प्रतारणा .. भाग - 12

सकाळी लवकर उठून वैदेहीने पुजा अर्चना केली. तोपर्यंत घरातील मंडळी ही एक एक करून उठू लागली. त्यांचा चहापाणी झाला. इंदर ही उठून आवरून आला. वैदेहीने मंगलादेवीला विचारून गोड शिरा केला. इंदर खुष झाला गोड तर त्याला आधीच आवडत होते पण आज शिऱ्याची चव जीभेवर रेंगाळत होती. सगळ्यांनाच तिच्या हातून बनवलेला शिरा आवडला होता मीरा तर तिचे भरपूर कौतुक करत होती."वहिनी काय चव आहे हो तुमच्या हाताला, अप्रतिम झाला आहे. मला जेव्हा ही शिरा खायची इच्छा होईल. तेव्हा मी तुमच्याकडे येईल." … मीरा शिरा खात खात म्हणाली

प्रतारणा ..


भाग - 12


                 
                       सकाळी लवकर उठून वैदेहीने पुजा अर्चना केली. तोपर्यंत घरातील मंडळी ही एक एक करून उठू लागली. त्यांचा चहापाणी झाला. इंदर ही उठून आवरून आला. वैदेहीने मंगलादेवीला विचारून गोड शिरा केला. इंदर खुष झाला गोड तर त्याला आधीच आवडत होते पण आज शिऱ्याची चव जीभेवर रेंगाळत होती. सगळ्यांनाच तिच्या हातून बनवलेला शिरा आवडला होता मीरा तर तिचे भरपूर कौतुक करत होती.

"वहिनी काय चव आहे हो तुमच्या हाताला, अप्रतिम झाला आहे. मला जेव्हा ही शिरा खायची इच्छा होईल. तेव्हा मी तुमच्याकडे येईल." … मीरा शिरा खात खात म्हणाली.


 "हो ".. वैदेहीने मान हलवून होकार दिला.


 "दाद्या तू काही बोलणार नाहीस का? वहिनीला . हा तु कसा बोलणार आता तू तर रात्री मिठीत घेऊन बोलणार.". मीरा बोलून पळाली. वैदेही लाजून आत मध्ये गेली. तिने तर त्याच्याकडे पाहणे ही टाळले.ती स्वयंपाक घरातून बाहेर आलीच नाही.
मीराला पकडून इंदर ने तिचा कान ओढला.

"दाद्या सोड नाहीतर रात्री तुमच्या खोलीत मी येईल नाहीतर कृष्णा " .. मीरा म्हणाली पण त्याला काही फरक पडला नाही.
 

"ठिक आहे ये !".. तो त्याच आर्विभात म्हणाला

 "बरं मी वाहिनीला माझ्यासोबत झोपायला नेणार "… मीरा ने गुगली टाकली .

 इंदर ने ऐकून मीराचा कान सोडला.

"आई गं , दाद्या किती लाल झाला माझा कान, थांब आता नं तुला रात्रीला एकटेच झोपावे लागले . बघच तु ! ".. मीरा बोलून निघून गेली.


"वहिनी आता आपणच आहोत तर तुम्ही डोक्यावरचा पदर 
काढून टाका .खूप उकडत आहे . ".. मीरा 


"नाही नको म्या ठिक आहो.".. वैदेही कसेबसे म्हणाली.

"वहिनी इतके लपवत आहे म्हणजे नक्की काहीतरी वेगळेच 
आहे." …. मीराने वैदेहीला डोळा मारत चिडवायला सुरवात केली.


 वैदेही लाजली. मग तिने सासूबाईंना विचारून सगळा स्वयंपाक केला .


"खरचं चव आहे पोरीच्या हाताला ".. रमेशराव म्हणाले ( इंदरचे बाबा )
भरपेट जेवण करून मन तृप्त झाले. त्यांनी तिला आशिर्वाद दिला. 

"तुझ्या हातून कोणीच उपाशी पोटी राहणार नाही . अन्नपूर्णा आहेस तू .." वैदेही केलेल्या कौतुकाने सुखावली.

