प्रतारणा .. भाग - 5

"अरे वेळ आहे नाऽ आताशी काऊन रडून राहिलीय, आता नको रडू बरं !"... निता "जेव्हा तुझी वेळ येईल ना तेव्हा तू ही रडशील".. जीत काका "काका,मी नाही रडणार, उलट मालाचं नवरा रडत बसणार " निता चे बोलने ऐकून सर्व हसायला लागले … सिद्धु ही आता त्याच्या आक्काला सोडत नव्हता.

प्रतारणा ..



भाग -5


            लग्नाच्या कामाला सुरवात झाली होती . शेजारच्या बायकाही मदत करायला येत होत्या .जातं वर दळण दळल जात होती .शेवया , कुरडई ,पापड , करंज्या लाडू असे अनेक पदार्थ बनवत होते त्यासोबत त्यांचे अधूनमधून गाणे गाणं ही चालू होते . एकीकडे लग्नाची हळद कांडली जात होती .


              वैदही तर त्यांच्या गाण्यानेही नुसती रडत होती तिला खरंतरं लग्न होऊन सासरी जाण्याच दडपण आल होतं... निता ला हे सर्व पाहतांना गंमत वाटायची . काय करताय,काय नाही सर्व पाहायची आणि त्यांना मदत सुद्धा करत होती.लग्नाच्या पत्रिका ही वाटण्यात आल्या होत्या . घरात वैदेहीचे लाड होत होते. आई एकही काम करू द्यायची नाही. दोघही वहिन्याही प्रेमाने सगळे हातात द्यायच्या. हे सर्व प्रेमाने गोड कौतुक लाड करत होते तरीही तीची डोळे भरून यायचे. तीही सगळ्यासोबत ते क्षण अनुभवून घेत होती. ते सगळ प्रेम, काळजी, होणारे लाड बघून मध्येच वैदेहीचे डोळे पाणावत होते.आई , वहिनी आणि घरातील बाकीच्यांचे सुद्धा असेच सुरु होते. 




"अरे वेळ आहे नाऽ आताशी काऊन रडून राहिलीय, आता नको 

रडू बरं !"... निता 



 "जेव्हा तुझी वेळ येईल ना तेव्हा तू ही रडशील".. जीत काका 



"काका,मी नाही रडणार, उलट मालाचं नवरा रडत बसणार " 




    निता चे बोलने ऐकून सर्व हसायला लागले …



       सिद्धु ही आता त्याच्या आक्काला सोडत नव्हता. 


 "आऽकाऽ आऽकाऽ " म्हणून आवाज देत होता. आक्काच सुद्धा त्याच्यावर खूप प्रेम होते. तो चार महिन्याचा असतांना लक्ष्मी वहिनी खूप आजारी पडली होती . वहिनीला तालुक्याच्या गावी ऍडमिट केले होते पंधरा दिवस वहिनी हॉस्पिटला होत्या आणि सिद्धु आक्काकडे होता. त्याच खाणं, पिणं, शी, सु, अंघोळ सर्व वैदेहीने मायेने केलं . एका मिनिटाला ही त्याला सोडलं नव्हतं. त्याचा ही खूप प्रेम त्याच्या आक्कावर .छोटी बाळ बोलायला लागली पहिला शब्द हा 'आई' किंवा 'बाबा' असतो. पण इथे मात्र पहिला शब्द त्याचा 'आक्का' होता .

            



            दोन दिवसांवर लग्न आले . मुलाकडचे दूर गावाचे असल्यामुळे एक दिवस आधीच येणार होते. हळदीच्या दिवशी दुपारी नवरामुलाकडचे पाहुणे आले. त्यांचा चहा पाणी जेवण करून झाले. वैदेहीचे तिन्ही भाऊया सर्वांकडे जातीने लक्ष देत होते. लग्नात कसलीही कमी पडता कामा नये. संध्याकाळी हळदीचा कार्यक्रम होता. थोड्यावेळाने हळदीला सुरवात झाली .. पिवळी साडी आणि हिरवा चुडा,पायातील पैंजण साधी आणि तितकीचं सुंदर दिसत होती वैदेही .

