प्रतारणा .. भाग - 26

"अरे ही तर आलीच नाही कॉलेजला मला तिला हे फूल देऊन बोलायच होतं यार माझं हे शेवटच वर्ष आहे. " स्वप्निल." जाऊ दे ,आज नाही तर ,उद्या बोल की !" राहूल त्याचा मित्र त्याला समजवत म्हणाला.

 प्रतारणा ..


भाग - 26 


"दादा तू का नाही सांगितल, फोन केला असता? आणि कमी जास्त झाल असते तर .."


" काकाच बोलले होते सांगू नका म्हणून !"

"ते लाख बोलतील रे दादाऽ,पण तू तेव्हाच फोनकरून कळवायला पाहिजे होतं आम्हाला ऽऽ !" त्या तिथून घरी निघून गेल्या. इंदर घरी आलेला नव्हता , त्यांनी वैदेहीला सर्व सांगून दिले. 


"आईऽऽ, बाबा काल पोलावरून पडले होते."


" काय म्हणूनच ते रात्री झोपेत पण वेदनेमुळे आई, आई करत होते. अन् रात्री झोप ही झाली नाही. मी त्यांच्याजवळ बसून होती. बाबा घरी आले की त्यांना घेऊन जाते दवाखान्यात !"


"हो .. घेऊन जा आधी ."


"उद्याच नेते हा त्यांना " म्हणून वैदेहीने उद्याच हॉस्पिटला जाण्याचे ठरवले. इंदर घरी आला तेव्हा विजया इंद्रा आणि वेदांत तिघेही त्याला बिलगले.


"बाबा तुम्ही ठीक आहेत नं ? तुम्हाला कुठे लागलं बाबा ?तुम्ही का नाही सांगितल आम्हाला तुम्ही पडल्याचे ?"



"मी ठीक आहे बेटा, थोडा मार लागलाय बस काही नाही."


वैदेही इंदरला हॉस्पिटला घेऊन गेली त्याच्या शरिराचे पूर्ण चेकअप , एमआरआय , सिटीस्कॅन करून घेतले . त्यानूसार डॉक्टरांनी ट्रिटमेंट चालू करून गोळ्या औषधी दिल्या.


******

विजयाचे कॉलेज चालू होते. दोनतीन जणींचा ग्रुप होता. शांत , अबोल , घाबरट हळव्या मनाची विजयालक्ष्मी दिसायला कुणालाही पसंत पडेल अशीच होती . इतकी हळवी होती की मुव्ही पाहतांना इमोशनल सीन असला तर ही एखाद्या लहान मुलासारखी फुंडून रडत बसत होती आणि हॉरर मुव्ही पाहतांना आईच्या साडीच्या पदारात तोंड लपवून मुव्ही पाहत होती . सर्व तिला ती रडतांना ही हसत आणि ती घाबरत असतांना ही हसत. तिच्या कॉलेजच्या मैत्रिणी ही तिला बोलत होते .


"विजया तू इतकी सुंदर दिसतेस ? नाक ,डोळे किती छान आहेत आणि तुझे गुलाबी ओठ किती सुंदर आहेत . शरीराने ही तू मस्तच आहे. मग आज पर्यंत तुला कोणी प्रपोज नाही केले का ?"


"नाही हा , असू बोलू नकोस बाई !मला माझ्या बाबांनी मला इथे शिकायला पाठवलं आहे. प्रेम करायला नाही , त्यांना असं काही आवडत नाही बरं ! आणि असे काही झाले ना तर ते माझा जीव घ्यायला ही मागे फिरणार नाहित इतके स्ट्रिक्ट आहेत ते. कोणी पप्रोज करत नाहिय ना हेच भले आहे माझ्यासाठी. आणि खरं सांगू का? मला यात पडायच नाहिय .. "


"हो खरयं गं ,तुझे बाबा खूप कडक आहेत आम्ही पाहिले आहे.."


" नाही ना इथे सगळेच अनोखळी आहेत. मला तर आपल्या क्लास मधल्या मुलांची नावे ही माहिती नाही". बसमध्ये चढून त्या सर्व ग्रुप निघाला. विजया मात्र ती आणि तिची मैत्रिण सीमा एका सीटवर बसत.



                    जसा व्हॅलेंटाईन वीक आला मग तर काय सर्वीकडे प्रेमाचे वारे वाहतांना दिसत होते. विजया कॉलेज संपल की लगेच ती आणि सिमा बस स्टँड वर जाऊन बसमध्ये बसून निघून जात होते . तिला सतत वाटत होते की कोणीतरी तिच्या मागावर आहे. जेव्हा वळून पाहत होती. तेव्हा कोणीच नव्हतं .. रोज ती लवकर तिच्या तासिका संपल्यावर निघत होती ,तर कधी तिचे बाबा तिला मोटरसायकल वर सोडून देत होते.व्हॅलेंटाईनला ती मुद्दामहून घरी राहिली. आणि तो तिची वाट पाहत बसला. पण ती व्हॅलेंटाईन डे ला आलीच नाही.


