Feb 23, 2024
राज्यस्तरीय करंडक लघुकथा स्पर्धा

रणरागिणी

Read Later
रणरागिणी


स्पर्धा-"राज्य स्तरिय करंडक लघुकथा स्पर्धा"

विषय- काळ आला होता पण....

शीर्षक- रणरागिणी

अस म्हणतात की,
\" काही वाक्यप्रचारं हे आपल्या दैनंदिन घटना किंवा कृती यांमधून घडत असतात\" आणि \"काही  वाक्यप्रचारांवरुन आपल्या सोबत घडलेल्या घटना किंवा कृतींची सांगड घातली जाते....!\" अर्थात हे त्या त्या घटनेनुसार आणि कृतीनुसार अवलंबून असते.मानसी सदावर्ते.
नुकतीचं बारावी उत्तीर्ण झाली होती. आत्ता ज्युनिअर कॉलेज मधूनं सिनिअर कॉलेज ला जाणार म्हणजे ती उत्सुकता, ते कुतूहल, ती धाकधूक सगळंच असतं नाही मनी? नुसतं कॉलेज ला एडमिशन घेऊन भागत नाही तरं नंतर ची बारीक- सारीक  खरेदी,थोडं छोटं -मोठं सामानं ही घ्यावं लागतं. बर ते खरेदी करणं कुटूंबासोबत राहूदे पण अगदी आई किंवा वडील यांच्या सोबत जातानाची मज्जा, उत्साहं काहीसा निराळाच असतो ना? आणि ते जरं आपल्या बालपणीच्या मैत्रिणींच्या सोबतं जात असू तरं? तर मग काही विचारायालाच नको...!


मानसी देखील अशीच मैत्रिणींच्या सोबत खरेदी करायला गेली होती. दिवसं असाच गेला. बरं शहरात गेल्या होत्या त्या. तिथे तिच्या मैत्रिणीच्या आत्याकडे राहणार होत्या.
रात्रीची वेळ होती..त्या बस थांबवत होत्या. तस बस देखील थांबवायच्या. पण ते काही गाव नव्हे ना आपण जाईपर्यंत थांबायला. ते शहर होत. त्या तिघी जाईपर्यंत ती बस निघून देखील गेलेली असायची. अस करत करत अनेक बस चुकल्या त्यांच्या. कारण त्या बस पकडायला गेल्या की पळायला लागायचं आणि त्यांना एवढं पळायची सवय देखील नव्हती.

त्यामुळे निश्चितचं दम लागत होता. छाती फुलत होती. प्रचंड दम लागत होता.अंगातून घामाच्या धारा येत होत्या. तरी या पायपीट करतच होत्या. अक्षरशः तिघी वैतागल्या होत्या. शेवटी अशीच एक बस थांबली. त्या पळायला लागल्या पण मानसीला बराच दम लागला होता. त्यामुळे त्या पळता पळता पुढे गेल्या आणि बस मध्ये चढल्या. तोपर्यंत मनु मागून जाईपर्यंत बस सुटून गेली होती. त्यामुळे ही तशीच मागे राहिली.


एवढ्या मोठ्या शहराती ती या पूर्वी कधी आली नव्हती असं नव्हतं. पण आज काहीस तिला वेगळे जाणवत होतं. चांगलाचं दम देखील लागला होता.कपडे घामाने ओले झाले होते. केस घामाने चिंब भिजले होते.... घशाला कोरड पडली होती . त्यात \"दुष्काळात तेरावा महिना\" तस चालता चालता चप्पलच देखील काहीतरी बिनसलं होतं.

अक्षरशा ती वैतागली होती. मगाशी मैत्रीणी होत्या तरं त्यांना थोडा तरी रस्ता माहिती होता. त्यामुळे त्या पुढचा पुढचा स्टॉप घेत आलेल्या. अगदी फार काही मध्ये जास्त अंतर नसायचे स्टॉपच्या  पण आता ती चालत असताना बरंच अंतर कापले गेल होत. त्यात रात्र ही झाली होती.


