प्रतारणा ..

" वैदही काऊन पळून राहिली ऽऽ , खाली पडशील नाऽऽ .. "अजय त्याच्या लहान बहिणीला हाका मारत म्हणाला . " अजय दादा ,जीतू दादा माल्या मागे पळून राहिलाय नाऽऽ " , वैदेही"दादा ही मालं नाव घेऊन बाजूला होऊन जाते. मग म्या काही म्हटलं की तुम्ही सर्व मलाच बोलत असताऽऽ ."" वैदेही काय केले बाळा तू ऽऽ " अजय "दादा म्या काय नाय केले . यानेच पहिलं माल नावं घेतलं . आत्ताच तर तू मला छान दोन वेण्या घालून रिबीन चे फुल पाडून दिल होत ना ऽऽ, मग याने ते सोडलं पाय बरं ऽऽ , किती मेहनतीने पाडून देतोस तू , याला नं चांगला मार दे ऽऽ !." वैदेही तिच्या सर्वात मोठ्या दादाला छोट्या दादा जीतची तक्रार करत म्हणाली .
प्रतारणा ..



" वैदही काऊन पळून राहिली ऽऽ , खाली पडशील नाऽऽ .. "
अजय त्याच्या लहान बहिणीला हाका मारत म्हणाला . 

 

" अजय दादा ,जीतू दादा माल्या मागे पळून राहिलाय नाऽऽ " , वैदेही



"दादा ही मालं नाव घेऊन बाजूला होऊन जाते. मग म्या काही म्हटलं की तुम्ही  मलाच बोलता ऽऽ"


" वैदेही काय केले बाळा तू ऽऽ " अजय 



"दादा म्या काय नाय केले . यानेच पहिलं माल नावं घेतलं . आत्ताच तर तू मला छान दोन वेण्या घालून रिबीन चे फुल पाडून दिल होत ना ऽऽ, मग याने ते सोडलं पाय बरं ऽऽ , किती मेहनतीने पाडून देतोस तू , याला नं चांगला मार दे ऽऽ !." वैदेही तिच्या सर्वात मोठ्या अजय  दादाला छोट्या दादा जीतची तक्रार करत म्हणाली .


अजय ने तिला जवळ घेऊन पुन्हा तिच्या वेणीचे फूल बांधून 
दिले . वैदेही तीन भावांची लाडाची एकुलती एक बहिण 
थोरला अजय दादा , मधला विजय आणि धाकटा जीत . जीत थोडा नाही जास्त खोडकर , मस्तीखोर भलताच आगाऊ होता पण त्याचाही खूप जीव बहिणीवर , खूप भांडायचे दोघंही . खाऊ आणला की सर्वांना समान वाटून मिळायचा . जीत त्याचा खाऊ खाऊन वैदेहीचाही खायचा मग यावर दोघांचही भांडण व्हायचं आणि अजय मध्ये पडून तिला त्याचा खाऊ द्यायचा . अजय खूप काळजी घ्यायचा वैदहीची तिला खूप जपत होता . वैदहीचे लांब सडक काळेशार केस त्यांना तेल लावून वेणी पाडून देणे हे अजयचे आवडीचे काम होते तिच्या केसांची खूप काळजी घेत होता . शाळेत जाणे आणणे तिला अभ्यासालाही मदत करत होता . अजय बारा वर्षांनी मोठा तर विजय दहा वर्षांनी तर जीत हा चार वर्षांनी मोठा ... बाबाला रेल्वेत नोकरी असल्याने छोट्या स्टेशनवरच्या कॉटर्सवर राहत होते . तो जंगलीभाग असल्याने हरिण , ससा ,मोर तर रोजच दिसत होते . आई घरकाम करत होती . एक गाय , दहा बारा कोंबड्या , पंधरा बकऱ्या त्यांच्या जवळ होत्या . दुध , दही ,ताक , लोणी घरचेच राहत होते . 


वैदेही खूप मस्तीखोर होती .झाडावर चढून कैर्या तोंडणे , स्टेशनमास्तर झोपलेला असल्यावर तिथे घंटानाद करून त्याची झोप मोडणे किंवा त्यांच्या सायकलची चेन वारंवार उतरवणे हे तिचे रोजचेच कामे होती . संध्याकाळी बाबा घरी आल्यावर स्टेशन मास्तर घरी येवून तक्रार करत होता. बाबा तर काही बोलायचे नाहित पण आई खूप रागवायची . मग रडत बसायची कोपऱ्यात बसून तेव्हा छोटा जीत दादा तिला समजाव होता . तिचं मन दुसरीकडे वळवत होता . तिची मनधरणी करीत होता . वैदही विजय दादाची सायकल घेऊन फिरत होती ,तेव्हा ती सायकल वरून पडली आणि पायाला लागले होते रक्त ही येत होते पण सांगेल तर शप्पथ ! हळूच पायातील रक्त पुसून हळद लावून कपडा बांधला होता . कोणाला काहिच सांगितले नाही दादाला ती थोडी लंगडतांना दिसली तेव्हा कुठे माहिती पडले होते . .

