्या. डॉक्टरांना बोलावून घेतले. वैदेहीला आत डिलिव्हरी रूम मध्ये नेले. त्यांनी तिला तपासले. वैदेहीच्या डोळ्यांतून पाणी येत होते .


"डॉक्टर, खूप त्रास होतोय ! " वैदेही रडत रडत म्हणाली. डॉक्टरांनी तिचे डोळ्यांतील अश्रू पुसले. ती ओरडत होती.


" थोडा धीर धर वैदेही ! घाबरू नको. सगळं ठीक होईल." डॉक्टर वैदेहीला धीर देत होते. बाहेर आई बाबा काळजीत होते. बाबा तर इकडून तिकडे फेऱ्या मारत होते. ते दोघही देवाच्या धावा करत होते मनोमन प्रार्थना करत होते . 'लवकर सर्व व्यवस्थित होऊ दे देवा!' वैदेहीच्या वडिलांनी हॉस्पिटल मधून स्टेशनवर फोन करून तातडीचा निरोप पाठवला. आणि काही वेळानंतर बाळाचा रडण्याचा आवाज आला. वैदेहीच्या आई बाबांनी देवाला हात जोडून धन्यवाद म्हणालें. वैदेही खूप थकली होती पण बाळाच्या आवाजाने त्या त्रासातही तिच्या चेहर्‍यावर बाळ येण्याची आगतिकता दिसत होती.डॉक्टरांनी त्यांची नोंद केली. वजन केले.



"वैदेही, अभिनंदन धनत्रयोदशीच्या दिवशी तुझ्या घरात लक्ष्मी आली गं ." डॉक्टर म्हणाले.


"डॉक्टर माझं बाळ कसं आहे? वैदेही.


" बाळ व्यवस्थित आहे, साडेतीन किलो वजनाच तुझं बाळं आहे." डॉक्टर बाळाला उलट धरत म्हणाल्या.


" डॉक्टर ऽऽ, व्यवस्थित पकडा ना माझं बाळ, किती रडतेय तेऽऽ ." डॉक्टरांनी बाळाला उलट पकडले असतांना वैदेहीचा जीव कासावीस होऊन म्हणाली. इंदरला ही ऑफिसला टेलिफोन करून कळवण्यात आले. त्याला अत्याधिक आनंद झाला. भरीस भर म्हणजे त्याच्या मुलीच्या येण्याने त्याला प्रमोशन मिळाले तर तो आणखीनचा खूष झाला. इंदर त्याच्या बाळाला आणि वैदेहीला भेटण्यासाठी निघाला. बाळाचे मामा ,मामी ,ताई , दादा सर्व त्याला त्यांना भेटायला हॉस्पिटला आले. बाळाला मऊ कापडामध्ये गुंडाळून बाहेर आणले. वैदेहीच्या आईने बाळाला घेतले. बाळ टुकूर टुकूर सर्वांकडे बघत होतं. मऊ कापसाचा बोळा जस जसे बाळ दिसत होते. इवलेशे डोळे , नाक, ओठ, हात, पाय ,बोटं, नखे , तोंडत अंगठा टाकून चघळत होते. तोच अंगठा काढल्यावर रडत होते. मध्येच जांभोळी देत होते. हसत होते. झोपत होते. वैदेहीला सर्व भेटायला रूममध्ये आले. तर ती झोपलेली होती 


"आक्का छोटूसं बाळं माल्या थालकं दिसून राहिल्यलं" सिद्धु तोतरा शब्दात महणाला.


सिद्धुच्या आवाजाने तिला जाग आली. तिने सिद्धुकडे हसुन पाहिले.ती हळहळू उठायचा प्रयत्न करीत होती. वहिनीच्या मदतीने वैदेही उठून बसली. तिने बाळाला घेतले. बाळ तिच्याकडे बघत होते. तिने त्याच्या कपाळावर ओठ ठेवले. छातीशी कवटाळले.. बाळ रडायला लागले. बाळाला भूक लागली असणार म्हणून तिने त्याला मांडीवर घेतले. सर्व पुरुष मंडळी बाहेर गेलीत. तिने बाळाला दूध पाजले. एक आत्मिक समाधान लाभले. बाळ चुटूक चुटूक दूध पिऊ लागले आणि दूध पिता पिता बाळ झोपून गेले. बाळ झोपल्यानंतर तिला बाळंतणीचा शिरा आणला. मग खाऊन तीही झोपून गेली.