  रात्रीचे सुमारे ९ वाजले असतील. सुमसाम रस्ता, सुनसान जागा,दूर दूर पर्यंत रस्त्यावर एक चिटपाखरूही दिसत नव्हतं, किर्र अशी शांतता पसरलेली, त्यात रात किड्यांचा आवाज,१०/१५ मिनीट नंतर एखादी दुचाकी तेवढी फिरकत होती. रात्रीचे शांत पण काळे आकाश त्यात टाचणी पडली तरी आवाज येईल एवढी सुन्न करणारी शांतता...

             आणि ह्या भयाण  शांततेत \"ती\" पण रस्त्यावर एकटी होती.  ती म्हणजेच आपली मानसी. लांबलचक कंबरेपर्यंत रुळणारे  केस,  भीतीने पाणावलेले काळेभोर डोळे. कवणीय नाजूक बांधा,गोरा वर्ण असलेली ती रात्रीच्या अंधारातही उजळून दिसत होती. उशीर झाला म्हणून घाबरली होती..त्यात चालता चालता चप्पल ही तुटलं होतं.मोबाईल ही स्विच ऑफ झाला होता...तिला काय करावं काहीच समजत नव्हतं..ती तर स्वतःच्या च विचारात मग्न होती.
                     तितक्यात एक दुचाकी तिच्या समोर येऊन उभी राहिली. ती त्यांना असं अचानक आलेलं पाहून घाबरली, कावरीबावरी झाली.

त्या दुचाकीवरुन एक दुचाकी स्वार उरतला.. आणि बोलू लागला

"आहाहा क्या माल हैं भाई. हाये इसने तो चार चांद लगा दिये" रहमान

"हा भाई इसे हम मालिक के पास ले गये तो वो भी खुश हो जायेंगे" अब्दुल

तिच्याकडे वासनाधीन नजरेने पाहून ते बोलत होते.

"भाईसाहब जाने दो मुझे" ती
व्याकूळ होऊन ती त्यांच्याकडे बघून बोलत होती...डोळ्यातून अखंड अश्रू वाहत होते..

"हाये मेरी जान, अभी अभी तो मिली हो ऐसे कैसे जाने दे तुझे..थोडा मजा तो लेने दे" क्रूरपणे हसत रेहमान बोलला

      आणि ते दोघे तिच्या जवळ येऊ लागले...  स्वतःला वाचवण्याचा ती पुरेपूर प्रयत्न करत होती. पण त्या दोघांपुढे तिच्या एकटीची ताकद कितीही म्हटलं तरी कमीच. स्वतःचा प्राण वाचवण्यासाठी साठी ती ओरडत होती जेणेकरून कोणाची तरी मदत भेटेल पण इतक्या सामसूम रस्त्यावर कोणीच नव्हतं.
                तितक्यात तिथे एका गाडीचा प्रकाश झोत पडला. थोड्या प्रमाणात का होईना पण तिला बरं वाटू लागलं. गाडीचा दार उघडलं, ब्लॅक जिन्स, व्हाईट शर्ट व त्यावर ब्राऊन कलर च जॅकेट ..असा पोशाख असणारी व्यक्ती त्यातून\" बाहेर आली. चेहरा मास्क ने झाकला होता म्हणून दिसत नव्हता पण ते तीक्ष्ण डोळे रात्रीच्या अंधारात अजून जास्त चमकत होते आणि आत्ता ते रागाने लाल झाले होते...
ती व्यक्ती समोर आली आणि त्या मानव रूपी राक्षसांना मारायला सुरुवात केली...ती व्यक्ती त्यांना एवढं इमारत होती की ते अर्धमेले झाले होते... अखेरीस त्यांनी दुचाकी काढली व तिथून पळून गेले ....
                 ती व्यक्ती पण तीला सावरण्यासाठी तिच्या कडे गेली. चेहऱ्यावरील मास्क काढलं व काळेभोर लांबलचक केस मोकळे सोडले.
ती मुलगी आहे हे पाहताच तिला धक्का बसला व स्वतःला न सावरता तिने तिला मिठीच मारली...

