अष्टाक्षरी काव्य
शीर्षक:- प्रश्न मनास छळला
सूर जीवनाचा असा
कधी न कोणा कळला
सर्व आयुष्य बनून
प्रश्न मनास छळला
कधी न कोणा कळला
सर्व आयुष्य बनून
प्रश्न मनास छळला
जीवनाचा डाव असे
दोन घडीचा सुरस
सोपे नसते जीवन
सदा असते चुरस
दोन घडीचा सुरस
सोपे नसते जीवन
सदा असते चुरस
मार्ग असो कितीतरी
अवघड चढायला
जीवनाचा हा संघर्ष
शिकवतो लढायला
अवघड चढायला
जीवनाचा हा संघर्ष
शिकवतो लढायला
क्षण हे जीवनातील
कधी गोड कधी कडू
आसू डोळ्यातून वाहे
कधी हसू कधी रडू
कधी गोड कधी कडू
आसू डोळ्यातून वाहे
कधी हसू कधी रडू
जीवनाचे अनुभव
भविष्यात येई कामी
सुखकर जीवनाची
नांदी असल्याची हामी
भविष्यात येई कामी
सुखकर जीवनाची
नांदी असल्याची हामी
©️ जयश्री शिंदे
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा