पॉझिटिव्ह थिंकिंग

Laghu Nibandh
पॉझिटिव्ह थिंकिंगचे महत्व


मन वढाय वढाय, उभ्या पीकातलं ढोर । किती हाकला हाकला, फिरी येतं पिकांवर ।।
मन मोकाट मोकाट, त्याले ठायी ठायी वाटा । जशा वार्यानं चालल्या, पानावर्हल्यारे लाटा ।।
मन लहरी लहरी, त्याले हाती धरे कोन? । उंडारलं उंडारलं जसं वारा वाहादन ।।
मन जह्यरी जह्यरी, याचं न्यारं रे तंतर आरे । इचू साप बरा, त्याले उतारे मंतर ।।
मन पाखरू पाखरू, त्याची काय सांगू मात?। आता व्हतं भुईवर, गेलं गेलं आभायात ।।
मन चप्पय चप्पय, त्याले नही जरा धीर । तठे व्हयीसनी ईज, आलं आलं धर्तीवर ।।
मन एवढं एवढं, जसा खाकसचा दाना । मन केवढं केवढं? आभायात बी मायेना ॥
देवा, कसं देलं मन आसं नही दुनियात । आसा कसा रे तू योगी काय तुझी करामत ॥
देवा, आसं कसं मन? आसं कसं रे घडलं । कुठे जागेपनी तूले असं सपनं पडलं ॥

कवयित्री – बहिणाबाई चौधरी
बहिणा बाईंनी ह्या कवितेमधून मनाची व्यापकता मांडायचा प्रयत्न केला आहे .. तर असे हे मन कधी आकाशात तर कधी पाताळात कुठे कुठे जाऊ शकते तेही एका सेकंदात आपण मोजू शकत नाही .. ह्या मनात असलेल्या संकल्प म्हणजे विचारांनी ते एका क्षणात अंतराळात जाऊन संपूर्ण जग फिरून येऊ शकते इतकी त्यात ताकद आहे .. शाश्वत आणि अशाश्वत , सजीव निर्जीव कोणत्याही वस्तू , विषय आणि ठिकाणी ते संकल्प शक्तीने पोहचू शकतात .
तर अशा या मनात जे विचार येतात ते कसे येतात ? किंवा त्यांची उत्पत्ती कशी येते ह्याकडे बघू
मनातले विचार हे इनपुट वर आउटपुट असते .. जे इनपुट तुम्ही तुमच्या मनाला द्याल म्हणजेच माहिती जी आपण वाचून पाहून मनाला देत असतो त्यावर तसे विचार उत्पन्न होतात .. म्हणजे एक सेकंद विचार करा ‘स्वर्ग ‘ हा शब्द मनात बोला आणि डोळे मिटा .. तुमच्या डोळ्यांसमोर तुम्ही जी माहिती तुमच्या मनाला दिलेली आहे त्यावरून तुमच्या विचारातून तुम्ही स्वर्ग पाहू शकता
जसे कि आपण लहान पणा पासून स्वर्गात देव राहतात असे ऐकले आहे , टी व्ही . सीरिअल्स मध्ये पहिले आहे कि स्वर्गात अप्सरा असतात , मोर असतात , दुधाच्या नद्या असतात .. फळ फुलांनी डवरलेली झाडे असतात .. तर अशाच पद्धतीचा स्वर्ग प्रत्येकाने आपल्या मनातल्या विचारांनी पाहिला असेल .. बरोबर ?
पण जर एखाद्या नुकत्याच जन्मलेल्या मुलाला किंवा अजाणत्या वयात असलेल्या बालकाला आपण जर सांगितले कि स्वर्ग या विषयावर विचार कर तर त्याच्या डोळ्यांसमोर स्वर्ग येईल का ?
तर उत्तर आहे नाही .. कारण ती माहिती त्याने अजून त्याच्या मनाला दिलेली नाहीये म्हणजे मला हेच सांगायचं आहे .. कि मनात उत्पन्न होणारे विचार मग ते पॉझिटिव्ह असो किंवा निगेटिव्ह हे आपण दिलेल्या माहिती वरून येतात ..
पॉझिटिव्ह थिंकिंग नक्कीच चांगली असते ह्यात काही दुमत नाही ..त्याचे फायदे नक्कीच आहेत जसे कि