हॉस्पिटल मध्ये जाऊन जखमवर ड्रेसिंग करून टि टि चे इंजेक्शन घेतले पण पूर्ण हॉस्पिटल आरोळ्या मारून डोक्यावर घेतलं . संध्याकाळी आई सरपणासाठी लाकडी घेऊन आली तेव्हा तर खूप बोलायचे फटके बसले होते .

" लगडी लुल्ली झाली ना ऽऽ तर कोणी करणार आहे का? पाय मोडून ठेवायले हिंडत होती का ऽऽ सायकल वरून , आजपासून तूया बाहेर जायचं नाही !" आई 

"जाऊ देना वं आई ऽऽ, नको ना ऽऽ रागवू लहान आहे ती खेळू दे हेच तर वय असते खेळाचं ." अजय दादा 

" हिच्या येवढी होते असतांना मालं लग्न झाल होतं . .. बाहेर हिंडायला जायचं नाही बास !" आईचा निर्णय म्हणजे शेवटचा निर्णय मग कोणी काहिही बोलणार नाही . मग जे काही करायचं ते घरात आणि अंगणात त्याबाहेर जाणे नाही . तिही रडत रडतच हो म्हटली . .
 

 सगळ्यांची जेवण झाली . वैदहीने औषध घेतली . आईने रात्री झोपतांना हळदीचं गरम दुध आणून दिले पिऊन ती ही झोपली.थोडे पाय दुखत होता आईला कळले . आई हळूहळू वैदहीचा पाय दाबत होती . शेवटी आई आहे ती वरतून कितीही कडक स्वभाव असला तरी आतून हळवी असते . मुलाचं चांगलचं व्हावं एवढिच माफक अपेक्षा असते आईची . ती घरातच राहत होती हळूहळू जखम कोरडी झाली आईने तिला तिच्या डोळ्यांसमोरून हलू ही दिलं नाही . आठवड्याचा बाजार भरायचा शहरात त्यासाठी दुपारी एक वाजताची ची गाडी आणि दुसरी सातची आणि रात्रीची अकरा ची गाडी होती प्रवास तर रेल्वेनेच करत होते.


"बाबा , आई काऊन नाही आली अजून किती वेळ झाला 
ना ऽऽ , मला आईची आठवण येऊन राहिली . आई केव्हा 
येईल?" रडत रडत म्हणाली .


" येईल ना ती ऽऽ बाळा , तू रडू नको ना ऽऽ " बाबा


 "बाबा सिग्नल लागलं ना गाडीचं .. सातची गाडी येऊन राहिली वाटतं मी जाऊ का ?"


" तू नको जाऊ ऽ ऽ ,स्टेशनवर दादा उभा आहे."

वैदही रस्त्यावर डोळे लावून वाट बघत होती . गाडी आली गाडी गेलीही पण अजून आई आलीच नव्हती .
 
"बाबा ऽऽ आई ह्या गाडीनेही आली नाही ". पुन्हा चेहरा उतरला तिचा, डोळे कड्या ओल्या झाल्या ..



" चुकली असणार तुझ्या आईची गाडी अकराच्या गाडीने येईल ना ऽ ऽ! जा तू तोवर जेवण करून झोपून जा ;आई आल्यावर उठवतो म्या
तूला." बाबा


" नाय म्या आई आल्यावरच जेवतो , बाबा म्या तुमच्या मांडीवर डोकं ठेवून झोपतो मग तुम्ही मला गोष्टी सांगा बरं , 
हम्म!".. वैदेही



"बरं झोप तू म्या तुला गोष्ट सांगतो ."



वैदेहीने बाबांच्या मांडीवर डोकं ठेवलं आणि बाबा तिला त्यांच्या लहानपणाच्या गोष्टी सांगू लागले . बाबा डोक्यांवरून हात फिरवत होते त्यामुळे तिचा डोळा लागला . 


\"बरं झालं झोपली थोडावेळ ... कितीवेळची विचारतेय तिच्या आईबद्दल ! \" बाबा मनात विचार करत म्हणाले .

"बाबा डोक्यावरून हात फिरवा ना ऽऽ !".. जसा बाबांचा डोक्यावरचा हात कुरवाळायचा थांबला तशी वैदही डोळे बंद करतच म्हणाली . .


अकरा वाजेचा गाडिचा सिग्नलं लागला आणि घंटा वाजला तशी वैदही जागी झाली .

