प्रतारणा .. भाग - 38

"दादाऽऽ ." तिने आवाज दिला., त्याने दार उघडले."अरे वा! आवरलं ही !" "हो .. म्हटलं लेट नको व्हायला ." "खूपच घाई झालेली दिसतेय तुला ." ती एक हात कमरेवर ठेऊन त्याची खेचत म्हणाली.

प्रतारणा .. 


भाग - 38


  सकाळ झाली तसे सर्व नाश्ता करून हॉलवर जाण्याच्या तयारीला लागले . बॅग तर आधीच पॅक केलेल्य होत्या. हॉलवरूनच विजयाची पाठवणी होणार होती. तिने मनभरून सर्व डोळ्यांत साठवत होती. लहानपणीचे किस्से आठवून डोळ्यांत अश्रू येत होते. देवाच्या पाया पडून आशीर्वाद घेतला. आजी आई वडिल मामा मामी मावशी काका सर्वांच्या पाया 
पडली. वैदेहीला मिठी मारून रडली. आजी तिची समजूत काढत असतांना आजीच्या डोळ्यातून कढ वाढत होते. अलका मामीने विजयला समजवत होती.

"विजया इथून पुढे नवीन आयुष्याची सुरवात होणार आहे तर असं रडायच नाही आणि जावाईबापू ही खूप समजूतदार आहेत. ते तुम्हाला छान जपतील. आणि घरचे ते तर अगदी देव माणसेच, किती जीव लावताय तुम्हाला, काळजी घेताय, तुम्हाला इतकं जपतील की माहेरची आठवण सुद्धा येणार नाही . बाकी तुम्हाला सांगायची गरज नाही.तुम्ही असचं जपा सगळ्यांना, त्यांच्यात एक होऊन जा ! इतकचं सांगेल . नवीन आयुष्यात प्रवेश करतांना हसून प्रवेश करा. 
चला आता !" विजयाचे डोळे पुसत अलका मामी म्हणाली. विजया ने मान हलवून होकार दिला. बाहेर येऊन तिने एकदा घराकडे पाहून गाडीत बसली. बाकीचेही पटापट गाडीत बसून लग्नहॉलकडे निघाले.

पोहचवून सर्व लग्नाच्या तयारीला लागले. पार्लरवाली येऊन विजयाचा मेकअप करत होती. इंदरने आणि रवी मामाने कालपासूनच सर्व तयारी केली होती. आयत्या वेळेला काही गडबड नको व्हायला .

     
स्वप्निलला जाग आली तशी त्याच्या चेहऱ्यावर हलकेच हसू आले. 

'चला लवकर आवरून घेतले पाहिजे.' स्वतःशी बोलून तो लवकर आवरायला गेला. आवरून बाहेर आला तर दारावर टकटक झाली .

"दादाऽऽ ." तिने आवाज दिला., त्याने दार उघडले.

"अरे वा! आवरलं ही !"

 "हो .. म्हटलं लेट नको व्हायला ."

 "खूपच घाई झालेली दिसतेय तुला ." ती एक हात कमरेवर ठेऊन त्याची खेचत म्हणाली.

 "असं काय नाही गं स्वीटू. तू म्हणशील तर आरामात करतो." तो बोलून बाजूला होऊन गालात ब्लश करत होता.


"राहु दे ! राहु दे ! लवकर आवर , मी तुलाच उठावायला आले होते पण त्याआधीच माझा दाद्या उठलेला ,बरं एक सांग की, रात्रभर जागाच होता ना वहिनीचा विचार करत होता, की कधी सकाळ होते आणि कधी ती तुझी होते. हूँ ऽऽ."

 "हो .. " आरशात पाहून तो केस विंचरत होता नकळत त्याने काय म्हणाला हे त्याला जरावेळाने कळले तसा तो तिच्यामागे मारायला धावला. ही पुढे तो मागे .. ती धावत जाऊन सुप्रियाच्या मागे लागली.