"अरे ही तर आलीच नाही कॉलेजला मला तिला हे फूल देऊन बोलायच होतं यार माझं हे शेवटच वर्ष आहे. " स्वप्निल.


" जाऊ दे ,आज नाही तर ,उद्या बोल की !" राहूल त्याचा मित्र त्याला समजवत म्हणाला.मग नंतर तिची तब्बेत ठीक नव्हती म्हणून ती कॉलेजला गेलीच नाही.


                  काही दिवसानंतर तिला एक स्थळ सांगून आले आणि तिच्या बाबांनी रविवारी मुलगी पाहण्याचा कार्यक्रम ठेवला, तिकडच्या लोकांना रविवारी बोलावले. तिने डार्क मरून कलरची साडी नेसून , गळ्यात मोत्यांचा हार आणि कानातही मोत्यांचे झुमके घातले. डोळ्यात काजळाची रेघ , ओठांवर हलकिशी लिपस्टीक लावली , वैदेहीने तिच्या कानामागे तीट लावली. संध्याकाळी पाचला पाहुणे आले तोपर्यंत विजयाची पूर्ण तयारी झाली होती. पोहे घेऊन विजया गेली. नंतर चहा नेला. खात खात बाकीच्या गप्पा रंगल्या, नाश्ता झाला तसे तिला बोलवणे पाठवले ,विजया येऊन चेअर वर बसली. खूप घाबरत होती. हात पायांना घाम आलेला, तिने स्वतःला सावरले .विजयाला पाहुण्यांनी एक एक करून प्रश्न विचारत होते आणि ती खाली मान करून त्यांच्या प्रश्नांची उत्तरे देत होती. थोडयावेळाने पाहुणे मंडळी निरोप कळवतो सांगून गेले. आज पहिल्यांदा विजयाने साडी नेसल्याने बाबांनी तिला फोटो स्टूडियोत जाऊन फोटो काढण्याचे म्हणाले. विजयालक्ष्मी बाबांच्या मोटारसायकलवर मागे बसली. आज कित्येक नजरा तिच्याकडे वळून बघत होत्या. "का बघत आहेत हे असे? मी विचित्र दिसतेय का म्हणून ही लोक माझ्याकडे पाहत आहे."


"स्वप्निलऽऽऽ , मला विजयालक्ष्मी दिसली रेऽऽ"


" कुठेऽऽऽ? "


" ती पहा तिकडे गेलीय तिच्या बाबांसोबत आहे आणि तिने आज साडी नेसली आहे."


"कायऽऽऽ , हो का !  पण मला कशी नाही दिसली ती ?" त्याला आश्चर्य वाटले होते.


"आपण इथेच थांबू या दुकानावर ती बाहेरआली की दिसेलच." राहूलबाबांसोबत स्टुडिओत जाऊन विजयालक्ष्मीने छान फोटोग्राफरने पोझेस देऊन फोटो काढले . फोटो काढून झाल्यावर दिलेल्या पोझच्या विचारात, गालात हसत ती बाहेर पडली आणि स्वप्निल ने तिला पाहिले तर त्याच्या हृदयाचा ठोकाच चुकला. तिचे ते स्मित शुभदंतपक्ती त्यात दात वर दात असल्यामुळे तिच्या स्माईलने आणि तिच्या लाल चुटक ओठ पाहून त्याचे हृदय उड्या मारत होते. तो तिला पाहण्यात दंग झाला होता. ती तिच्या वडिलांसोबती निघूनही गेली तरी स्वप्निल तिच्यात हरवला होता. राहूलने त्याला हलवून जागे केले तसे तो भानावर आला.



"स्वप्न्याऽऽऽ, स्वप्नात गेला होतास का रेऽऽऽ?"


 त्याने लाजून मानेने होकार देऊन केसांवरून हात फिरवला.


"खयालो में, खयालो में !" राहूल त्याला चिडवत होता , पण याचे चिडवणे त्याला आवडत होतं तो तिच्या विचारात , जरा खूषीतच घरी गेला. घरी गेल्या गेल्या त्याच्या बहिणीने स्वप्नालीने त्याला विचारले," येऽऽ दादाऽऽऽ, आज क्या बात है । बहोत मुस्करा रहे हो ।" त्याने तिच्या डोक्यावर टपली मारली .


"तुला काय त्रास होतोय गं ?"


