प्रतारणा .. भाग 6

हातात फुलांच्या माळा पकडून वैदेही खाली पाहत होती. आनंद आणि दुःख समिश्र भावना तिच्या चेहर्यावर दिसत होत्या. शेवटचे मंगलाष्टके झाले. शुभमंगल सावधान कानावर पडले तसे अंतरपाट बाजुला झाला.. वैदेहीने इंदरला पुष्पमाळ घातली . तिने राणी कलरचा शालु नेसून, सुंदर केलेली केशरचना त्यावर मोगराच्या फुलांचा गजरा, नाकात नथ, डोळ्यात काजळ , भुवयांच्या वर टिकल्यांची रास, राणी रंगाची लिपस्टीक लावली होती. आणि डोक्यावर पिन केलेली ओढणी. कपाळावर बांधलेल्या सुंदर मुंडावळ्या .. गळ्यात अलंकरित आभूषण, पायात जोडवी.सुंदर असं लक्ष्मीचं रूप पाहून इंदर तिच्याकडेच पाहत राहिला.

प्रतारणा ..


भाग  - 6


             भटजींनी मंत्र म्हणायला सुरवात केली.



          स्वस्ति श्री गणनायकं गजमुखम, मोरेश्वरम सिद्धीधम ।
          बल्लाळो मुरुडम विनायकमहम चिन्तामणि स्थेवरम।
          लेण्याद्री गिरीजात्मकम सुरवरदम विघ्नेश्वरम् ओझरम ।
           ग्रामो रांजण संस्थीतम गणपति।
           कुर्या सदा मंगलम शुभ मंगल सावधान।।१।।

                   हातात फुलांच्या माळा पकडून वैदेही खाली पाहत होती. आनंद आणि दुःख समिश्र भावना तिच्या चेहर्यावर दिसत होत्या. शेवटचे मंगलाष्टके झाले. शुभमंगल सावधान कानावर पडले तसे अंतरपाट बाजुला झाला.. वैदेहीने इंदरला पुष्पमाळ घातली. तिने राणी कलरचा शालु नेसून, सुंदर केलेली केशरचना त्यावर मोगराच्या फुलांचा गजरा, नाकात नथ, डोळ्यात काजळ , भुवयांच्या वर टिकल्यांची रास, राणी रंगाची लिपस्टीक लावली होती. आणि डोक्यावर पिन केलेली ओढणी. कपाळावर बांधलेल्या सुंदर मुंडावळ्या .. गळ्यात अलंकरित आभूषण, पायात जोडवी.सुंदर असं लक्ष्मीचं रूप पाहून इंदर तिच्याकडेच पाहत राहिला.
         भटजी महाराज म्हणाले तेव्हा तो भानावर आला. इंदरने ही तिला हार घातला. वाजंत्री वाल्यांनी वाद्य वाजवले.. कन्यादान आईबाबांनी केले. बाबांनी वैदेहीचा हात इंदरच्या हाती विश्वासाने दिला. इंदर ने वैदेहीच्या गळ्यात मंगळसुत्र घातले.भांगेत कुंकू भरले. दोघांनी हातात हात घेऊन सप्तपदी वचने घेतली. लग्नानंतरचे सर्व विधी करण्यात आले. सर्व मोठ्यांचे खाली वाकून आशिर्वाद घेतला. वहिन्या दादा आई सर्व पाहुण्यांचे व्यवस्था पाहत होते . हे विधी चालू असतांना हीच संधी साधून वैदेहीच्या बहिणींनी इंदरचे बुट लपवले. सर्व विधी झाल्यावर बुटांची शोधाशोध सुरु झाली. 



"काय शोधताय भावजी, जे शोधताय ते आमच्याजवळ आहे. उगाच तुमची मेहनत वाया जाईल " ... इंदिरच्या मेव्हण्या.


इंदरने त्याच्या खिशातून एक नाणं काढून दिले." हे घे" म्हणत हातावर टेकवले .



"फक्त एक रुपया आम्ही नाही घेणार भावजी "…



इंदरने पाकिटातून काही रककम काढून दिली. .. 