" काय हे .. आज काय आणि तुमचे काय खेळ चालू आहेत असे पळापळीचे !"

"काय नाही गं आई दादा म्हणतोय, लवकर चला, उशीर होतोय. तिकडे विजया वाट पाहत बसली आहे." ती म्हणाली आणि सुप्रिया त्या दोघांना हसत होत्या.

"ये ऽ ऽ चिमणे, मी कधी म्हणालो ?" त्याने तिचा कान ओढत म्हणाला .

"सॉरी दादा, मी थोडीशी मस्करी केली रे ऽऽ , पण लवकर चला तिकडची मंडळी पोहचली सुद्धा ."

 "तूच टाइमपास करतेय केव्हाचा , तुलाच नटायला दोन ते तीन तास लागणार आहेत." 

 "मी जाते माझ आवरायला." असं म्हणून ती गेली सुद्धा तिचे आवरायला .

 "स्वप्निल नाश्ता करून , आवरून घे !"

 "हो .."  

तितक्यात राहूलही आला. तो ही नाश्ता करून 
स्वप्निलला मदत करायला निघून गेला. स्वप्निल त्याच्या रुममध्ये राहूल त्याला छान तयार करत होता. तो आवरून बाहेर आला. सुप्रियाने त्याची दृष्ट काढली. त्याने आईच्या पाया पडल्या. मग देवाच्या पाया पडल्या. स्वप्नाली तयार होऊन आली तशी ती तिच्या दादाकडे पाहतच राहिली. रेड कलरच्या जोधपुरी ड्रेसमध्ये तो खूप हॅडसम दिसत होता डोक्यात फेटा , कपाळावर बाशिंग बांधलेले नवरदेव अगदी पूर्ण तयार झाला होता. स्वप्नाली ने तिच्या दादाला कानामागे डोळ्यातील काजळ बोटाने घेऊन त्याच्या कानामागे लावला.

"अगं हे काय करतेय स्वीटू ऽऽ ?"

 "दादा, नजर नको लागायला .. वहिनी तर तुला पाहून पूर्ण फ्लॅट होईल ."

 "काहीपण बोलतेस तू "

" खर तेच बोलतेयऽ ."
      
        गाडी ही गुलाबाच्या फूलांनी सजवलेली होती. मागे हार्ट शेप काढला होता.सुप्रियाने गाडीची पूजा करून नारळ फोडून नवरदेव त्याच्या गाडीत बसला. त्याच्यासोबत स्वप्नाली आणि राहूल बसून ते निघाले. 

गावात आल्यावर बॅड गाणी वाजवून, नाचत कुदत स्वप्निल घोड्यावर बसून ते हॉलपर्यंत आले. हॉलच्या प्रवेशव्दाराजवळ वैदेही स्वप्निलच्या औक्षण साठी उभी होती. तो आला तसा त्याला टिका लावून ओवाळून आत घेतले. एक एकाचे गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आले.
भटजींनी लग्नविधीला सुरवात केली.एका पाटावर स्वप्निलला उभ राहण्यास सांगितले मध्ये अंतरपाट धरला. भटजींनी मुलीला बोलवा असे म्हटले. विजयालक्ष्मीला घेऊन आले. लाल भरजरी शालूत गळ्यात कानात सुभोभित असे दागिने ,गोऱ्या नाजूक हातावर रंगलेली मेंहदी त्याच हातांवर हिरव्याकंच बांगड्या अगदी शोभून दिसत होत्या.लांबसर बोटांच्या नखांना रेड कलरची नेलपेंट लावलेली,केसांची वेणी घालून त्यावर गजरे माळलेले. सुंदर काळे डोळे मेकअप केल्याने अधिकच उठून दिसत होते. अंगावर शेला , हातात वधूच्या फुलाच्या माळा घेऊन ती एक एक पाऊल टाकत अंतरपाट जवळ येऊन उभी राहिली. तिला जेव्हा बाहेर बोलवण्यात आले तेव्हा खूप धडधड होत होती . थोडा नर्व्हसनेस थोडी भिती आनंद होत होता . धडधडत्या हृदयाने ती एक एक पाऊल टाकत आली. तिला ही ओढ होतीच त्याला बघण्याची.