नाजूक शरिराची वैदही त्या चापून चोपून नेसलेल्या पिवळ्या साडीत सुंदर दिसत होती. लग्नाचं रूप तिच्या चेहऱ्यावर चमकत होते . मेकअप म्हणून काहीच नाही . काजळ आणि पावडर या पलीकडे तिला काही माहिती ही नव्हते. आणि तशी गरजही पडली नाही.एकदम नैसर्गिक सुंदरता लाभलेली आकर्षक डोळे त्यावर कोरीव जुडलेल्या भुवया , लांब नाक ,ओठ तर डाळिबांच्या दाण्यासारखे लाल चुटूक. हनुवटी च्या बाजुला असणारा काळातीळ तो तर चार चाँद लावत होता वैदहीच्या रुपाला. नाजुक सुडौल बांधा , जास्त उंची ही नाही आणि ठेंगणी नाही. आईने वैदेहीला पाहिले तर त्यांचे डोळे भरून आले. 


          आईने तिची दृष्ट काढली .

  


               इंदरला आधी हळद लावून झाली होती तसा तो आवरायला निघून गेला होता. मग वहिन्या वैदहीला घेऊन आल्या त्यांनी तिला पाटावर बसवले . सर्वात आधी तिला इंदरची उष्टी हळद लावली . मग बाकीच्यांनी एकेकाने हळद लावायला सुरवात केली.निताने हळद लावली. सिद्धुने ही त्याच्या इवलश्या बोटांनी हळदिचा एक बोट लावला होता.वहिन्यांनी तर तिला पूर्ण हळदीने भरवले होते .मामा ,मावशी त्यांची मुलं, सुना,नातवंड, काका, आत्या सर्व नातलग, छोटे मोठे मंडळी हळदीचा आनंद घेत होते .खूप हळद हळद खेळून झाले होते. नाच गाणी जोर शोरमध्ये चालू होती.धम्माल मस्ती करत होते.वैदेहीला तिचे आवरायला रूम मध्ये घेऊन गेले.तिने तिच आवरलं तस सर्वांची जेवण झाली. आधीच नाचल्यामुळे इतके थकले होते की ते अंथरुणात पडता पडताच झोपले. पण आज वैदहीला झोप काही लागत नव्हती. सर्व घरभर नजर फिरवत होती. सर्व डोळ्यांत साठवत होती .तिने फोटोचा अल्बम कपाटातून काढला आणि लहानपणीचे फोटो होते ते पाहत बसली.सगळ्यांच आवरून आई आली तर ही अंथरुणावर बसून फोटो पाहत होती.


"तुला झोप नाही येऊन राहिली?".. वैदहीची आई 



वैदही नाही म्हणून मान हलवली. .



 "ये माल्या कुशीत मी थोपटते ". आई मांडी घालून बसली आणि वैदहीने तिच्या आईच्या मांडीवर डोके ठेवले . आईने तिला डोक्यावर थोपटलं. हळूहळू आईचा हात फिरत होता.ती आईच्या पोटाला घट्ट पकडून घेतल.डोळे तर पाणावले होते. तेवढ्यात निता आली.


"आईऽऽ (वैदेहीची आई तिला निता आईच म्हणत होती .) 


"आईऽ,म्या ही इतचं झोपतो.ये अक्का उलशीक सरक नाऽऽ

 बरं ".. निता झोपेतून उठून म्हणाली .



 थोड़ सरकून निताला जागा करून दिली. निता ने ही आईच्या मांडीवर डोके ठेवले.तिच्या आक्काला चिपकून झोपली. ती लगेच झोपून ही गेली. वैदेहीने तिला व्यवस्थित झोपवले .




              सासरी गेल्यावर सर्वासोबत प्रेमाने वाग.जसे आम्ही तुझे आई बाबा तसेच तेही तुझे आई बाबाच आहेत. सर्वांची काळजी घे, सासऱ्यांसमोर पदर घ्यायचा, उलट बोलू नको , जन्माचे साथीदार आहेत जावाईबुवा त्यांना काय पाहिजे काय नको ते विचारून घेत जा. त्यांना साथ दे. मला माहिती आहे. हे सांगायची तुला गरज नाहिय . तुझ्या वहिन्यांना तू समोर पाहतच आहे . वैदेहीला आईशी बोलता बोलता कधी झोप लागली कळलच नाही आईने तिच डोकं अलगद उचलून उशीवर ठेवलं. आणि डोक्यावरून कपाळावर मायेने हात फिरवला.आईही त्यांच्या शेजारी झोपली. 






       लग्नाचा दिवस उजाडला . बाहेर छान मंडप बांधला गेला होता. छान मोठ्ठ स्टेज तयार करण्यात आले होते. पडदे लावले होते त्यावर वैदेही आणि इंदरकुमार नावाचे डेकोरेट केलेले नाव लावण्यात आले 

होते .मध्यभागी होमची व्यवस्था केलेली होती .



