प्रतारणा .. भाग - 41

" हाय मिस इंद्रा ! " राहूल इंद्राला म्हणाला." हाय ऽ ऽ ." ती उसनू हसू आणत म्हणाली. 'आला माकडतोंड्या.' ती हळूच म्हणाली.

 प्रतारणा .. 


भाग - 41


            जेव्हापासून राहुलने इंद्राला पाहिले होते तेव्हापासून त्याच्या मनात एकच गाणं वाजत होतं.

देखा जो तुझे यार

दिल में बजी गिटार

देखा जो तुझे यार

दिल में बजी गिटार

छलका आँखों से प्यार

दिल में बजी गिटार

छा रहा कैसा यह नशा रे

आ रहा जीने का मज़ा रे

अरेरेरे मैं तोह गया

रे दिल भी गया रे

अरेरेरे मैं तोह गया

रे दिल भी गया रे




"हाय मिस इंद्रा ! " राहूल इंद्राला म्हणाला.


" हाय ऽ ऽ ." ती उसनू हसू आणत म्हणाली. 

'आला माकडतोंड्या.' ती हळूच म्हणाली.

"ही पोरगीचे डोळे फुटलेत का इतक्या हॅण्डसम ला माकतोड्या काय, बोक्या काय म्हणते ." त्याने मनातच कपाळावर हात मारून घेतला.

 "हिला काही म्हटले तर वचकन अंगावर येईल मांजरीसारखी ! नको जाऊ दे, आज खूप गोड दिसतेय ही मांजर अन् तिचे क्रिस्टल डोळे. "

"तुम्ही कधी आलात ?"

 "आत्ताच आलो." स्टेजवर पाहुणे यायला लागले तशी ती खाली गेली. तो ही तिच्या मागे आला.

 "तुम्ही काय करता हो ?"

 "मी इंजिनिअरींच्या दुसऱ्या वर्षाला आहे ". इतक्यात सोनू तिची पर्स घेऊन आला.

 "दिदी मला एक चॉकलेट हवीय."

 "तू आत्ताच तर खाल्लासं नं मग !"

 "प्लिज दिदी देना !"

तिनी पर्स उघडली तर त्यात इतर सामान कमी आणि वेगवेगळे चॉकलेटस् होते.

"ही तर चालती फिरती दुकान आहे." तो मनातच म्हणाला.

"तुम्हाला हवीय ! " ती म्हणाली. तो तिच्याकडे अवाक होऊन पाहत होता. त्याने मानेनेच नाही म्हणाला. तिने एक चॉकलेट घेतली आणि सोनूला दिली. राहूलला 'जाते ' म्हणून ती निघून गेली.

 'जाते नाही येत म्हणावं ' ती गेली त्या दिशेने पाहत तो तोंडात पुटपुटला. जेवण झाली पाहुणी मंडळी जायला लागली. विजयाचा परिवार त्या सर्वांना निरोप द्यायला आला. तिने जातांना वैदेही, इंद्रा, निताला मामीला मिठी मारून ते ही घरी परतले.घरी आल्यावर विजया स्वप्नालीच्या रुममध्ये गेली. शॉवर घेऊन ती झोपली.


****
  
घरात आता मोजकेच पाहुणे आत्या , काका, काकू होते. तेही पुजा झाल्यावर जाणार होते. आज विजयाने गोडाचा शिरा बनवला होता. तिने बनवून ती आवरायला गेली. भटजी आले. त्यांनी पुजेची तयारी पाहिली. नवविवाहीत जोडीला बोलवले. विजयाने आज मरून रंगाची पैठणी नेसली होती. नाकात मराठमोळी नथ, गळ्यात ठुशी, राणीहार, कानाच्यावर बुगडी घातलेली, कपाळावर चंद्रकोर लावलेली. ती तयार होऊन बाहेर आलेली तर स्वप्निल पापणी न लवता तिच्याकडे पाहत होता. त्याचं असं सगळ्यांसमोर पाहणं तिला मनात धडधड निर्माण करत होते. लाजेने तिचे गाल आरक्त झाले होते.ती येऊन त्याच्या शेजारी बसली. भटजी जसे सांगत तसे ते करत होते. पूजा संपन्न झाली. आरती झाली. तिने सर्वांना प्रसाद दिला. त्यांच्या पाया पडली. तिला भरभरून आशीर्वाद दिला. सर्वांनी सोबत जेवण केले आत्या, काका ,काकू घरी निघाले .

