प्रतारणा .. भाग -15

आहो, कसे आहात हो तुम्ही ? जेवण वेळेवर कराताय ना, जेवण वेळेवर करत जाहो ! काही खाल्ल्याशिवाय घराच्या बाहेर पडू नका माहिती आहे, तुम्हाला लवकर जेवणाची सवय आहे. जेवण करूनच बाहेर जायचं. तुमच्या करिता मी चिवडा, लाडू ,करंजी करून ठेवले आहेत,तेही खा.आपल्या स्वयंपाकघरात डब्यांच्या दुसऱ्या रांगेतील तिसऱ्या डब्यात चिवडा आणि चौथ्या डब्यात लाडू करंज्या ठेवले आहे. तर तेही खा,आणि स्वतःची काळजी घ्या. घरी कुणी नाही म्हणून जास्तवेळ बाहेर राहू नका. म्या आल्यावर मालं घर आणि नवरा तसाच हवा जसा म्या तिकडं सोडून आली आहे. माली अजिबात काळजी करायची नाही. म्या ठीक आहे.

प्रतारणा ..


भाग - 15

     
    वैदेहीला सातवा महिना लागला होता. आता तिचे ओटीभरण करायचे होते. भटजी बुवांना बोलवून तारीख काढण्यात आली. सर्व नातेवाईकांना पत्र पाठवून आमंत्रण देण्यात आले. वैदेहीचे सासू ,सासरे,नंदा, दिर आधीच आले होते. इंदरने वैदेहीला हिरव्या रंगाची साडी घेतली. पाहता पाहता ओटीभरण्याचा दिवस उजाडला. वैदेहीचे आई बाबा,भाऊ, वहिन्या,निता आणि सिद्धुही आले होते. वैदेहीची छान तयार केली. फुलांचे दागिने घालून दिले. डोक्यावर मुकूट आणि फुलांचे दागिन्यांचे पोटावर हार , गळ्यात, कानात, बाजूबंद,नाकात नथ कपाळावर फुलांची बिंदिया, आज साजश्रृंगार म्हणून हे फुलांचे आभूषण घातले होते. कसली गोड दिसत होती. थोडीशी जाड झालेली असली तरीही चेहर्‍यावर आईपणाच्या तेजाने उजळून निघाला होता.हनुवटीच्या तीळ तिच्या सौदर्यांत भर घालत होता. यादिवशी कोणाचीही नजर नको लागायला म्हणून तिला काळजाचा दिट लावण्यात आला. घरातील सर्व बायका बाहेर गेल्या तेव्हा इंदर फ्रेश व्हायला , कपडे बदलावायला आत आला. घरात वैदिहीशिवाय कुणीच नव्हते, तिने त्याचे कपडे काढून दिले. त्याने त्याचे आवरले आणि पटकन काजळाच बोट घेऊन तिच्या साडीचा पदर बाजूला करून काजळाचा दिट तिच्या पोटाला लावला आणि "तुला ही नजर नको लागायला ." असं बोलून त्यावर ओठ टेकवले आणि लगेच बाहेर पडला. वैदेहीला क्षणभर तर काही सुचलेच नाही. ती मख्ख डोळे मोठे करून तो गेलल्या दिशेला पाहत होती. काही क्षणांनंतर ती भानावर येऊन खुदकन हसली. तिने हाताच्या ओंजळीत चेहरा लपवून गोड अशी लाजली. तेवढयात लक्ष्मी वहिनी तिला बाहेर येण्यासाठी बोलवायाला आले.

"काय हो बाई, अशा एकटाच लाजून राहिल्या हो माल्या 
भाऊनं काहितरी केलं वाटते ?" वैदिहीला अशी लाजतांना बघून वहिनी म्हणाल्या.

"काय नाही हो वहिनी, ते असचं ! " वैदेहीने खर सांगणे टाळले. सांगणाय काय म्हणून गप्पचं बसली.