१. स्ट्रेस मॅनेजमेंट : शारीरिक थकव्यापेक्षा वैचारिक थकवा माणसाची एनर्जी श्रींक करत असते .. आणि हा वैचारिक थकवा म्हणजेच स्ट्रेस असतो .. जर मनात पॉझिटिव्ह विचार असतील तर ,मनाला कधीच थकवा येत नाही आणि पर्यायाने शारीरिक थकवा जाणवत सुद्धा नाही . आणि मग आपल्या आजूबाजूला असलेल्या लोकांना सुद्धा आपण हि पॉझिटिव्ह एनर्जी पास करत असतो . सकाळ सकाळी ऑफिसला आल्यावर हसून " गुड मॉर्निंग म्हटलं " तर बघा आपली आणि समोरच्याची पण मॉर्निंग गुड होऊन जाते ..

२. अचूकता : मनात काही टेन्शन नसेल , निगेटिव्ह थॉट्स नसतील तर नक्कीच तुम्ही तुमच्या कामात लक्ष देऊन काम करता आणि मग त्यात चुका होत नाहीत किंवा होण्याच्या शक्यता कमी होतात. म्हणजेच तुमची कार्यक्षमता आपोआप वाढत जाते.

3. रिलेशन मॅनेजमेंट ( नाती सुधारतील ): जर तुमच्या मनात पॉझिटिव्ह विचार असतील तर आपोआपच तुमचे इंटर पर्सनल रिलेशन सुधारतील .सुधारले नाहीत तरी निदान बिघडणार तरी नाहीत .. आजच्या जमान्यात नाती सांभाळणे हे सर्वात कठीण काम आहे पर्सनल किंवा प्रोफेशनल रिलेशन .. किती लवकर डिवोर्स होतायत , ब्रेक अप्स होतात याचे एक कारण म्हणजे मनात पॉझिटिव्ह थॉट्स नसतात . समोरच्याला समजूनच घ्यायचे नसते .. फक्त मीच एक शहाणा , बरोबर आणि समोरचाच चूक आहे असा विचार केल्यावर कोणतेही रिलेशन लॉन्ग टर्म साठी टिकू शकत नाही.