"आई , मी आणि विजया बाप्पाच्या मंदिरात जाऊन येतो ."

" ठीक आहे लवकर जाऊन ये !" विजया आणि स्वप्निल बाईकवर बसून बाप्पाच्या मंदिरात जाण्यासाठी निघाले. थोडं अंतर ठेवून ती बसली .

"पकडून बसं !"

 "हो ,पण इथ तर पकडायला काहीच नाही."

"मला पकडू शकते तू ऽऽ . " तो हळूच म्हणाला.

"काय म्हणालात !"

"माझ्या खांद्यावर हात ठेवू शकतेस."

  "नको राहू द्या . आजूबाजूची लोक आपल्याकडेच बघताय ! "

"बघू दे , नवर्याच्या शेजारीच बसली आहेस."

"ठीक आहे, तुझी इच्छा! " त्या खड्ड्यांमध्ये गाडी हालत डुलत रस्ता कापत होती . मध्येच मोठा खड्डा आला त्याने ब्रेक मारला आणि विजया त्याच्या पाठीवर आदळली. तिच्या स्पर्शाने स्वप्निलच्या अंगावर रोमांच उभे राहिले. त्याने त्याच्या भावना कंट्रोल केल्या.

"म्हणालो ना मी पकडून बस, नाहितर पडशील खाली." ती विचारातच ठेवू की नको ? तिने त्याच्या खांद्यावर हात ठेवला. त्याने हलकेच हसून आरश्यात पाहिले आणि तिनेही त्याच वेळी बाईकच्या आरश्यात पाहिले दोघांची नजरानजर झाली. तिच्या गालांवर लाजेची लाली चढली. 
      बाप्पाच्या मंदिरात येऊन दोघे उभे राहिले. स्वप्निलने बाप्पांचे आभार मानले. म्हणल्याप्रमाणे तो तिला त्याची अर्धांगिनी बनवून दर्शनाला घेऊन आला.
तिनेही डोळे बंद करून जन्मभर स्वप्निलची साथ आणि कधीच त्याने तिची प्रतारणा करू नये. असा आशीर्वाद मागितला.

" इथे बसूया थोडा वेळ !" स्वप्निल.

"हो .."

तिथे मंदिरात थोडावेळ बसले.

"खूप सुंदर दिसतेस विजू "

" थँक्य यू ." ती लाजून म्हणाली.

" चलायचं का ! आई वाट पाहत असतील. स्वीटू ही म्हणाली लवकर ये!"

" अं … ठिक आहे . जाऊया!" दोघेही मंदिरातून घरी परतले. आल्यावर स्वप्नाली तिला जी रुममध्ये घेऊन गेली तिला बाहेरच येऊ दिले नाही. संध्याकाळ तिने संपूर्ण स्वयंपाक बनवला. स्वीटू ची अविरत बडबड चालू होती. तिच्या दादाला काय आवडत तर त्यांच्या लहानपणीचे किस्से सांगणे चालू होते. आणि पूर्ण घर त्यांच्या बडबडीने , हसण्याने,आनंदाने बहरून गेलं होतं. स्वयंपाक झाला आणि तिने सगळ्यांना जेवणाला बोलवून घेतले. राहूल ही आला होता. डायनिंग टेबलवर जेवण आणून ठेवले आणि वाढायला सुरवात केली. पुरणपोळी , आमरस , आमटी भाजी ,वरण ,भात , कुरडई ,पापड वाढून ती वाट पाहू लागली त्यांच्या प्रतिक्रियेची ! तिला ही सोबत बसायला लावले सुप्रियाने तिला ताट वाढले. मग सर्व सोबत बसले.

