प्रजासत्ताकदिन

जय भीम...


तर आता आपल्या समोर छोटसं भाषणं सादर करायला येत आहे सुरभी गायकवाड. दरवर्षी प्रमाणे यावर्षी पण सुरभी ताई काहीतरी वेगळा आणि खरा विषय घेऊन येणार आहे. सगळ्यांनी टाळ्या वाजवून तिचं स्वागत करावं आणि तिचा उत्साह वाढवावा... टाळ्या...
सगळे टाळ्या वाजवतात. सुरभी मंचावर येऊन सगळ्यांना नमस्कार करते आणि जोरदार नारा लावते.

"भारत......माता की, "सुरभी

"जय......" मंचा समोर बसलेले प्रेक्षक मोठ्याने जय बोलून घोषणा पुरी करतात.

"वंदे...." सुरभी

"मातरम्...." पुन्हा एकदा प्रेक्षक वर्ग मोठ्याने घोषणा देतं.
अश्याच आणखी तीन वेळा सुरभी घोषणा देते बाकी प्रेक्षक पण तिला घोषणा द्यायला साथ देतात.

"जोर सर बोलो, जय भीम...." सुरभी

सगळेच शांत......

"अरे, काय झालं? बोला माझ्या मागे. सुरभी पुन्हा एकदा नारा देते,जोर से बोलो....."सुरभी
फक्त लहान, अल्लड वय असणारी मुलचं जोरात ओरडून \"जय भीम\" चा नारा देतात, जो आवाज तिला \"वंदे मातरम्\" चा नारा देतांना आला होता, त्यातल्या दहा टक्के पण आवाज \"जय भीम\" चा नारा दिल्यावर आला नव्हता.

"काय झालं? \"भारत माता की जय\" \"वंदे मातरम्\" सगळे अगदी उत्साहात बोललात पण \"जय भीम\" चा नारा कुणीच दिला नाही. का? कारण डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे बौद्ध होते म्हणून, की बुद्ध धम्म म्हणजे खालची जात आहे म्हणून. आजच्या दिवशी जात किंवा जातीवाद या विषयावर मी बोलायला आले नाही. दरवर्षीप्रमाणे यावर्षी पण सगळ्यांसाठी नवीन माहिती घेऊन आले आहे. \"२६ जानेवारी प्रजासत्ताक दिन\" म्हणजे आपल्यासाठी एक सुट्टीचा दिवस. झेंडा फडकावून झाला की मस्त जिलबीवर ताव मारायचा आणि दिवसभर काही कामं नाही म्हणून लोळत पडायचं.
खरतरं २६ जानेवारी १९५० रोजी भारतात संविधान लागू करण्यात आलं होतं.
हो, तेच संविधान जे बाबासाहेबांनी \"२ वर्षे ११ महिने १८ दिवस\" रात्रंदिवस जागून त्यावर सखोल अभ्यास करून ज्याची निर्मिती केली होती. महाराचा पोरगा नीच जातीतला, म्हणून ज्या मुलाला वर्गात बसू दिलं नाही.... त्याच मुलाने रस्त्यावर असणाऱ्या लायटिंच्या उजेडात (ज्याला आपण स्ट्रीट लाईट म्हणतो) बसून अभ्यास केला. स्कॉलरशिप मिळवून मोठं शिक्षण घेतलं. वेळेला उपाशी पोटी झोपला. आज त्यांनी लिहिलेल्या \"संविधानावर\" संपूर्ण देश चालतोय, मग त्याच्याच नावाचा नारा द्यायला कसली लाज वाटते आपल्याला. सुट्टीचा दिवस असतो म्हणून सगळे त्या दिवशी सत्यनारायणाची पूजा, मुलांसाठी छोट्या मोठया स्पर्धा, नाचगाणी (नाचगाणी कसली नुसता धिंगाणा आणि अश्लील गाण्यांवर नाच असतात नुसते.) आणि बायकांचं हळदीकुंकू मात्र आवर्जून ठेवतात.....अरे काय चाललंय.....