आलोच आम्ही बुट घेऊन, त्या बुट घ्यायला गेल्या. त्यांनी त्याच्या भावला सांगून घराच्या वरती चढवलं .अँटिना वर ठेवलेले बुट घेऊन आली आला.. इंदरने तो बुट पायात घातला. एकीकडे आहेर, मानापानाच्या साड्या वगैरे देण्यात येत होते .जेवणाच्या  पंगती बसल्या. वैदेही आणि इंदर यांनी एकमेकांना उखाणा घेऊन घास भरवला. पाठवणीची वेळ झाली वैदेही आणि इंदरने घरातील देवांना नमस्कार केला. आई बाबांना नमस्कार केला . वैदेहीने आईला मिठी मारली. गळ्यात अडकलेला हुंदका बाहेर आला. ती रडू लागली. बाबांनी तिच्याकडे बघितलं आणि ती त्याच्या कुशीत जाऊन रडू लागली . अजय दादा, विजयदादा वहिनी सर्वांची अवस्था सारखीच होती. निता तर धाय मोकलून रडत होती.सर्वांना रडतांना पाहून सिद्धु ही रडत होता. वैदेहीच्या अंगावर झेप घेत होता जणू त्यालाही समजलं की त्याची आक्का त्याला सोडून जात आहे. त्या इवलाश्या जीवाला पाहून तर कोणाच्या डोळ्यात पाणी नाही आले हे तर नवलच. निताने वैदेहीचा पदर सोडला नव्हता. एका हातात सिद्धु तर एकीकडे निता. जो तो आपआपल्या परिने निताला समजवत होते. सिद्धुला वैदेही कडून घ्यायचा प्रयत्न चालू होता.त्याने वैदेहीला घट्ट पकडून ठेवले होते. पाहणारे दंग होते त्यांचे प्रेम पाहून. सिद्धुला लक्ष्मी वहिने जबरदस्ती ने त्यांच्या जवळ घेतल.जीत दादा ही वैदेहीला भेटण्यासाठी अजून आला नव्हता .जीतदादाला आवाज दिला पण तो बाहेर आला नाही.तो घरात ही नव्हता. पोरांना बाहेर स्टेशनवर शोधायला पाठवल पण कोणाला काही सापडला नाही.मग विजयदादा त्याच्या नेहमीच्या जागेवर जिथे तो जास्तवेळ जायचा तिथे गेला. मारुतीच्या देवळात एका कोपर्‍यात बसून तो रडत होता. 

"जीत इत बसून राहिलाय तू ,वैदेही वाट पाहून राहिली नाऽऽ
ताली, तिला जायचं आहे ना . " .. विजयदादा

"दादा तू जा, मी नाही येत "… जीत


"असं कसं म्हणत तूया, तुला भेटल्याशिवाय जाणार नाही ती" ..


"दादा तिला आपण थांबवू शकत नाही का ? आपण तिचं लग्न लवकर का  केले ?इतक्या लवकर मोठी झाली ती आपण कसे राहणार तिच्याशिवाय ? .."


" नाही आपण नाही थांबवू शकत त्यांना ,प्रत्येक मुलगी लग्न करून जाते. तिला तिचा आयुष्याचा हक्काचा जोडीदार हा प्रेम करणारा काळजी करणारा पाहिजे असतोच न, तिचा ही संसार सुरु होतो. तिचा ही परिवार होतो. आज वैदेही जातेय, काही वर्षानंतर निता ही लग्न करून जाईल.चला सर्व वाट पाहताय.".. विजयदादा जीतला समजावत म्हणाला .


डोळे पसुन तो उठला  आणि विजयदादा सोबत मंडपात आला..



वैदेही वाट पाहतच होती दोघांची. ती नमस्कार करण्यासाठी खाली वाकली .जीत ने तिला नमस्कार करू दिला नाही. त्याने तिला उठवले आणि ती त्याच्या गळ्यात पडली मग त्याला ही अश्रू अनावर झाले . तो मायेने तिच्या डोक्यावर कुरवाळात राहिला . जीत दादाने हाताने तिच्ये डोळ्यातील अश्रू पुसले . तिच्या डोक्यावर ओठ टेकवले आणि तिच्या खाद्यांला पकडून तिला गाडीपर्यंत घेऊन आला. गाडीचे दार उघडून तिला गाडीत बसवू तर तिथे निता बसलेली दिसली. 



"तू इथे काय करतेस ?" ... जीत


"म्या म्हटलं होत न की आक्का सोबत जाणार आहे मग म्या जातोय."


"वहिनी ऽऽ वहिनी ऽऽ, हिला काही सांगा हो !".. जीत मोठ्या वहिनांना म्हणाला .