"खूपच चविष्ट झाले आहे संपूर्ण पदार्थ." संजयराव .

 " वाह!अप्रतिम." राहूल.

"आहहा ऽऽ! आई ,वासानेच माझी भूक चाळवली होती गं पण खाल्यावर  तर  अप्रतिम झालेय स्पेशली आमरस आणि ही पुरणपोळी. असं वाटते की चुमलो उन हातो को जिसने ये खाना बनाया !" तो नाटकीभाव करत म्हणाला .

तसा स्वप्नालीला पाणी पिता पिता ठसका लागला आणि तिच्या शेजारी बसलेल्या स्वप्निलच्या चेहऱ्यावर अंगावर पाणी उडाले.

"चिमणेऽऽ."

"सॉरी दादा , पण स्वयंपाक आईने नाही वहिनीने केलाय ! " आता वेळ स्वप्निलची त्याला हे ऐकून आपण काय म्हणालो आणि सर्वांसमोर म्हणलो आठवलं आणि त्यालाही जोरात ठसका लागला . विजयाने पटकन पाणी दिले. सुप्रियाने त्याची पाठवर रब करू लागली. 

"स्वप्न्या करं की मग !" त्याच्या कानाजवळ जात म्हणाला.

"गप रे राहुल्या."

स्वीटू त्याला तोंड दाबून हसत होती तर तो खाली पाहून पटपट जेवण करत होता त्याने जेवण संपवून तो तिथून सटकला आणि स्वप्नालीने दाबून धरलेले हसू बाहेर आले आणि जोरजोरात हसायला लागली. तिच्यासोबत राहुल,संजय,सुप्रियाही हसत होते. विजया तिथे थांबलीच नव्हती.. जेवणं झाली . संजयरावांनी आणि सुप्रियाने तिला सोन्याच्या बांगड्या गिफ्ट केल्या. तिने किचन आवरून ती रुममध्ये गेली.. स्वप्निलला आज त्यांच्या रुममध्ये जाऊच दिले नव्हते. तो गेस्टरूमध्येच आराम करत होता. 
        विजया आत आल्यावर फ्रेश व्हायला गेली तिने बाथ घेतला. सुप्रियाने तिला डार्क हिरवी चॉकलेटी मिक्स रंगाची साडी नेसायला दिली. 
विजयाला काय ते समजली.सुप्रिया तिला तिच्या हाताने तयार करत होती. तिला खूप धडधड होत होती. सुप्रियाने तिच्या लांब केसांची वेणी घालून त्यावर मोगर्‍याचे गजरे लावले. कपाळावर हिरवी खड्यांची टिकली. डोळ्यांत काजळाची रेघ ओढलेली ,ओठांवर हलकिशी चाँकलेटी लिपस्टिक. दोन्ही हातात सोन्याच्या बांगड्या घातल्या. गळ्यात नेकलेस कानातही मोठे झुमके. तिची तयारी झाली. तिला कानामागे काळजाचा दिट लावला . तिच्यावरून बोटं मोडली . स्वप्नालीने मिठी मारून ऑल द बेस्ट म्हणाली आणि सुप्रियाने केसर बदाम घातलेल दूध तिच्या हाती देऊन तिला आत पाठवले. जागोजागी फुले लावलेले. बेडवर लाल गुलाबाच्या पाकळ्यांचा बदाम काढलेला आजू बाजूला पांढरी फुले. लिलीच्या फुलांच्या माळा बेडच्या आजूबाजूला लावल्या होत्या. तिने आत पाऊल टाकलं आणि नजर वर करून सर्व रूम न्याहाळत होती. सगळी रूम सुंगधित वासाने दरवळत होती. पाहून खूष झाली . आनंदी होऊन ती सर्व नजरेत साठवत होती.