हळहळू वैदेही घरात रुळत होती. मीराही तिच्या घरी गेली होती . नंदा मात्र तिथेच होती .आता इंदरला कामावर रुजू व्हायचे होते तो दोन दिवसांनी जाणार होता. …


रात्रीचे जेवण करून भांडीकुंडी आवरल्यावर ती तिच्या खोलीत आली.
वैदेहीचे मन लागत नव्हते पण करणार काय म्हणून गप्प गप्प राहत होती. शांत बसून एकटक बघत होती.

"वैदेही काय झालयं तू अशी शांत शांत का आहेस ?".. इंदर तिला जवळ बसवत म्हणाला

"काहीनाही . " वैदेही 


"सांग ना !" इंदर 


"ते तुम्ही जात आहेत तर मला खूप वाईट वाटत आहे." .. वैदेही


"अग मी येत जाईन अधूनमधून, आम्ही सर्व मित्र एकत्र राहतो. तुला आत्ताच नाही नेऊ शकत मी ,घर शोधावं लागेल आणि बरच काही असतं.'.. इंदर तिला समजवण्याचा प्रयत्न करत होता.


तिने मान डोलावली. त्याने तिला जवळ ओढून घेतले. ती अनावधाने त्याच्या छातीवर आदळली. त्याने तिला घट्ट मिठीत घेतले. तिच्या डोळ्यांच्या पापण्या ओल्या झाल्या होत्या. त्यावर त्याने ओठ टेकवले. नंतर तिच्या संपूर्ण चेहर्‍यावर प्रेमाचा ओठांचा वर्षाव होत होता. त्या प्रेमाच्या पावसात चिंब भिजत होती. कधी एकमेकांचे श्वास एकमेकांना मिसळले कळलच 
नाहीं..दोन जीव एकत्र झाले .. हे गोड क्षण आठवून दोघांना विरह सहन करायला बळ देणारे होते... दोन दिवस प्रेमाचे लगेच सरेलेही आणि जाण्याचा दिवस उगवला. तो जाताना वैदेहीच्या डोळ्यातील पाणी थांबत नव्हते. तो 'लवकर येईल ' असा तिला सांगून निघू लागला. जात असतांना देवाला आणि आईबाबाला नमस्कार करून तो निघाला. तो जाईपर्यंत वैदेहीला बाहेर अंगणात उभी राहून टाटा करत होती. इंदर गेल्यावर तिला रुडू आल तिने आत जाऊन मनसोक्त रडून घेतले.

एकदिवस नंदाने वैदेहीच्या सुटकेस घेवून तिला न विचारता त्यातून वैदेहीच्या लग्नाचे परकर आणि साड्या काढल्या.
काढून ती नेसू लागली. वैदेही तिला काहीही बोलली नाही.
वैदेही तिघांना अगदी हातात वस्तू देत होती. जागेच्या जागेवर आणून देत होती . पाणी,चहा,जेवण ही जिथे बसतील तिथेच करत होते. तरीही तिने कोणतीच तक्रार केली नाही. 
 
इंदर पंधरादिवसांनी घरी आला पण फक्त दोन दिवसांसाठी. येताना वैदेहीसाठी तिचे आवडीचे खारी टोस्ट घेऊन आला. तो आल्यावर वैदेही खुप खुष होती. त्याच्या आवडीचं जेवण त्याला लागेल ते सर्व ती त्याच्यासाठी करत होती. रात्रीच काय तो त्यांना बोलायला वेळ मिळत होता. त्यांचा विरह मिटत होता. सकाळी चहा नाश्ताला इंदर ने खारी खाण्यास सांगितले. तर ती नाही म्हणाली. कारण आधीच त्या दोघींनी खाऊन फस्त केले होते. 

"आई खारी कुठेय ?"


"खाल्ल्या आम्ही " 


"पूर्णच "..


 "हो "… 

एक लांब श्वास सोडून चहा पिऊन तो बाहेर मित्रायला भेटायला गेला. ती दोन दिवस भरभरून जगली तिसऱ्या दिवशी इंदर त्याच्या कामाला निघून गेला. 


