प्रतारणा .. भाग - 14

"काय झाले काय होतयं तुला " इंदर म्हणाला."कसंतरीच होतयं आणि उलटी होतेय,चक्कर येतेय." वैदेही बेडवर बसत म्हणाली."चल हॉस्पिटला जाऊन येऊ." इंदरने वैदेहीला म्हटले.दोघही हॉस्पिटला जाऊन डॉक्टरांनी चेकअप करून टेस्ट करून त्यांना आईबाबा होण्याची गोड बातमी दिली. दोघेही खुश झाले . डॉक्टरांनी एका महिन्याच्या गोळ्या औषधी देऊन काही महत्त्वाच्या सुचना दिल्या. ते हॉस्पिटलमधून घरी आले. वैदेही आई आणि इंदर बाबा होणार होता. दोघही आनंदात होते. त्याचे हे पहिले अपत्य येणार होते.त्यांनी ती गोड बातमी तिच्या शेजारी असणाऱ्या निर्मला काकूंना सांगितले. त्यांना नमस्कार केला . खूप आनंद झाला त्यांना,काकूंनी गोड शिरा करून दोघांनाही दिला. वैदेहीला तर स्वतःच्या हाताने भरवला."तुला काही खावसे वाटले तर हक्काने सांग मी करेल." असंही काकू म्हणाल्या.

प्रतारणा ..


भाग - 14



वैदेही बाथरूमध्ये उलटी करायली गेली. मागे मागे इंदरही गेला. 
 
"काय झाले काय होतयं तुला " इंदर म्हणाला.

"कसंतरीच होतयं आणि उलटी होतेय,चक्कर येतेय." वैदेही बेडवर बसत म्हणाली.

"चल हॉस्पिटला जाऊन येऊ." इंदरने वैदेहीला म्हटले.

दोघही हॉस्पिटला जाऊन डॉक्टरांनी चेकअप करून टेस्ट करून त्यांना आईबाबा होण्याची गोड बातमी दिली. दोघेही खुश झाले . डॉक्टरांनी एका महिन्याच्या गोळ्या औषधी देऊन काही महत्त्वाच्या सुचना दिल्या. ते हॉस्पिटलमधून घरी आले. वैदेही आई आणि इंदर बाबा होणार होता. दोघही आनंदात होते. त्याचे हे पहिले अपत्य येणार होते.त्यांनी ती गोड बातमी तिच्या शेजारी असणाऱ्या निर्मला काकूंना सांगितले. त्यांना नमस्कार केला. खूप आनंद झाला त्यांना,काकूंनी गोड शिरा करून दोघांनाही दिला. वैदेहीला तर स्वतःच्या हाताने भरवला.
"तुला काही खावसे वाटले तर हक्काने सांग मी करेल." असंही काकू म्हणाल्या.

इंदरने त्यांच्या वडिलांना पत्रव्दारे बातमी दिली. मग त्याने वैदेहीच्या आईबाबांना पत्र लिहून ही आनंदाची बातमी दिली. सर्व खुष झालेत. त्यांनीही पत्राव्दारे भरपूर सुचना पाठवल्यात. आणि आम्ही लवकर भेटीला येऊ असे कळवले. वैदहीचे आईवडिल तिला भेटायला आले. येतांना भरपूर फळे, सुकामेवा घेऊन आले. पहिलं बाळंतपण माहेरी असते. म्हणून पहिलं बाळंतपण वैदेहिच्या माहेरी करण्याचं ठरले. दर महिन्याला वैदेहीची तपासणी होत गेली. बाळाची वाढ छान होत होती. वैदेहीच्या शरिरात हळहळू बदल होत होता. तिला वेगवेगळे पदार्थ खाण्याचे डोहाळे लागले. इंदर, निर्मला काकू ,शेजारच्या बायका तिचे डोहाळे पुरवत होते. तिला मातीचा सुगंध घेण्याचे डोहाळे लागले. काळी माती त्यावर पाणी शिंपडल्यावर काय अप्रतिम सुंगध येतो. "आहाहा ! "भारीच तिने चक्क काळी माती आणायला लावली आणि त्याच्यावर पाणी टाकून त्या मातीचा गंध श्वासात भरत होती. नंतर तिला लग्नाच्या पंगतीतील वाग्यांची भाजी खाण्याची इच्छा झाली तसे तिने निर्मला काकूला सांगितले. जवळच एक लग्न होते तिथे वाग्यांची भाजी बनवली होती. वैदेहीने वासानेच भाजी ओळखली होती..