"वहिनी तुम्हाला या वेळेला कोण हवयं हो मुलगा की मुलगी ?" वैदेहीने विषय बदलवत विचारले.
"मला या वेळेला मुलगी हवी." वहिनी लाजून म्हणाल्या. कारण लक्ष्मी वहिनींनी गोड बातमी दिली. सिदधुही अडीच वर्षाचा झाला होता. लक्ष्मी वहिनी वैदेहीला बाहेर आली. पाच सुवासिनी तिची ओटीभरली. फुलांनी सजवलेला पाळण्यावर बसवण्यात आले. बायकांनी ओव्या गाणी म्हणायला सुरवात केली. नंतर तिचे डोळे झाकले एका प्लेट मध्ये जिलेबी पेढा ठेवून त्यावर वाटी ठेवण्यात आली, तिच्या समोर ठेऊन एक निवडायला सांगितले. तर वैदेहीने जिलेबी वरची वाटी उचलून घेतली. येणाऱ्या बाळांसाठी सर्वांनी टाळ्या वाजवल्या. सर्वांनी शुभ आशिर्वाद दिला, पण मंगलाबाईनी नाक मुरडले. जेवण उरकली आणि वैदेही माहेरी जाण्यासाठी तयार झाली बाबांनी तिची सुटकेस घेतली. आप्तस्वकीयांच्या मध्ये छोटासा कार्यक्रम छान पार पडला होता.. इंदर वैदेहीला सोडायला स्टेशनपर्यंत गेला. तो उदास झाला पण त्याने तसं दाखवले नाही."वैदेही तब्बेतीला जप, मी तुला पत्र पाठवत जाईल." इंदर म्हणाला. स्टेशनवरून गाडी सुटली. वैदेही जाईपर्यंत इंदर तिथेच थांबला ती गेल्यावर तो घरी परतला. इंदरचे आईवडिल तिथेच आणखी काहीदिवस राहणार होते. ते तिथेच राहिले. वैदेही घरी आली. वैदेहीच्या आईने तिच्यावर भाकर तुकडा, पाणी ओवाळून आत घेतले. तिने तिची कमरेला बांधलेली ओटी कमेरपासून काढून आईजवळ दिली,आईने ते ओटी एका सुरक्षित ठिकाणी ठेवली. 
वैदेहीला माहेरी आल्यावर इंदरची आठवण येत होती. तिने त्याला पत्र लिहले.

 
    आहो,
   कसे आहात हो तुम्ही ? जेवण वेळेवर कराताय ना, जेवण वेळेवर करत जाहो ! काही खाल्ल्याशिवाय घराच्या बाहेर पडू नका माहिती आहे, तुम्हाला लवकर जेवणाची सवय आहे. जेवण करूनच बाहेर जायचं. तुमच्या करिता मी चिवडा, लाडू ,करंजी करून ठेवले आहेत,तेही खा.आपल्या स्वयंपाकघरात डब्यांच्या दुसऱ्या रांगेतील तिसऱ्या डब्यात चिवडा आणि चौथ्या डब्यात लाडू करंज्या ठेवले आहे. तर तेही खा,आणि स्वतःची काळजी घ्या. घरी कुणी नाही म्हणून जास्तवेळ बाहेर राहू नका. म्या आल्यावर मालं घर आणि नवरा तसाच हवा जसा म्या तिकडं सोडून आली आहे. माली अजिबात काळजी करायची नाही. म्या ठीक आहे.
                              
                                  तुमची बायको
                                       वैदेही.


            पाच दिवसांनी इंदरला वैदेहीने पाठवलेले पत्र मिळालं . इंदर खुष झाला.त्याने पत्र वाचायला घेतले. \"यात तर माझंच लिहलं हिने, तिकडेही माझीच काळजी करतेय ही.\" वाचून समाधान वाटलं त्याला. मग त्यानेही तिला पत्र लिहले.


 
 प्रिय 
    वैदेही,

             वैदेही माझी किती काळजी करणार आहेस तू ?तिकडे गेल्यावर माझाच विचार करते आहेस का?तू तिकडे जाण्याअगोदरच माझ्यासाठी सर्व सोय करून ठेवली आहे. ते मी सगळ खाईल,मी इकडे व्यवस्थित आहे,माझी काळजी करू नकोस,मी सगळं वेळेवर करतोय. आईबाबा आणि नंदा आहेत. आता स्वतःची काळजी घे, आपल्या बाळाची काळजी घे, काय करतयं माझं बाळ? बाळाला सांग त्याचे बाबांना खूप आठवण येतेय बाळाची. तुझ्याशिवाय घरात करमत नाहीय गं, सर्व तू हातात द्यायची मला,तुझ्याशिवाय घराला घरपण नाही.तुझी खूप आठवण येते वैदेही, माझी काळजी करू नको तू तुझी काळजी घे.

                             तुझाच 
                                     इंदर 

        
      काही दिवसांनी इंदरच पत्र वैदेहीला मिळालं . वैदेही खूप खूष झाली. तिने त्यावर ओठ टेकवले. तिने ते पत्र दोन तीन वेळा वाचले, त्या पत्रामुळे इंदर तिच्याजवळ आहे असा तिला भास झाला होता.. इंदर घरी जाऊन त्याच्या आईला डब्यातील फराळ आणायला सांगितला तर त्याच्या आईने म्हणजे मंगलादेवीने सांगितले की,"घरात काहीही नाहीये."

"म्हणजे ? अगं वैदेही सर्व करून गेली आहे माझ्यासाठी!" इंदर त्याच्या आईला म्हणाला.