खर सांगू का भविष्यात कोणती गोष्ट घडणार आहे हे आपल्याला माहित नसते म्हणूनच त्याला भविष्य काळ बोलले जाते .. प्रत्येक वेळी एक नवीन बॉल येत असतो .. मागच्या बॉल ला सिक्स मारता नाही आला तर ठीक आहे पुढच्या बॉल चा विचार केला पाहिजे नाहीतर पुढच्या बॉल ला बोल्ड होऊ शक तो .. त्यामुळे आनेवाले पल जाने वाला है .. हो सके तो उसमे जिन्दगी मिटालो पल जो ये जाने वाला है ... हा विचार मनात रुळला पाहिजे .. अर्धा ग्लास पाणी असेलल्या ग्लासला बघून अर्धा ग्लास रिकामा आहे असे न बोलता अर्धा ग्लास पाणी भरलेलं आहे ह्याकडे लक्ष दिले पाहिजे .. कारण तहान भागण्यासाठी एक घोट पाणी पुरेसे आहे .. आपण नेहमी आपल्याकडे काय नाहीये याचा विचार करतो .. आपल्या कडे काय आहे आहे याचा विचार करत नाही .. एम उद्दिष्ठ नक्की असली पाहिजे .. उद्दिष्ट जीवन जगायला दिशा देते .. मार्ग मिळतो .. आणि मग प्रगती होते ..
मी सुरुवातीला बोलल्या प्रमाणे मनातल्या विचारांना आपण थांबवू शकत नाही .. काही गोष्टी जशा चांगल्या घडतात ताशा वाईटही घडत असतात आणि त्याचा परिणाम आपल्या मानसिकतेवर पडत असतो .. दुःख सगळ्यांनाच येत असतात त्याला कुरवाळत बसू नये .. ‘ हे हि दिवस जातील ‘.. हे वाक्य लक्षात ठेवा .. वाईट दिवस गेल्यावर चांगले दिवस येणारच असतात .. कष्ट करायला घाबरु नये आणि कष्ट करताना थकू नये .. कष्ठाचे फळ हे नक्की मिळते .. कितीही दूरचा प्रवास असेल तरी जर कासवाच्या गतीने का होईना पुढे सतत चालू राहिले तर जीवनाच्या स्पर्धेमध्ये टिकून राहू शकतो
मुळात अपयश हि यशाची पहिली पायरी आहे हेच आपण विसरून जातो .. पहिल्याच वेळी स्पर्धा जिंकावी असे थोडीच म्हटले आहे .. जिंकणे महत्वाचे आहे .. आणि हरल्याशिवाय जिंकता येत नाही ..
हार आणि जीत हि थोड्या फार प्रमाणात लक वर सुद्धा अवलंबून असते .. आणि हे लक येते पॉझिटिव्ह एनर्जी मधून .. म्हणून जर कोणी परीक्षेला जात असेल तर आपण त्याला’ गुड लक ‘म्हणून विश करतो .. हे गुड विश करणे म्हणजेच आपली पॉझिटिव्ह एनर्जी पास करणे ..
आपण बऱ्याचदा म्हणतो ना कि वातावरणाचा प्रभाव आपल्या विचारांवर पडतो .. तसेच आहे हे .. जसे कि घरात मंत्र , स्तोत्र , पूजा पाठ केल्याने घरात एक प्रकारची पॅझिटिव्ह एनर्जी तयार होते म्हणजे काय होते .. तर मनातले निगेटिव्ह विचार निघून जातात .. जसे कि एखाद्या बादलीत खराब पाणी असेल तर त्यात आपण स्वच्छ पाणी टाकत राहिलो आणि ती बादली थोडी वाहून गेली कि बादलीत खराब पाणी राहत नाही .. चांगल्या पाण्याने खराब पाण्याची जागा घेतली आहे .. असेच मनाचे आहे .. पॉझिटिव्ह विचार मनात आले तर मनातील येणाऱ्या निगेटिव्ह विचारांना जागाच रहात नाही ..
आता हे सगळे बोलायला सोप्पे आहे हो .. पण येतात मनात निगेटिव्ह विचार त्याला करायचं काय ? राग येतो , भीती वाटते , कोणाला तरी बदडून काढावेसे वाटते .. हे सगळे अतिशय नार्मल आहे .. आपण सगळे सांसारिक लोक आहोत , राग रुसवा , चिडचिड होणे हे सगळे जिवंत पणाचे लक्षण आहे .. चुका होतात आपण काही रोबोट्स नाहीये .. बटण दाबले कि काम करायला . आपल्याला मूड असणारच .. मग ते घरचे काम असो किंवा ऑफिसमधले .. पण मग हे सगळे थांबवायचं कसे .. किंवा निदान कमी तरी कसे करायचं कसे ?
तर माझे असे म्हणणे आहे कि
सर्व प्रॉब्लेमच सुरुवात हि अहंकारामुळे सुरु होते .. मी कोणीतरी आहे .. हि जी भावना आहे ना ती कुठेतरी दुसऱ्याला कमी लेखायला सुरुवात करते आणि मग एकेमेकांनां पॉझिटिव्ह एनर्जी च्या ऐवजी निगेटिव्ह एनर्जी पास होऊ लागते ... त्यापेक्षा समोरील व्यक्ती हि माझ्या सारखीच आहे असा विचार केला तर कोणाचा राग येणारच नाही .. मला ज्या गोष्टींचा राग येतो तसाच त्यालाही त्याच गोष्टींमुळे राग येईल .. माझे मन जर कोणी असे बोलल्यावर दुखेल तर मी त्याला असे बोलल्यावर तो हि दुखेल इतके सोप्पे गणित आहे .. पण आपण दुसऱ्याचा नंतर आधी स्वतःचा विचार करतो आणि म्हणून निगेटिव्हिटी पसरते
बाकी थोडे फार उपाय आहेत कि ज्याने आपण आपले मन डायव्हर्ट करून निगेटिव्ह थॉट्स थांबवू शकतो
एक म्हणजे दिल तो बच्चा है जी .. वयाने कितीही मोठे झाले तरी मन हे तरुण ठेवले पाहिजे .लहानपणी ज्या गोष्टीत आनंद मिळायचा तो आनंद पुन्हा मिळवायचा प्रयत्न कले पाहिजे .. सकाळी ऑफिसला जायच्या वेळी जर धो धो पाऊस पडत असेल तर सहसा आपण वैतागतो पण हाच पाऊस शाळेत जाताना पडायचा तेव्हा किती छान वाटायचं .. डोक्यावर असलेली छत्री बाजूला करून पाऊसाचे थेम्ब अंगावर घेऊन घेऊन आनंदाने उद्या मारायचो .. आता अशा उड्या जरी नाही मारल्या तरी मनापसून पाऊसाचा आनंद नक्कीच घेऊ शकतो .. नजर नहीं नजरिया बदलके देखो जनाब !!
पॉझिटिव्ह एनर्जीचा एक मुख्य ऊर्जा स्रोत .. निरागस , लहान मुले आहेत .. घरी , आजू बाजूला इतकी निरागस मुलं असतात .. थोडासा वेळ त्यांच्या बरोबर घालवून तर बघा .. आयुष्यातली मोठं मोठी दुःख टिचकी वाजवल्या सारखी गायब होतील .. त्यांच्या निरागस बोलण्यात , हसण्यात , खेळण्यात वेगळीच ऊर्जा असते .. ती घेण्याचा प्रयत्न करु शकतो..
एखादा छंद जोपासा वा .. आपल्या नेहमीच्या कामा बाहेर जाऊन जर आपण काही वेगळे काम केले ना कि किती आनंद मिळतो .. म्हणून तर म्हंटले आहे "कामात बदल हीच विश्रांती .. एखादे छान से पेंटिंग , एखादा आपल्याच मोबाईल मधून संनसेट चा फोटो.. एखादे छान से पुस्तक , एखादि भटकंती , लिहा , वाचा ,गाणी ऐका खूप काही करण्यासारखे आहे .. जे आपल्याला आवडते ते करा ..काहीच नाही झाले तर अंगावर घेऊन झोप काढा.. मग बघा मनात आपोआप चांगले विचार येतील .. आणि काम करायला शक्ती आणि प्रेरणा देतील ..