"आता कसं वाटतंय तुला? बरी आहेस न?", तिने चिंतेच्या स्वरात तिला विचारलं.


तस इकडे मानसीने होकारात मान डोलावली.

त्या मुलीने हिच्या एकदा पाहिलं तसं तिच्या काहीतरी लक्षात आलं त्या मुलीने मानसीला थोडसं पाणी प्यायला दिलं मी मानसी नको म्हणत असताना खायला ही दिल.
मानसी नको म्हणत होती तरीही पण हिने जबरदस्ती तिला मानसिला खायला घातलं. मग तिच्या घराचा पत्ता विचारून तिला सोडलं. अर्थात ती चालत चालत त्यांच्या गावात जाणाऱ्या शॉर्ट कट  कडे गेली होती. थोड्याच वेळात त्या घरी आल्या.

ह्या मुलीला मानसीने तिचं नाव विचारलं पण तिने ते सांगितलं नाही.


"नावात काय आहे? आणि माझं नाव जाणून तू काय करणार?" अस म्हणत तिने हसत हसत मानसीचा प्रश्न अगदी धुडकावून लावला.

"नेहमीच मी मदतीला येईन अस नाही ना? सो टेक केअर...!" अस म्हणत ती मुलगी हसून निघून गेली पण इकडे मानसी मात्र फक्त ती गेलेल्या दिशेने पाहतच राहिली.

दुसऱ्या दिवशी सकाळी....

मानसी च्या कॉलेज चा पहिला दिवड होता. तिने आदल्या रात्री घडेलला प्रकार घरात सांगितला नव्हता. आज सकाळी ती लवकर उठून पट्कन कॉलेज ला जायला निघाली. इतक्यात रेडीओ वर लागलेली बातमी तिने ऐकू आली. आणि सेम तीच बातमी टीव्ही वर ही दिसली.


"या वर्षीचा युवा महिला पुरस्काराच्या मानकरी ठरल्या आहेत दुर्गा जगताप....!" आणि त्यांच्या बद्दलची  माहिती, त्यांचा फोटो दाखवू लागले. उत्सुकता म्हणून सहज मानसीने जाता जाता डोकावून पाहिलं आणि तिला
आश्चर्याचा धक्काच बसला. कारण तिला मदत करणारी मुलगी दुसरी तिसरी कोणी नसून दुर्गा जगतापच होत्या. त्यांचं काम सर्वांना माहीत होतं, नाव ही माहीत होतं बंद त्यांना जास्त  लोकांनी पाहिलं नव्हतं. ज्यांनी पाहिलं होत त्यांना ते अस समजायचं आणि ते खजील व्हायचे.


ते म्हणतात ना,
"एक यर नावं तरी अस करा ज्याने काम झालं पाहिजे" किंवा मग " एक तर काम तरी अस करा की ज्याने नाव झालं पाहिजे" हे दुर्गा च्या बाबतीत अगदी तंतोतंत जुळत होत.


"खरचं या मॅडम काल आल्या नसत्या तर? त्या नराधमांनी माझे काय हाल केले असते कल्पना न केलेलीच बरी....! ( ह्या नुसत्या विचारानेच तिच्या अंगावर भीतीने काटा आला.) ते म्हणतात ना, \"काळ आला होता पण वेळ आली नव्हती\" असच काहीस माझ्या बाबतीत झालं. असो आज पासून या रणरागिणी च्या रूपाने माझ्यात एक वेगळीच ताकद, ऊर्जा निर्माण झाली आहे. आजपासून नव्या जोमाने आणि नवख्या उत्साहाने सुरुवात करू आयुष्याची...!" अस म्हणत मानसी हसत कॉलेज ला गेली.


आज पुन्हा एकदा नशीब पालटलं होत ते त्या रणरागिणीच्या रूपाने....,


काळ आला होता पण....!

©®रितीका देशपांडे

जिल्हा- सांगली, सातारा

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
ईराच्या कथांचे कुठलेही भाग मिस करू नका, आजच जॉईन करा ईरा वाचनालय. व्हाट्सएप: व्हाट्सएप:
Circle Image

Ritika

//