इंदर त्याच्या परीला पाहायला उत्सुक होता मिळेल त्या गाडीने तो निघाला होता. तो तिथून हॉस्पिटलमध्येच आला. येतांना सर्वांसाठी जिलेबी घेऊन आला. पहिल्यांदा वैदेहीला भेटला. तर ती नुकतीच झोपलेली होती. बाळ पाळण्यात जागी होते. वैदेहीची आई बाळाला पाळण्यात झोका देऊन, अंगाई गाणी म्हणत होती. इंदर बाळाजवळ गेला तर बाळ टकरमकर बघत होते. त्याने पटकन पाळण्यातून बाळाला उचलून घेतले. बाळ हसायला लागले. इंदरने तिला छातीशी पकडून घेतले मग तिच्या कपाळावर ओठ टेकवले. इंदर बाळासोबत खेळत होता. खेळून त्याने परीला पाळण्यात ठेवले तर परीने त्याचे बोट घट्ट पकडून ठेवले. इंदरने तिच्या बोटावर ओठ ठेकवले. परी जणू म्हणत होती, 'बाबा काहीही झालं तरी मला अंतर देऊ नको.' वैदेहीला जाग आली तेव्हा इंदर बाळाला झोपवत होता. वैदेहीची आई बाहेर गेलेली होती.


"तुम्ही कधी आले हो?" वैदेही.


" मी केव्हाचाच आलोय , जेव्हा तू झोपलेली होती . कशी आहेस तू , म्हणजे काही त्रास होतोय का तुला ?" इंदर तिच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणाला.



"हो ... होतोय थोडासा त्रास. आत्याबाई आणि मामांजी नाही आले का?" वैदेही.


"नाही ते नंतर येणार आहेत." इंदरने पूर्ण हॉस्पिटला जिलेबी वाटली. इतका तो खुष होता. वैदेहीला लवकरच डिस्चार्ज मिळाला. पाच दिवसाने बाळाची पाचवी पुजली. इंदर त्यांच्या सोबत राहून घरी गेला. सव्वा महिन्याने बाळाचे बारसे करण्याचे ठरले तेव्हा इंदर येणार होता. बाळाला धूरी देण्यात येत होती. बाळाला झोळीत टाकून झोपवल जात होते. जिकडे तिकडे त्यांचे अस्तित्व दिसून येत होते. वैदेहीने कानाला कानपट्टा बांधून, कपाळावर ओलं कुंकु लावलेलं होतं डिकांचे लाडू , अळीवाची ख खीर, नेहमी तुपाचा वास येत होता. त्यांच्यासाठी आई आधी वैदेहीचे आणि बाळाचे करून देत होती. वैदेहीची मालिश, बाळाची मालिश त्याची अंघोळ आई करून देत होती. खाण्याच्या वेळेवर जेवण होत होते. पातळ भाज्यां बनवल्या जात होत्या. जेणेकर अंगावर दूध यायला मदत होत होती. आईचा आहार उत्तम असला की बाळाचीही तब्बेत छान होते. बारश्याचा दिवस आला नातलगांचा गोतवळा जमा झाला. बाळाचा पाळणा सजविण्यात आला. पाळण्याच्या मधोमध गोल फिरणारी भिंगरी लावली होती .बाळाला नवीन कपडे घालून तयार करण्यात आले होते. वैदेही पाटावर बसली. तिला हळदीकुंकू लावण्यात आले. तिला आहेर देण्यात आला. बाळाच्या कानात बाळाचे नाव 'विजयालक्ष्मी' म्हणून कुर्रर करण्यात आले. मग पाळण्यात ठेऊन पाळण्याचे गाणे म्हटले गेले. जेवणाचा आस्वाद घेण्यात येत होता. पण वैदेहीला या पदार्थाचा आस्वाद घेता आला नाही. तिला तर आईने पातळ भाजी पोळी बनवून दिली होती आई तिच्या खायच्या वेळा चुकवू देत नव्हती. विजयालक्ष्मी साठी खूप वेगवेगळ्या प्रकारचे भेटवस्तू देण्यात आले. ती मस्त पाळण्यात खेळत होती. खेळून झाले तसे विजयालक्ष्मीला भूक लागली मग काय रडणं सुरु झाले. वैदेहीने तिला घेतले आणि दूध पाजले दूध पिता पिता ती झोपली. इंदरने तिचे खूप फोटोज काढले होते. इंदरचे आईवडिल, काका ,काकू ही आले होते पण मंगलादेवी इतकी आनंद दिसत नव्हती ,कारण त्यांना पहिला मुलगा हवा होता. झाली मुलगी.वैदेहीच्या आईने त्यांचा येथेच्छ मानपान केला. त्यांना साड्या, लुगडे नेसवले. तरीही मंगलादेवीने नाक मुरडलेच. विजयालक्ष्मी उठली तेव्हा इंदर तिच्यासोबत खेळला आणि नंतर तिला टाटा करून तोही बाकीच्यासोबत घरी गेला लवकरच तो वैदेहीला आणि विजयालक्ष्मीला घ्यायला येणार होता. 


क्रमश :

🎭 Series Post

View all