"आवं जीत भावजी ऐकून नाय राहिलाय ना ती, म्या काय म्हणतो जाऊ द्या तिला आत्यबाई आहेत ना तिथं लक्षं देतील ते , आधीचं ठरलं होतं जाण्याचं म्हटल ऐनवेळेस नाही म्हणू पण ती ऐकून नाही राहिलीय ." .. 

पाठराखीण जाणारी आत्या. वहिनी म्हटल्यावर जीतने
वैदहीला बसवलं . 


"निता आक्का आणि आत्यबाईला त्रास नको देऊ बरं का? .. जीत काका ने तिला सांगितले तशी ती मान हलवून हो म्हणाली .


"म्या बिलकून भी त्रास देणार माल्या आक्काला !".. निता वैदेहीला बिलगून जीतकाकाला आश्वस्त करत म्हणाली .

गाडीचा हॉर्न वाजला .


वैदेही निला खिडकीतून बाहेर बघत सर्वांना हात हलवून टाटा करत होती. तिच्याबरोबर निताही होती. डोळ्यांना दिसेपर्यंत ती भरलेल्या डोळ्यांनी पाहत होती. 



"तू झोपत का? ये माल्या मांडीवर झोप ".. वैदेहीने निताला जवळ घेऊन मांडीवर झोपवलं


निता लगेच मांडीवर डोक ठेवून झोपली .


वैदेही तशीच बसून होती.अनोळखी रस्ता अन् त्या रस्त्यावर वेगाने धावणारी त्यांची गाडी.. पाच सहा तासांचा प्रवास ... वैदेही बसल्या बसल्या झोपली. वैदहीला झोप लागल्यामुळे वैदेहीची मान हळूहळू तिरपी होत खाली येत होती. मानेला जोरदार झटका बसणार तोच इंदर तिच्या शेजारी येऊन बसला. आणि वैदेही ची मान आता त्याच्या खांद्यावर होती. इतक्या जवळ ती बसली तिचा स्पर्श त्याच्या शरिरात करंट पास करत होता.इंदर तिला न्याहळत होता. हनुवटीचा तीळ जवळून तर इंदरच्या काळजाचा ठाव घेत होता. वैदेही बिनधास्त मान टेकवून झोपली होती.



           एका स्टेशनवर गाडी थांबली. तशी वैदेही उठली पाहते तर काय इंदरच्या खांद्यावर डोकं ठेवून झोपली होती. ती पटकन सरळ होऊन बसली. त्यांच्याकडे नजर वर करून पाहाण्याची हिंमत होत नव्हती. चाय चाय करत चहाचा कॅटली घेऊन एक माणूस आला. सर्वांनी चहा घेतला तसा तिनेही घेतला.


"निता चहा बिस्कीट खात का? उठ नाऽ म्या चारतो ." . वैदेही तिला उठवत म्हणाली.


निता उठून बसली.


 "हो ".. निता जांभोळ्या देत म्हणाली .

"चल तोंड धुवून घे .."


निता वैदेही फ्रेश होऊन आल्या.


वैदेही ने तिला चहा बिस्कीट चारला अन् स्वतःचा चहा ही संपवला . चहा पिल्यामुळे तिला आता तरतरी आली. पुढच्या प्रवासाला सज्ज झाले. निता आणि आत्यबाई सोडून कुणीच ओळखीच नव्हतं. समोर तिचा नवरा बसलेला तो कितीतरी वेळचा तिच्या कडे बघत होता. दोघांची नजरानजर झाली.


तिकडे सुभाषने या दोघांना पाहून गाणं सुरु केले. 


इशारों इशारों में दिल देने वाले 
बता ये हुनर तुने सीखा कहाँ से 
निगाहों निगाहों में जादु चलाना 
मेरी जान सीखा है तुमने कहाँ से 

वैदेहीने लाजून मान खिडकीकडे वळवून गालात हसत होती .. एक वेगळीच भावना आली. गाल लाजून लाजून लाल झाले होते .



क्रमश ...


लग्नाला आल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप धन्यवाद ..

जेवण केल्याशिवाय कुणी जाऊ नका ..

तिकडे ही जायचं आहे स्वागतसमारोहला ..

सांगायला विसरू नका ..

भेटूया पुढच्या भागात ...

Happy reading ..

🎭 Series Post

View all