"वैदेही मी बनवून देते ना तशीच भाजी." निर्मला काकू 


"नाही काकू मला तिथलीच भाजी खायची आहे. बघा ना काय वास येतोय मस्त !" वैदेही भाजीचा वास नाकात भरत म्हणाली. आता तर तिच्या तोंडाला पाणी ही सुटले. आता काय करावं असा प्रश्न निर्मला काकूंपुढे उभा राहिला. कारण तिथले लग्नाचे निमंत्रण नव्हते.

"काय करावं बाई आता हिला तिथली भाजी खायची इच्छा आहे." निर्मला काकू स्वतःशी म्हणाल्या . काकूंनी विचार केला आणि एक छोटा डबा घेतला आणि लग्ना ठिकाणी पोहचल्या. तिथून त्यांनी स्वयंपाकी होते त्यांच्याजवळ गेले.

"आवं भाऊ माझ्या पोरिला डोहाळे लागले आहेत. आणि हिच भाजी खायची आहे तर मला ह्या डब्यात थोडीशी द्याना " निर्मला काकू तिथल्या भाजी बनवण्याऱ्या भावाला म्हणाली. 

"द्या डबा " म्हणत त्याने डबाभर भाजी दिली. निर्मला काकू घरी येऊन वैदेहीला भाजी दिली. वैदेहीने भाजीचा डबा उघडला . वासानेच पोट भरले तिचे.

"खा आता की भाजीच्या वासानेच पोट भरणार " कांकूनी ताट वाढून तिच्या पुढयात ठेवत म्हणाले.

"काकू मला पोळी नकोय. मला हल्ली पोळीच्या वासानेही उल्टी होते." वैदेहीने काकूंना सांगितले. काकूंनी तिला ज्वारीची भाकरी करून दिली आणि तिने खाल्ली. तेव्हा कुठे तरी तिला बरं वाटायला लागले. तिला खाऊन पंधरा मिनिटे ही होत नाही की तिला उलटी झाली. वैदेहीला काही पचले नाही.

"खूप आगाऊ दिसतयं बाळ " काकू.

"उलट्यांमुळे माझी खायची इच्छा होत नाही. काही खाल्लं की लगेच  उल्टी होते." वैदेही 

"काही नाही होईल कमी कमी . आता यावेळेला जातांना मी पण येईल तुझ्यासोबत !" निर्मला काकू म्हणाल्या.

"हो." वैदेही म्हणाली. इंदर घरी आल्यावर इंदरला भाजीचा किस्सा सांगून वैदेही खूप हसली. 

"पण काहीही असो निर्मला काकू आमंत्रण नसतांना तिथे तुझ्यासाठी भाजी आणायला गेल्या." इंदर म्हणाला. तीही त्याच्या या बोलण्यात सहमती होती तिनेही "हो "म्हटले. तेवढ्यात काकू हातात काहितरी घेऊन आत आल्या.

" मग काय करणार इंदर अशा अवस्थेत जी खायची इच्छा झाली तर ते खावं,बाळाला खावसं वाटत ते .. नाही खाल्लं तर बाळाचा कान फुटतो असं बायका म्हणतात." निर्मला काकू म्हणाल्या.

"नाही काकू आता तर हिला जे खायचं आहे ते खाऊ घालू." इंदरने निर्मला काकूच्या सुरात सुर मिसळला.
वैदेहीचे आईबाबा तिला भेटायला आले. येतांना भरपूर खायला घेऊन आले.

"आई बाबा इतक सर्व कशाला आणलं?"

"कशाला म्हणजे खायला आणलं ते सर्व हे बघ असली गावरानं तूप आणलयं रोज अनाशापोटी खात जा." वैदेहीची आई पिशवीतून तुपाचा डबा काढत म्हणाली. आई तिला तिच्या इच्छेप्रमाणे करून खाऊ घालत होती. तुपाचा बदामाचा शिरा करून, आता तर प्रत्येक पदार्थात तूप टाकत होती. म्हणतात न \"तूप खाऊन रुप येतं\". प्रत्येक पदार्थ तिच्या आवडीचा बनत होता. दोन दिवस आई बाबा राहिल्यामुळे वैदेहीचे हट्ट पुरवत होते. त्यांच्या एकुलत्या एक मुलीचे डोहाळे आनंदाने पुरवत होते. आई तिला छान छान पौराणिक कथा ,भजन ऐकवत होती. स्वयंपाकपासून तर तिच्या पायांना तेल लावून देण्यापर्यंत आई तिचं करत होते. बाबा ही आईला छोटी छोटी कामात झाडू मारून देत पाणी भरून मदत करत होते. कधी कधी उल्टी करून खूप बेजार होत होती तेव्हा आईच्या मांडीवर डोकं ठेवून आराम करत होती आईचा डोक्यावर फिरणारा हात तिला खूप धीर देत होता. निता सिद्धुचे किस्से ऐकवून तिचे मन रमवत होते. या दिवसांमध्ये निर्मला कांकूशी ही आईसोबत ओळख झाली. वैदेहीच्या तोंडून सतत निर्मला काकूचे कौतूक होत होते. आईबाबा स्वतः निर्मला कांकूना भेटायला गेले होते.

