Login

पोस्टमॅन

पुन्हा नव्याने सुरुवात पत्रव्यवहाराची


आई, बाहेर कुणीतरी आल ग.

अग बघ की जरा कोण आहे ते.

मी नाही, तूच बघ

काय तुम्ही आजकालची मुल ना टीव्ही समोर बसली की काही नको असत तुम्हाला.मीच बघते तू खंड नको पडू देऊस तूझ्या टीव्ही बघण्यात.

बाहेर जाऊन बघते तर पोस्टमॅन उभे होते. या मोबाईलच्या जमान्यात पोस्टमॅन काय घेऊन आले? रक्षाबंधन सोडल तर लेखी पत्रव्यवहार आता जवळपास संपुष्टात आलाय. उत्सुकतेने जाऊन बघते तर अंतरदेशीय पत्र होत. नाव तर माझंच दिसतय पलटवून बघते तर तेजस्विनी रहाटे माझी B.ed ची मैत्रीण तिच पत्र होत. लग्नानंतर मी B. Ed केल. आणि तेजस्विनीच लग्न व्हायचंच होत. आम्हा दोघींचेही  वय जवळपास सारखेच होते. B. Ed झाल्यावर सुरुवातीच्या काही वर्षात फोनवर संपर्क होता, पत्रव्यवहार करण्याची कधीपासून गरजच पडली नाही. मध्यतरीच्या काळात फोनवर बोलण देखील बंद झालं होत. मोबाईल नंबर बदलल्यामुळे संपर्क जणू तुटलाच होता. B. Ed च्या वेळी स्लॅमबूक लिहून घेतले होते त्यात लिहून दिलेला पत्ता आज कामी आला.

एका क्षणात हे विचार डोक्यात येऊन गेले आणि पटकन मी ते पत्र उघडून वाचायला लागले.


                                    श्री 

प्रिय, जानव्ही

कशी आहेस? काय माहिती तुला माझं पत्र मिळते की नाही ते? पत्ता बदलवला नसशील तर आता तू हे पत्र वाचतं असशील.

मध्यंतरीच्या काळात मोबाईल नंबर बदलले, माझे लग्न झाले त्यामुळे तुझ्याशी संपर्क करता आला नाही. आणि तू देखील तसा प्रयत्न केला नाहीस. नाहीतर तुझं एखाद पत्र तरी माझ्या आईकडे पोहचल असतं.

जाऊदे ते आता... अग आज मुद्दाम स्लॅमबूक काढून त्यातला तुझा ऍड्रेस घेतला. मोबाईल नंबर होता तुझा त्यात, पण मुद्दाम कॉल केला नाही. म्हंटल जुन्या काळाप्रमाणे पत्रव्यवहार करावा आणि तुला सरप्राईज द्यावं.

तुला लेखणाची-वाचणाची आवड आहे ना, म्हणून हा नवीन उद्योग आहे. मुद्दाम पत्रात मोबाईल no. देत नाही कारण तुझा रिप्लाय मला पत्रातच हवयं.

अग बघ ना मोबाईल मुळे आपल्या मुलांना देखील पोस्ट मॅन कोण? त्यांच काय काम असतं हे देखील माहिती नाही. निदान आपण पत्रव्यवहार केल्यामुळे आपल्या मुलांना पत्र पाठवणे काय असते हे कळेल.

माझं सर्व छान चाललय नोकरीं, घर, मुलं आणि नवरा सांभाळताना मित्र मैत्रिणींना देण्यासाठी वेळच मिळाला नाही ग. आता वाटत आपण सर्वांनी वेळ काढून एकमेकांसोबत बोलायला तर हवच पण सोबतच पत्राची परंपरा देखील सुरु करावी. म्हणून विशेष हे पत्र लेखन.

मी आता तुलाच नाही तर सर्वाना पत्र लिहून जाग करणार आहे.

तुझी खुशाली कळव पत्राद्वारेच बर का.., तूझ्या गोड गोड मुलींना गोड गोड पापा?, माझ्या मैत्रिणीला जादुकी झप्पी  ?, भाऊजींना दंडवत.??

असाच लोभ असू दे

                            तुझीच मैत्रीण

                               तेजस्विनी


पत्र आवडल्यास like आणि कमेंट करा. शेअर करायचा असेल तर नावासहितच करा. ????✍?️©जयश्री कन्हेरे -सातपुते