" मला कसला त्रास ,मी फक्त विचारत आहे. काय स्पेशल आहे . म्हणजे तुझ्या चेहर्‍यावर तर काही दूसरच लिहलेलं दिसतयं ." ती जरा बारीक डोळे करून म्हणाली .


त्याने त्याचा चेहरा चाचपडून हाताने पुसला.


" मग सांग ! माझ्या चेहर्‍यावर काय आहे ते ?" तो ही तिला त्याच अर्विभावात म्हणाला.


"तुझा चेहर्‍यावर असं लिहलेल दिसतेय.. की .." ती एक लांब श्वास घेऊन थांबली.


"काय दिसतयं ऽऽ ? " आता त्याला ही तिच्याकडून ऐकण्याची उत्सुकता लागली होती .


"आज वहिनीने दर्शन दिले वाटत ?" तिने अंदाजे तुक्का मारला.



"कायऽऽऽ, कोणऽऽऽ, तूला कोण बोललं असं ? छेऽऽऽअसं काहीच नाहिये . "


"दादाऽऽऽ, तू खोटं नको बोलूस, तुझे डोळे , तूझा चेहरा आहेना ते बघ जरा आरशात ! मग तूला लगेच कळेल की मी काय म्हणतेय ते! कोणीही सांगू शकेल इतक्या स्पष्ट भावना दिसत आहेत तूझ्या चेहऱ्यावर. आता बोल लवकर आणि सांग खर काय ते , नाहितर मी आईला तुझे नाव सांगणार ." तिने त्याला एक प्रकारची धमकीच दिली.


" काहीही काय बोलते स्वीटू , असं काहीही नाही ." त्याने पुन्हा तिच्यापासून लपवण्याचा प्रयत्न केला ."



" सांगतो का? की आईऽऽऽ ." तिने आईला आवाज दिला.


" सांगतो माझे आई , माई , ताई  सांगतो ." त्याने तिच्यासमोर हात जोडला. तितक्यात आई तिथे आली.


"काय गं का बोलवलं मला ,काय झालं , पुन्हा भांडलेत का?"


"अगं नाही आई , भांडण नाही गं ,हा दादा आहे ना मला एक प्रश्न पडला होता त्याला म्हटलं माझ्या प्रश्नाचे उत्तर सोडवून दे , तर तो नाही म्हणत होता, पण आता हो म्हणतोय ." तिने आईला खर सांगणे टाळले.


" स्वप्निल करत जाना रे तिला मदत ."


"आई मी तिला मदत करतोच , मी समजवतो तेव्हा ही ऐकत नाही. ही अभ्यास करतांना ही झोपा काढते." असं म्हणून त्याने तिचा कान पिरगळून पडला.


"दाद्या , तू गेलास आता , मी नाही सोडणार तूला ." तिही त्याच्यामागे पळाली. एकमेकांच्या मागे पळत पळत स्वप्नाली च्या पायाला स्टूल लागून खाली पडली. स्वप्निल जवळ आला . ती पाय धरून रडत बसली.


"स्वीटी खूप लागलं का गं ? चल आपण डॉक्टरकडे जाऊ ." स्वप्निल तिच्या जवळ येऊन तिच्या काळजीत पडला होता. त्याला गिल्ट वाटत होते.


" दादा पकडला गेलाऽऽ " ती मोठ्याने ओरडली.


" तू नाटक करत होतीस ."


"हो .."


"तूला काय वाटतं मी सहजा सहजी हार मानणाऱ्यातली नाही ."


" मानलं तुला !" त्याने तिला दंडवत नमस्कार केला. तिने ही त्याला आशिर्वाद देण्यासाठी पाय त्याच्या डोक्याजवळ ठेवून हाताने आशिर्वाद देण्याचे नाटक केले.

आई दुरूनच त्यांची गंमतीजमती पाहत होती. तिने दूरूनच त्यांच्यावर प्रेमाने नजर फिरवून त्यांच्या आल्याबाल्या घेतल्या, आणि ती तिच्या कामाला गेली.

              स्वप्निल संजयराव शिंदे . मधुकर रावांचे चिरंजीव त्यांना प्राध्यापक व्हायचे आहे आणि त्यांच्या घरातील चिव चिव करणारी चिमणी म्हणजे स्वप्नाली . स्वप्नाली ही स्वप्निल पेक्षा पाच वर्षानी लहान होती. संजयराव हे जिल्हा परिषद शाळेल शिक्षक म्हणून कार्यरत पदावर आहेत . आई सुप्रिया ही गृहिणी आहे. असे हे चौकोनी सुखी कुटूंब .


क्रमश ..


©® धनदिपा 


🎭 Series Post

View all