मेडिटेशन : ध्यान योग अतिशय उपयुक्त आहे आणि प्रत्येकाने ते करावेच .. पीस ऑफ माईंड जर हवे असेल तर मनाला जर आपल्या कंट्रोल मध्ये ठेवायचे असेल .. मनाला सुद्धा चांगले विचार करा यची शिस्त लावावी लागते .. आणि ती शिस्त फक्त आणि फक्त मेडिटेशन मुळे लागते .. आणि आरोग्यही सुधारते .. म्हणजे दुहेरी फायदे आहेत याचे ..
दासबोधामध्ये श्री समर्थ रामदास स्वामींनी म्हंटले आहे कि नामस्मरणात अद्भुत शक्ती आहे .... मग देव कोणताही असो , तुम्ही मानता ती सुपर पॉवर ,शक्ती तिचे मनातल्या मनात नामस्मरण केल्याने मनातले निगेटिव्ह विचार निघून जातात .. जर मन दुखी झाले असेल .. किंवा निगेटिव्ह विचार जास्त येत असतील तर सरळ सरळ आपल्या आवडत्या भगवंताचे नामस्मरण करायला सुरुवात करायची .. त्यामुळे भक्ती तर भक्ती पण फार काही नाही माईंड डायव्हर्ट होते .. आणि एकदा का मन दुःख विसरले कि मग आनंदच असतो सगळीकडे .. याला हिलींग म्हणतात .. असे म्हणतात राग आला कि १० पर्यंत आकडे मोजा मग राग निघून जातो .. यात काय लॉजिक आहे .. तर मन डायव्हर्ट होते .. झोप येत नसेल तर उलटे पाढे म्हणायचे म्हणजे १००, ९९, ९८ , करून बघा ,, दुसया दिवशी सकाळी एकदम फ्रेश उठायला होईल .. लॉजिक तेच .. माईंड डायव्हर्ट करायचे ..
कितीही मोठा प्रॉब्लेम आला तरी ऑल इज वेल एकदा बोलायचे .. थोडा वेळ शांत बसायचं .. एक घोट स्वच्छ पाणी प्यायचं आणि पुन्हा कामाला लागायचं .. अशी शिस्त मनाला लावली कि मनात पॉझिटिव्ह विचार येतील आणि निगेटिव्ह विचार आले तरी त्यांना जमेल तसे पिटाळून लावायचं .. मन कसे वाहत्या पाण्यासारखं खळखळ वाहणारं हवं .. निगेटिव्ह थॉट्स मनात येत असतील आणि ते आतमध्ये दाबून ठेवले तर तर पाणी साचल्यावर त्याचे जसे डबके होयला वेळ लागत नाही तसेच मनात काही साचून न ठेवता त्याला बोलून मोकळे केले ना कि नात्या मध्ये (प्रोफेशन असो किंवा पर्सनल ) पारदर्शकता येते आणि ते नाते पॉसिटीव्ह एनर्जीचा स्रोत बनते .