" गाडी आली बाबा ,आई ऽऽ आली ऽऽ  "

"  गाडी आली नाही , येत आहे अजून !"

ती उठून बाहेर गेली . तिच्या मागे बाबा ही बाहेर गेले. गाडी आली थोडा वेळ थांबून गेली . वैदही चे सर्व लक्ष येणाऱ्या वाटेकडे होते अन् दिसली तिला तिची आई . रस्त्यावर चांगलाच अंधार पडला होता . टॉर्चच्या प्रकाशात दादा आणि आई येतांना दिसली. किती तो आनंद झाला तिला पळत जाऊन आईच्या कुशीत शिरावं एवढचं काय ते वाटत होतं .


"बाबा आई आली ऽऽ ." आनंदाने उड्याच मारायला लागली.

आई आली तशी आईजवळ जाऊन आईच्या कुशीत शिरली . डोळे भरून आले . 


"आई म्या पण येत जाणार तुझ्यासोबत शहरात , कितीसा उशीर लावला तुया ." वैदेही आईच्या कुशीतूनच बोलत होती .



"अरे बाळा ती गाडी चुकली ना ऽऽ आमची म्हणून थोडा उशीर झाला , पण बाबा होते ना घरी तरिही तुला बोर होत होतं , ठिक पुढच्या वेळेस तुला घेऊन जाईल हम्म ! " आई वैदहीला समजवत म्हणाली . मुलीच्या चेहऱ्यावरचे भाव आई ने अगदी अचूक ओळखले. 

 



गव्हाळ रंगाची थोड़ी गोलू पोलू वैदेही जशी मोठी होत होती तशी आणखीनच सुंदर दिसत . निर्मळ मनाचा झरा असलेली वैदेही जिथे जाईल तिथे सर्वांना आपलेसे करत होती. वैदेहीच्या असण्याने घराला घरपण लाभले होते. तिच्या पैंजणांच्या आवाजाने घरं हसत होतं . लवकरच मोठ्या अजय दादाचं लग्नं झाले . एका वर्षांनी विजय दादाचही लग्नं झाले ... भावाची लाडकी बहिण वहिन्यांची ही लाडकी नणंद बाई कमी मैत्रिण बनली . वैदेही सोबत भातकुलीचा खेळ खेळणे , उंच उंच झोका घेणे कधी वैदहीचा हट्ट ही पुरवत होत्या काय आहे ना एकुलती एक नणंद बाई होती ना त्याची …! .


बघता बघता वैदही सतरा वर्षांची झाली. परकर पोलक्यातली वैदही पंजाबी ड्रेस आणि साडी नेसायला लागली दिसायला सुंदर आणि ठरलेल्या लांब दोन वेण्या हे तर आवडीची केशरचना
 होती . मोठ्या दादाला पाहिली मुलगी झाली . वैदेहीने निता नाव ठेवले . आत्याच्या अंगावर असलेली निता आत्याला सोडून कुठेच जात नव्हती . पहिला शब्द निताच्या तोंडून \"अक्का \" होता . वैदहीला \"आक्का \" च म्हणत होती . अजय ची नोकरीनिम्मत दुसऱ्या गावी बदली झाली . पण नीता मात्र तिच्या आक्का जवळच राहिली . आत्या भाचीची जोडी छान जमली होती .
   
 

आता वेध लागले होते तिच्या लग्नाचे स्थळ येणे चालू होते . तसं तिचं वय ही काही जास्त नव्हत पण तेव्हाच्या काळात म्हणजे 1980 च्या काळात लवकरच लग्न होत होते .
पण ती लग्नाला तयार नव्हती . सर्वांनी तिला त्यासाठी तयार केले पण तिला काळजी वाटत होती की तिला कोणी पसंत करतील की नाही ती विचार करत होती .



 "बाई इथे काय करून राहिल्या हो !" लक्ष्मी वहिनी

"वहिनी बघा ना माझ्या हातांवर काळे हे डाग दिसुन राहिले 
ना ऽऽ " … वैदही .


क्रमश ..

का विचारात पडली असेल वैदही ? का काळजी करत होती कोणी पसंद करणार की नाही म्हणून ,काय झाल होते तिच्या हातांना ? .. जाणून घेण्यासाठी वाचत रहा ... 



आजचा भाग कसा वाटला सांगायला विसरू नका आणि आवडल्यास लाईक कमेंट आणि शेअर करा . तुम्ही जेव्हा बोलाल तेव्हाच मला समजेल नं की तुम्हाला ही कथा आवडत आहे की नाही म्हणून सांगत चला ...

वाचत रहा , हसत राहा आणि स्वस्थ राहा !

🎭 Series Post

View all