   नेहमीप्रमाणे आईने लवकर उठून आवरून ही झालं होत.वहिन्या ,दादा , बाबा हे उठून आपआपली कामे करत होते. पाहुणे मंडळी हि त्यांच आवरत होती.वैदेहीला कुणी आज उठवलचं नाही ती आणि निता अजूनतरी झोपूनच होत्या.सिद्धु तो गुडघ्यावर चालत बसत तिला उठवायला आला . तिच्या जवळ जाऊन तिच्या चेहर्यावर हात फिरवून तिला उठवत होता . हलवून उठवत होता .


   


   "आऽऽका आऽक्का ऽऽ" आवाज देऊन उठवत होता .


निताची तर वेणीच ओढत होता. चेहर्यावर हात मारून मारून उठवत होता ती वैतागतच उठली. 


वैदेही तर केव्हाचीच उठली होती पण या छोट्या बाबूची गंमत पाहत होती म्हणून मुद्दामच डोळे बंद ठेवले होते.


"आईऽऽ " तिनेही रडत भोंगा वाजवायला सुरु केला.


"हा पाय ना मले कसा उठवतो ,किती चापट्या मारल्या यानं .." निती रडत म्हणाली . 


आईने त्याला खोटं खोटं रागवलं तर याने ही मोठ्ठाच भोंगा पसरवला तशी वैदेहीने त्याला उचलून जवळ घेतल आणि त्याचे लाड करू लागली.तसा तो शांत झाला .



"आता तुम्ही सारे त्यांचेच लाड करतात ,माला नाही करत.".. वैदेही गाल फुगवत म्हणाली .



"नितु तो लायना आहे ना ऽऽ म्हणून पण ताला ही लाड होतोच नं …

अं ऽ अं ऽ "..  करत वैदेही निताला गुदगुदी करायला लागली आणि निता ही जोरात हसायला लागली .

          निता ला सुंगधी उटण्याने अंघोळ घातली. आणि तिला आवरायला नेले . तिच्या चुलत मावस बहिणी आणि तिच्या दोन्ही वहिन्यांनी तिला छान तयार केलं. वैदेहीने गौरीहर पुजन केले. 



भटजी बुवा बाकीची तयारी करायला मंडपात गेले ..



इंदर ही छान तयार झाला होतो . वरातीसाठी सर्व सज्ज झाले होते.मंगलादेवीने इंदरचे औक्षण केले. घोड्याला ही छान सजवले होते. त्याला त्यावर बसवण्यात आले आणि वरात निघाली मारुतीरायाच्या देवळात . बँड बाजा पथकाने वाजवंत्री वाजवण्यास सुरवात केली.हर्षोल्हासात सर्व वरातीत वाजत गाजत नाचत होते .. ये गाण तर हमखास वाजल होतं . 'आज मेरी यार की शादी है।' हे गाणं प्रत्येक लग्नात हमखास लावता. मग काय सर्व मित्रांच्या, भावांच्या अंगात जोशच चढला नाचायला . नाचत नाचत ते देवळात दर्शनाला

गेले . दर्शन घेतले आणि वैदेहीच्या बहिणींनी भावजींसाठी शेवया करंज्या लाडू चकल्या अशा नाश्ता नेला . इंदरने एक एक थोड थोड खाल्ले मग त्याच्या मित्रांना आणि भावांनीच तेच फस्त केले .त्यां बहिणींना पैसे देण्यात आले .वरात निघाली नवरीकडे मंडपात . मंडपात प्रवेशदारापाशी वरात आली. इंदर घोड्यावरून उतरला . वैदेहीच्या आईने इंदरचे औक्षण केले . इंदर मंडपात आला .

भटजी नी पुजा मांडली .इंदरच्या हातून पूजा झाली.नवऱ्या मुलीली बोलवण्यात आले. मामा वैदेहीला घेऊन मंडपात आले . दोघांच्यामध्ये अंतरपाट धरला .भटजींचे मंत्र सुरु झाले होते .


क्रमश ...


वैदिहीच्या लग्नाला सर्वांना यायच आहे बरं का . येतांना आहेर आणू नका फक्त लाईक आणि कमेंट घेऊन या .. काय मग येताय नं ...

या या  सुस्वागतम ..



🎭 Series Post

View all