"अरे इंदर काहीच नाही डब्यात , मी पाहिले ना ." मंगलादेवी नजर फिरवत म्हणाल्या.

"असं कसं म्हणते आई, वैदेहीने स्वतः मला बोलली आहे." इंदरने त्याच्या आईला विचारले. आता खरं काय ते सांगावचं लागेल म्हणून त्या म्हणाल्या .

"हा म्हणजे ते ना , इतुकासा होता तो चिवडा, आम्ही सर्वांनी खाल्ला ." मंगलादेवी हाताच्या साहय्याने दाखवत म्हणाल्या.

"पूर्ण संपल ? मग खरं काय आहे ते सांगायचं." इंदर म्हणाला.

"हो ." मंगलादेवी म्हणाल्या. त्याने एक सुस्कारा सोडला आणि बाहेर निघून गेला.


दोघांचाही पत्रांची देवाणघेवाण होऊ लागली. त्याने घराचा विषय वैदेहीला सांगणे टाळले होते. ती ते पत्र तिच्या सुटकेसमध्ये जपून ठेवत होती. तोही ते वैदेहीचे आलेले पत्र जपून ठेवत होता . दिवस सरत होते. सातवा संपून आठवा महिना लागला होता. तिला जवळच असलेल्या स्त्रीतज्ञ असलेल्याकेळकर हॉस्पिटलला नेण्यात आले. तिथे प्रसिद्ध ज्योती केळकर म्हणून डॉक्टर होते. खूप छान बोलके डॉक्टर होते. त्यांना पहिल्या भेटीत वैदेहीचे लांबसडक केस आवडले होते. त्याला कारणही होते त्यांचे केस छोटे छोटे होते. वैदेही त्यांच्यासबोत मनमोकळे पणाने बोलत होती. त्यांनी पहिल्या महिन्यापासूनच्या वैदेहीच्या केसचा अभ्यास केला. तिची एकदा पूर्ण तपासणी केली. बाळाची छान वाढ होत होती. सर्व नॉर्मल होते. त्यांनी तिला \"वीस ऑक्टोंबर\" ही बाळंतपणाची दिनांक दिली. काही गोळ्या औषधी लिहून दिली. वैदेही घरातील कामही करत होती. काम केल्याने गरोदर बाईला बाळंतपणाला त्रास होत नाही असं तिथल्या बायका तिला सांगायच्या मग तीही काम करत होती. घर झाडून काढणे,खाली बसून कपडे धुणे,फरशी पुसणे हे तिचे नित्याचे काम होते वैदेहीची आई वहिनी तिला सकाळ संध्याला फिरवायला नेत होत्या. वैदेहीचे दिवस भरत आले होते. वैदेहीच्या आईने बाळासाठी लंगोट, धूपटी, कानटोपी, झबलं, पथरणी शिवल्या होत्या. एक दिवस अचानक वैदेहीचे पोट दुखायला लागले. हॉस्पिटल दूर असल्याने तिला सगळ्या तयारीनिशी हॉस्पिटलला भरती करण्यात आले. डॉक्टरांनी तिला तपासले.

" वैदेही अजून वेळ आहे गं, इतक्या लवकर नाही होणार ." डॉक्टर म्हणाल्या.

 "पण डॉक्टर तिचे पोट दुखत आहे.".. वैदेहीची आई म्हणाली.

"एक काम करूया आज इथेच थांब आपण वाट बघू ! " .. डॉक्टर म्हणाला.

"हो. डॉक्टर एक दिवस काय आम्ही दोन दिवस थांबतो ." वैदेहीची आई डॉक्टरांना म्हणाली. डॉक्टरही हो म्हणाल्या. आणि निघून गेल्या. डॉकटरांच घर वरती मजल्यावर आणि हॉस्पिटल खाली होतं. म्हणून डॉक्टर केव्हाही हॉस्पिटलला येऊ शकत होते.
दोन दिवस राहून ही वैदेहीची डिलिव्हरी झाली नाही मग डॉकटरांनी त्यांना घरी जाण्यास सांगितले. डॉक्टर म्हणाले," घरी जातांना एकदा चेक करून घेऊ " तिनेही हो म्हटले. सामांनाची बॅग भरली आणि घरी जाण्यासाठी निघत असतांना एकदा डॉकटरांकडून तपासण्यासाठी वैदेही त्यांच्या केबिनमध्ये आत गेली.

"डॉक्टर मी घरी जाण्यासाठी निघतेय." वैदेही डॉक्टरला म्हणाली.

" अगं थांब, आधी तपासून घेऊ दे , मग जा !" डॉक्टर म्हणाल्या. त्यांनी तिला आत नेऊन तपासले आणि त्यांना कळले की.



क्रमश :

🎭 Series Post

View all