पोस्टमन आणि पत्रची भेट...

Postman ani patra chi bhet

पोस्टमन आणि पत्रची भेट----


पोस्टमन- “बरेच दिवस झाले आपली भेट झाली नाही.”


पत्र- “हो ना सगळे विसरले मला. आता तुझी माझी भेट होतच नाही.”


पोस्टमन- “माझ्याशी भेट व्हायच्या आधी कितीतरी लोकांशी तुझी भेट व्हायची. सगळे जिव्हाळ्याने तुला जवळ करायचे.”

पत्र- “काळ बदलला, पिढ्यानपिढ्या चालत आलेल्या परंपराही बदलल्या. इंटरनेटचं जग आलं. मोबाईल, टॅब, लॅपटॉप, कॉम्प्युटर किती त्या सुविधा निर्माण झाल्या. आधी लोक माझी आठवण करायचे.

दूर बॉर्डरवर असलेल्या मुलासाठी आई प्रेमाने भरलेलं पत्र लिहायची. त्या लेखणीत तिचं प्रेम उतरायचं. त्या प्रेमाचा सुगंध त्याच्या पर्यंत दरवळत जायचा.  दूर असलेल्या नवराबायको मधील अंतर कमी करण्याचं काम मी करायचो.


पण आता काय दूर असलेल्या मित्राशी बोलायचं असेल तर डायरेक्ट कॉल लावता येतो, मेल करता येतो,मॅसेज करता येतो. चॅटिंग करता येत. सगळ्या सुविधा अगदी फास्ट आहेत. मग सगळे माझी आठवण का करतील.

पोस्टमन- “ हो तरीही तुला माहीत आहे का, आजही काही जुनी लोक आहेत ज्यांनी तुला सांभाळून ठेवलंय. त्या आठवणींना हृदयाच्या कप्प्यात साठवून ठेवलंय. अरे कितीही जमाना येऊ दे इंटरनेटचा, तुझी सर कुणालाच नाही.

पत्र- “हो आणि तुला माहीत आहे का माझ्यामुळे तू घराघरात पोहोचलास. लोकांसोबत तुझी ओळख झाली.

पोस्टमन- लोकं पत्र लिहिताना त्यात प्रेम आणि जिव्हाळा ओतायचे. आताच्या मेल मध्ये नुसती फार्मलिटी असते. त्यात प्रेम कुठे असतं. मित्रा पत्र तू उदास होऊ नको. एक काळ असाही येईल की लोक तुलाच जवळ करतील. मानवी युग यंत्रप्रमाणे चालतंय. पण विसरू नको ते यंत्र आहे, त्याचा नाश नक्की आहे. पण परत आपली भेट रोज होणार.”

दोघेही एकमेकांकडे बघून हसले.


समाप्त: