Jan 19, 2022
नारीवादी

प्रकाश शोधण्यासाठी अंधारातूनच वाट शोधावी लागते

Read Later
प्रकाश शोधण्यासाठी अंधारातूनच वाट शोधावी लागते

राधा ऑफिस मधून आली आणि जोरजोरात रडु लागली..."बॉसने प्रोमोशन नाही दिले, आणि रघूला,तिच्या नवऱ्याला   बिलगून रडु लागली .
खूपच रडत होती, तिला कळतच न्हवतं की,बॉसने प्रोमोशन का नाही दिले?वर्षभर मान मोडून काम करत होती.सर्वच कसोटीला लागले होते पण काय मेहनतीची किंमत नाही .हे राधाला कळून चुकले होते...  

ज्या व्यक्तीला प्रोमोशन भेटले होते ,तो तर कोणतीही कामं व्यवस्थित न्हवता करत, ना ऑफिस मध्ये वेळेवर यायचा... फक्त बॉसमोर हाजी हाजी करायचा..त्याच गोष्टीचा राधाला राग आला ,प्रमाणिकपनाचे असे हे वाट्याला फळ आले होते..

 

राधा लहानपणापासूनच कष्टाळू ,मेहनती होती.

भूतकाळ आठवला तीला ,शाळेतल्या बाईंनी नेहमीच तिला एकच शिकवण दिली होती... काहीही झालं तरी इमानदारीचा रस्ता सोडायचा नाही...खरं तर राधा फार हुशार होती.. एकदा तिला तिच्या मॅडमनी चुकून दोन मार्क्स जास्त दिले होतें म्हणून ती पुन्हा मॅडम कडे गेली, आणि  गुण कमी करायला सांगितले, तेव्हा मॅडमनी तिची पाठ थोपटली होती..

तिला आज फार वाईट वाटत होतं.. मनालाच प्रश्न विचारत होती..??खरंच गुन्हा आहे का,प्रामाणिकपणे राहणे???का माझी बढती नाही झाली...तिच्याच तंद्रीत राधा होती, ते पाहून रघूने तिला बाहेर नेहण्याचा प्लॅन केला..नको नको म्हणताना त्याने राधाला जबरदस्ती गाडीत बसवले... तिला आवडतो त्या ठिकाणी घेऊन गेला..समुद्र किनारी.. संध्याकाळची वेळ होती. सूर्य निरोप देत होता... राधाने पटकन मोबाइल काढला आणि फोटो क्लिक केला...राघूला बरं वाटलं ..त्याने तिचा हातात हात घेतला आणि बोलला राधा, माहीत आहे प्रोमोशन झालं नाही म्हणून तू नाराज आहे, पण राधा तू मेहनती आहे,प्रामाणिक आहे कधी न कधी नक्की पुढे जाशील पण ,ह्या क्षणाला तू स्वतःला सावरण गरजेचं आहे..हा सूर्य आहे ना जो हळू हळू लपतोय त्याला बघ ना,त्याच अस्तित्व ह्या क्षणाला नाहीस होऊन जातं ,पण नंतर सकाळ होते तेव्हा त्याच्या तेजाने सर्व जगाला प्रकाश देतो...तू सुद्धा सुर्या समान आहेस...ह्या क्षणाला तू पुढे जाऊ शकली नाही,ह्याचा अर्थ असा नाही की तुझ्यात टलेंट नाही..फक्त वेळ जाऊ दे...योग्य वेळ जेव्हा येईल तेव्हा तू सुद्धा ह्या सुर्यासारखी तळपशील....

राधाला खूप बरं वाटलं,तिने त्याच्या खांद्यावर डोके ठेवलं आणि निरखून पाहू लागली त्या अस्ताला जाणाऱ्या सूर्याला,त्याच्या तेजाला ,त्याच्या शक्तीला ..सर्व काही डोळ्यात साठवलं तिने...जणू पुन्हा सक्षम झाली स्वतःची ओळख नव्या जोमाने बनवायला...मनावर आलेले मळभ, निराशा जणू नाहीशी झाली होती..

 

अश्विनी कुणाल ओगले

लेख आवडल्यास लाईक,कंमेंट, नासवसाहित शेअर करा.. मला नक्की फॉलो करा????

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
Circle Image

अश्विनी ओगले

Blogger

Love life Enjoying every second of life Now enjoying as a blogger ✍️ Love to share my experience through writing and touch the soul through writing from❤️ Finding me in new way..