नको कौतुक आता, घ्या थोडी उसंत..
एका दिवसाचे कौतुक बाई, मला नाही पसंत...
आज पुरेपूर पडेल सगळीकडे, कौतुकाचा सडा
कौतुकाची ही प्रथा आता मोडून काढा..
कौतुकाची ही प्रथा आता मोडून काढा..
गरजच काय कौतुकाची, फक्त आदर केलात तरी चालतो..
कुणाला ठाऊक बाकी दिवस, तिचा जीव किती झुरतो...
कुणाला ठाऊक बाकी दिवस, तिचा जीव किती झुरतो...
आज असणार मोबाईल वर स्टेटसचा भडीमार...
उद्या नाक्यावर उभे राहून तुम्ही पुन्हा शीळ फुकणार...
उद्या नाक्यावर उभे राहून तुम्ही पुन्हा शीळ फुकणार...
आदर नसेल मनात तर कौतुकाला अर्थ नाही..
हेच हवे एका *स्त्री* ला, बाकी कशाची गरज नाही...
हेच हवे एका *स्त्री* ला, बाकी कशाची गरज नाही...
©®ऋचा निलिमा
#womensday#lady#life