आजपण शाळेत मुलांना आजच्या दिवशीची खरी आणि सखोल माहिती शिक्षक देत नाहीत. माझ्या मैत्रिणीचा स्टेट्स पाहिला आणि तडक आपल्या गुगल काकांवर जाऊन सर्च केलं. तेंव्हा खरी माहिती भेटली.
मग अस वाटलं आपण कुठं तरी चुकतोय. जी गोष्ट आपल्याला माहीत नव्हती तोपर्यंत ठीक होत पण एखादी गोष्ट माहीत असतांना त्याबद्दल माहिती न देणे हे पण चुकचं ना?
ज्यांनी आपल्याला हक्क,अधिकार मिळवून दिले, त्या महापुरुषाला आपण वंदन करून त्याचे आभारही मानत नाही कधी. जय भीम म्हणणं तर सोडाचं, आपण त्याच्या प्रतिमेपुढे नतमस्तक व्हायला सुद्धा लाजतो. ही लाज सगळ्यांनीचं सोडून द्यावी. जसा आपला देश आपली \"शान\" आहे \"छत्रपती शिवाजी महाराज आपली \"जान\" आहेत तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर पण आपला \"अभिमान \" असायला हवेत. खरतरं आंबेडकर आपल्या देशात जन्माला येणारे \"सुर्यपूत्र\" म्हणून आपल्या सगळ्यांनाच त्यांचा अभिमान असावा, पण दुर्दैव हेच की आजच्या दिवशी पण कोणी \"जय भीम\" चा नारा देत नाही. २६ जानेवारी १९५० पासून भारत देश प्रजासत्ताक झाला,म्हणजे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी भारतातील प्रत्येकाला एक मत देण्याचा अधिकार मिळवून देऊन त्या मतांच्या आधारेच प्रजेची सत्ता निर्माण केली होती. स्वातंत्र्यापूर्वी भारतात \"राजा\" हा \"राणीच्या\" पोटी जन्म घ्यायचा पण प्रजासत्ताकदिनापासून \"राजा\" हा \"मतांच्या\" पेटीतून निघायला लागला. एवढ्या मोठ्या परिवर्तन जनकाचा आपण जयघोष करत नाही हीच खंत आहे.
यापुढे ध्वजारोहण करतांना डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची प्रतिमा ठेवूनच ध्वजारोहण केलं पाहिज सगळ्यांनी.
ज्यांनी एवढे कष्ट घेऊन आपल्याला हक्क,अधिकारी मिळवून दिले त्या डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना त्रिवार अभिवादन करून मी इथेच माझे दोन शब्द संपवते.
त्यापूर्वी एक छोटसं गाणं गाण्याचा प्रयत्न करते. पूर्ण गाणं नाही म्हणणार दोन कडवे घेते फक्त.

हम्मम्म

होती गुलामी गळयाला दोरी, राष्ट्रगीत म्हणाया चोरी,
होती गुलामी गळयाला दोरी,राष्ट्रगीत म्हणाया चोरी,
साक्ष पुरावा देईल सारी, साक्ष पुरावा देईल सारी,
ती सव्वीस जानेवारी......।
तश्या तुफानी माझ्या भिमानी, तश्या तुफानी माझ्या भिमानी
किनारी लावलीया नाव.....
घटनेच्या पहिल्या पानावरती गाजतयं माझ्या भिमाचं नाव......

होतं ओसाड पिकवलं रान, विद्यापती असा विद्वान,
होतं ओसाड पिकवलं रान,विद्यापती असा विद्वान,
असं देशाला दिलया दान,असं देशाला दिलया दान
ग्रंथ मौलिक संविधान......
लोकशाहीला मुजरा करती, लोकशाहीला मुजरा करती
रंक आणि ते राव
घटनेच्या पहिल्या पनावरती गाजतय माझ्या भिमाचं नावं....
धन्यवाद.... जय भीम......"सुरभी

"जय....भीम...." आता मात्र सगळेच प्रेक्षक मोठयाने \"जय भीम\" चा नारा देतात.
समाप्त...
लेखिका
श्रावणी लोखंडे