" दादुळ्या ऽऽ , तू आज कामातून गेलास ऽऽ , वहिनी काय दिसतेय ना, जणू एक अप्सरा उभी आहेस." स्वप्नाली तिच्या कानात कुजबूजली. अधीर होऊन तो अंतरपाट बाजूला होण्याची वाट पाहत होता. भटजींनी मंगलाष्टके म्हणायला सुरुवात केली.


स्वस्ति श्री गणनायकं गजमुखम, मोरेश्वरम सिद्धीधम ।

बल्लाळो मुरुडम विनायकमहम चिन्तामणि स्थेवरम।

लेण्याद्री गिरीजात्मकम सुरवरदम विघ्नेश्वरम् ओझरम ।

ग्रामो रांजण संस्थीतम गणपति।

कुर्या सदा मंगलम शुभ मंगल सावधान।

 
शेवटचे मंगलाष्टक म्हटले आणि अंतरपाट दूर झाला. स्वप्निल एक टक विजयाला पाहतच राहिला. 

"नवऱ्या मुलीला हार घाला !" तरीही त्याला ऐकू 
जाईना . स्वप्नालीने त्याला हाताने हलवून भानावर आणले. त्याशिवाय तर तो आलाच नसता , हरवला होता ना तो विजयामध्ये.

 "हो आयुष्यमान ! आयुष्यभर त्यानांच पाहायच आहे तुम्हाला , आता तरी हार घाला !" भटजी म्हणाले तसे सर्व हसायला लागले. विजया तर आणखीनच लाजेने चूर झाली.

"मी म्हटलं होत नं दादा !" स्वप्निलने विजयच्या गळ्यात हार घातला. विजया पुढे होऊन हार घालायला आली तसे राहूलने त्याला उचलून घेतले. ती तशीच थांबली तितक्यात ती वर उचलली गेली. सिद्धार्थ ने तिला खांद्यावर उचलून घेतले. विजयाने सिद्धार्थ च्या खांद्यावर बसूनच स्वप्निलच्या गळ्यात हार घातला. बाकीच्या मंडळीने अक्षता , फूल टाकून , टाळ्या वाजवून आशीर्वाद दिला.इंदर वैदेहीने कन्यादान केले. स्वप्निलने तिच्या गळ्यात मंगळसुत्र बांधले. तिच्या डोळ्यात हलकेच पाणी तरळले ,नाण्याने तिच्या भांगेत कुंकू भरले. तिने डोळे मिटून घेतले. स्वप्निलचा हात हातात घेऊन सप्तपदींना सुरवात झाली. एकमेकांना सात वचन दिले. दोघेही मनात एकमेकांना समजून घेण्याचे, साथ देण्याचे, मन जपण्याचे , एकमेकांना खूष ठेवण्याचे , विश्वासाचे, समर्पणाचे वचन देत होते.


 अँखियाँ मिला के चन्ना पावें ना जुदाई वे

अँखियाँ मिला के चन्ना पावें ना जुदाई वे
देवें न तारे मेंनु सारी खुदाई वे
आखियाँ मिला के।

तारे है बाराती चाँदनी है ये बारात
सातों फेरे होंगे, अब हाथो में लेकर हाथ
सातों फेरे होंगे, अब हाथों में लेके हाथ
जीवन साथी हम, दिया और बाती हम
जीवन साथी हम, दिया और बाती हम

तारे है बाराती चाँदनी है ये बारात
सातों फेरे होंगे, अब हाथो में लेकर हाथ
सातों फेरे होंगे, अब हाथों में लेके हाथ
जीवन साथी हम, दिया और बाती हम
जीवन साथी हम, दिया और बाती हम