"आम्ही तर दूर राहतो पण तुम्ही तिची काळजी स्वतःच्या पोरीसारखी घेतात." म्हणून वैदेहीच्या आईबाबांनी काकूंचे आभार मानले.

"नाही हो ताई आभार कसले मानताय एकमेकांच्या शेजारी राहतो आम्ही शेजारधर्म पाळायला नको का?. आणि खरंतर मला माझ्या मुलीसारखीच आहे ही ,मला दोन मुले आणि ही एक. " निर्मला काकूंनी स्मित हास्य करत म्हणाल्या. दोघांची ही छान गट्टी जमली. एकमेकांकडे जेवणाचा पाहूणचार ही झाला.


हे दोन दिवस जसे भूर्रकन उडून गेले. ते आता घरी परतणार होते. ते आता तिला ओटीभरण झाल्यावर घ्यायला येणार होते. त्यांची जायची वेळ झाली तशी ती उदास झाली. इंदरने तिला समजवले.आई तिच्याजवळ आली.

"वैदेही अशा अवस्थेत उदास नाय राहायचं त्याचा बाळावर परिणाम होतो. आता ओटीभरण्याला तर येवूच की."आई. वैदहीने आईला मिठी मारली. निर्मला काकूंचा निरोप घेतला.

 "नका काळजी करू वैदेहीची मी आहे ना ऽऽ" निर्मला काकूंनी वैदेहीच्या आईला आश्वासक शब्दात सांगितले. त्या सर्वांचा निरोप घेऊन वैदेहीचे आईवडील घरी जाण्यासाठी निघाले.


 काहीदिवसांनी ठरल्याप्रमाणे वैदेही सोबत निर्मलाकाकू हॉस्पिटला गेल्या. डॉक्टरांना सांगून "तिला काहीच पचत नाही. खूप उल्ट्या होतात. मग ती जेवतही नाही." असे सांगितले. मग डॉकटरांनी तिला तपासून घेतले. सोनोग्राफी केली. बाळाचे ठोके पाहिले . वैदेहीने त्या टि व्ही सारख्या दिसणाऱ्या कडे पाहत होती . काळ काळ काहीतर दिसत होते. छोटी बाळाची आकृती दिसत होती. ती ते पाहून भारावून गेली. डॉक्टरांना विचारून "ते काळ दिसणार काय आहे?" म्हणाली. तिचं बाळ सांगितल्यावर आनंदी झाली. आनंदाने डोळ्यांच्या कडा पाणवल्या. डोळ्यांचे ही विचित्र रसायन आहे.दुःखात तर ते रडतात पण अत्याधिक आनंदात पण ते वाहत असतात. डॉक्टरांनी गोळ्या बदलवून दिल्या. भरपूर प्रमाणात पाणी प्यायला , फलहार, पौष्टीक आहार घ्यायला सांगितला.निर्मलाकाकू तिला घरी घेऊन आल्या. घरी आल्यावर त्यांनी इंदरला डॉक्टर काय म्हणाले ते सर्व सांगितले. वैदेहीने तिच्या पोटातील बाळाची आकृती पाहिली ते इंदरला सांगितले सांगतांना तिच्या डोळ्यांत आईपणाची जाणीव दिसत होती. ती तिच्या बाळासाठी छान फलहार घेऊ लागली. जेवण वेळेवर गोळ्या वेळवर घेऊ लागली. आधी कंटाळा करणारी वैदेही आता बाळासाठी वेळवर घेत होती. वैदेही तिच्या बाळासोबत बोलत होती. वैदेहीच्या शरिरात बदल जाणवत होता. पोट दिसत होते. चेहर्‍यावर एक तेज दिसत होते. गाल वरती आले. थोडी जाड भरलेली दिसत होती. अगदी गोड दिसत होती. कधी कधी इंदरला तिला पाहून त्यांच्या भावनांवर नियंत्रण राहत नव्हते आणि मग ते दोघं एकत्र येत होते. हळूहळू प्रेमाच्या पावसात चिंब भिजत होते. त्यातही तिला काही त्रास व्हायला नको याची पुरेपूर काळजी इंदर घेत होता.


क्रमश :

🎭 Series Post

View all