" खूपच सुंदर सजवली आहे रुम ! " लगेच गुलाब फुलले तिच्या गालावर पण लगेच मनात धडकी भरली . आता काय करायचं पुढे ? या विचाराने तिला धडधडायला लागल. ती पुढे होऊन बेडच्या कॉनरपीस वर ग्लास ठेवला आणि ती बाल्कनीत जाऊन उभी राहिली. बाहेरच्या थंड हवेने तिच्या अंगावर शहारा आला. स्वप्निल जो बाहेर गेला होता त्याला त्यांच्या रुममध्ये जाण्यास सांगितले फ्रेश होऊन तो वर पायऱ्यांवरून जात होता तर मध्येच स्वप्नाली त्याचा खिसा कापायला उभी राहिली होती आणि तिने कापलाही. तो त्याच्या रूम मध्ये गेला तर त्याला विजया दिसली नाही. ती बाहेर गॅलरीत उभी राहुन आकाशातील चंद्र तारे पाहत होती. तो तिच्याजवळ उभा राहिला. ती पाठमोरी उभी होती.

"काय बघतेस ! "

"चंद्र बघतेय !"ती बोलून गेली.

*तुम्ही कधी आलात." तिने त्याच्याकडे पाहिले. त्याने व्हाईट कुर्ता पायजमा घातला होता. खूपच हॅण्डसम दिसत होता.स्पेशली त्याचा हनुवटीचा तीळ !

" जेव्हा तू एकसारखी हरवली होती पाहण्यात तेव्हा!" तिच्या डोळ्यात पाहत म्हणाला.

"हं ऽ ." तो एकटक तिच्याकडे पाहत होता .

" तुम्ही असे काय पाहताय माझ्याकडे !"

" मी माझा चंद्र बघतोय !" त्याच्या असे म्हणाल्यानेच ती कमालीची लाजली. गाल टॉमेटोसारखे लाल झालेत ती रुममध्ये आत जायला निघाली तर स्वप्निलने तिचा हात पकडला.
 तो तिच्याजवळ आला तिला त्याच्याकडे वळवून घेतले तिने त्याच्याकडे पाहिले. त्याने तिचे दोन्ही खांदे पकडले .तो ही तिच्या डोळ्यात आणि तिच्या खळीत हरवला आणि ही त्याच्या हनुवटी च्या तीळावर हरवली पण लगेच तो भानावर आला. त्याला तिचे अंग गरम लागले आणि तो भानावर आला.

 "विजू तुला तर ताप आला गं थांब तुला गोळी देतो."

 "नकोऽ " ती जरा मोठ्यानेच म्हणाली. तिला आत बेडवर बसवून त्याने जबरदस्ती तिला गोळी दिली. तिने तोंड वेडावाकड करून कसेतरी गोळी घेतली. त्याला तिच्या एक्सप्रेशनने हसू आले. तिने बारीक डोळे करून पाहिले आणि नाकाचा शेंडा उडवून गाल फुगवून घेतले. तसा तो हसायचा थांबला.

"सॉरी ऽऽ ."

"मी नाही बोलत जा !"

"अगं ऐकतर माझं,इतके क्युट एक्स्प्रेशन दिलेस ना तर मला कंट्रोलच झाले नाही. साँरी हं ! बघ मी तुझ्यासाठी एक गिफ्ट आणलयं !" त्याने कपाटातून एक बॉक्स काढला. आणि तिच्यासमोर धरला. तिने नाही म्हणून मान हलवली.

 "प्लिज ऽ . " तो म्हणाला मग तिने तो घेतला. तिने व्यवस्थित त्याचे रॅपर काढले . त्यात एक स्मार्टफोन होता.


"मोबाईल का?"

"जेव्हा तुला आईबाबांशी किंवा कोणाशी ही बोलायचं असल्यास बोलू शकतेस !"

"थँक्यू ." ती गोड हसून म्हणाली.
        तितक्यात तिचा फोन खणाणला.

 क्रमश ..

©® धनदिपा 


🎭 Series Post

View all