तारे है बाराती चाँदनी है ये बारात

गंगा यमुना से भी पावन तेरा मेरा बंधन
तेरा प्रेम है फुलवारी और मेरा मन है आँगन

जन्मो जन्मो का है सजनी तेरा मेरा साथ
सातों फेरे होंगे, अब हाथो में लेके हाथ
सातों फेरे होंगे, अब हाथो में लेके हाथ
जीवन साथी हम, दिया और बाती हम
जीवन साथी हम, दिया और बाती हम

तू है जीवन में जो प्रीतम सुख नहीं मांगू दूजा
आरती नेनों से करती हूँ मन से तेरी पूजा

मैं तो धर्म ही समझूँ तेरी कही हुई हर बात
सातो फेरे होंगे,अब हाथो में लेकर हाथ
जीवन साथी हम, दिया और बाती हम
जीवन साथी हम, दिया और बाती हम
तारे है बाराती चाँदनी है ये बारात

अँखियाँ मिला के चन्ना आवे ना जुदाई वे
अँखियाँ मिला के चन्ना आवे ना जुदाई वे
देवें न तारे मैनु सारी खुदाई वे
आखियाँ मिला के...             राहुलला तर त्याची तिखट लवंगी मिरची दिसलीच नव्हती. तो असायचा तेव्हा ती नव्हती, ती असायची तेव्हा तो नव्हता. आणि त्याला ती दिसली. चॉकलेटी रंगाच्या घागऱ्यात समोरच्या केसांच्या थोडी हेअरस्टाईल करून बाकीचे केस कर्ल करून मोकळे सोडलेले. चेहर्‍यावर आज मेकअप केलेला आणि खुलून उठणाऱ्या दोन्ही गालांवरच्या खळ्या, ती भरभर चालत येत होती. आणि राहुलचे हार्टबिट्स स्कीप होत होते. लग्नाच्या वेळेला ती विजयाच्या पाठीमागे उभी होती.ती गुलाबाच्या पाकळ्याचा वर्षाव वधुवरांवर करत होती. राहूल तिला एकटक पाहत होता. तिची अन् त्याची नजरानजर झाली तिने नाकाचा शेंडा उडवून केसांना झटका देऊन तिने वधुवराकडे लक्ष केंद्रित केले. तो तिलाच पाहत होता. तिचे नाक उडवून , केसांना झटका देणे तिचे एकसप्रेशन पाहून हसत होता.

"हायऽऽ लवंगी मिरची ! " त्याने एक उसासा सोडत म्हटले.

 ती विजयाजवळच तिच्या मदतीला उभी होती.

सर्व विधी झाले तसे स्टेजवर जाऊन वधुवरांसोबत फोटो काढण्यात आले. लग्न झाले तसे पाहुणेमंडळी च्या जेवणाच्या पंगती बसल्या. आता वधुवर आणि वर आईवडिल अगदी जवळचेच मंडळी जेवणाचे राहिले होते. इंद्राने सर्व जेवणाच्या टेबलाला फुलांनी सजवले . स्वप्निल आणि विजयाच्या ताट छान सजवून आणि आजूबाजूला विशेष सजावट केली. स्वप्निल ने पहिला घास भरवला. विजयानेही लाजत पहिला घास भरवला. इंद्रा ने ही तिच्या ताईला जिजाजीला भरून ती स्वप्नालीकडे गेली तिला भरवून ती जात होती की,

" आम्ही ही बसलो आहे इकडे ." राहूल म्हणाला ती त्याच्याकडे आली आणि तिने चमच्याने पुलाव घेऊन त्या चमच्यात तिने हिरवी मिरचीची तुकडे टाकून त्याला खाऊ घातला. तरीही राहूलने उफ्फ केले नव्हते. तो तर तिलाच पाहत होता. त्याचे असे एकटक पाहणे तिला बैचेन करत होते. इतक तिखट खाऊन त्याने काहीच म्हणाला नाही. म्हणून ती नाक उडवून निघून गेली. जेवणे झाली तसे सर्व तिच्य पाठवणीच्या तयारीला लागले.


क्रमश ..


🎭 Series Post

View all