रमेशराव कुणाला नं कुणाला जेवणाला घरी घेऊन येत होते. मग त्यांच जेवणं की ते जातं .. सर्व पोटभरून जेवण करत होते. पण वैदेही मात्र अर्धपोटी तर कधी उपाशी झोपत होती. मंगलाबाई आणि नंदा तर विचारतही नव्हत्या. वैदेहीचा स्वभाव चांगला असल्यामुळे तिचं आणि तिच्या लहान सासवांच छान पटायचं. इंदरच्या काकवांना या तिघांचे स्वभाव माहिती होते. त्या नेहमी तिला मदत करत होते मग ती ही त्यांना खूप मानत होती. 

इंदरने दिलेले पैसे संपले की घरात पैशांची उणीव भासत होती . घरात खायला काही नसायचं तेव्हा वैदेहीने तिच्या लग्नाच्या पंगतीतील उरलेल्या पोळ्या त्यांना उन्हात वाळवून त्यावर लाल मिरचीचा ठेच्यासोबत खाल्ले होते. असे दिवस वैदेहीने काढले होते.. फक्त वैदेही ने खाल्ले आहेत. इंदरने कधीच शिळी पोळी भाकर खाल्ली नाही .

"आता किती दिवस घरात राहशील पोरी शेतात चालत जाय माह्या संगन, तेवढचं खर्चाले हातभार लागीन ".. मंगलादेवी

" पण म्या कधी शेतीचे काम नाही केले आत्याबाई ".. वैदेही 

"आमचं पाहून पाहून करत जायचं ". मंगला देवी म्हणाल्या


तिने मान डोलवली. वैदेही शेतात जाऊ लागली. .
काशीबाई सोबत ती शेतात जात होती. काशीबाई तिला शेतीचे काम शिकवत होत्या. शेतात कामाच्या वेळाला ती त्याच पोळ्या घेऊन जायची तिच्या सोबतच्या बायकांना तिच्यावर दया येत होती. 


"वैदेही माझ्याघरी तू केव्हाही हक्काने ये आणि जेवण करून जात जा !" … काशीबाई तिला मायेने म्हणाला.

"हो आत्याबाई म्या येत जाणार ".. वैदेहीच्या डोळ्यांत पाणी जमा झाले.


वैदेही एक दिवस उसाची पत्ती कापायला गेली. ह्या कामाला पहिल्यांदाच आली माहिती नव्हतं कसं करायचे असते. तिने सरळ पत्ती घेतली आणि ओढली. जशी ओढली तशी तिचे हातांना काप (कट ) बसला . दोघेही हातांना कट बसल्यामुळे रक्त येत होते.काशीबाईंनी तिला कपडा बांधून दिला.घरी जाऊन तिला आराम करायला सांगितले. घरी जाऊन आराम करू असा विचार होता पण ती घरी लवकर आल्यामुळे कामांचा पसारा दिसला. आणि सासूबाईनी तिला हुकूम सोडला. 

"जा आता पाट्यावर मसाला वाट ."


"आत्याबाई माल्या हाताला लागलं आहे." … वैदेही .


 "मग काय झाल तरीही वाट ".. मंगलादेवी.

 "बाई तुम्ही वाटना आजच्या दिवस .".. वेदेही तिच्या नंणदेकडे आशेने बघत म्हणाली .

 "मी नाही वाटणार " ... नंदा 


ती मसाला वाटायला पाट्यावर बसली . हातात तिखट लागल की झोंबतं होते.चररर होत होते अन् डोळ्यांतून निरंतर अश्रु बरसत होते.

आजूबाजूच्या लोकांनाही त्या तिघांची वागणूक दिसत होती.माहिती होती. त्याच्यातील काही लोक तिला येथून जाण्याचा सल्ला देत होते .

"जा निघून जा इथून, काय आहे यांच्याघरात, फारकत घे किती त्रास देताय तुला" ... तर कुणी म्हणतं होते 
" बेटा हे दिवसही निघून जातील इंदर खूप चांगला आहे. या लोकांकडे लक्ष देऊ नकोस "..


क्रमश ...

🎭 Series Post

View all