दृष्टिकोन

Inspirational story of positive Attitude. New trends to earn money online.

 दृष्टीकोन 

© प्रतिक्षा माजगावकर 

(सदर कथा काल्पनिक असली तरी खास तुम्हा वाचक वर्गासाठी कदाचित नवीन संधी निर्माण करू शकेल.... स्वतःची ओळख निर्माण करण्यासाठी नोकरी पेक्षा ही बऱ्याच गोष्टी असतात याचं एक उदाहरण.....)
    
      किमयच्या घरी आज youtube च सिल्वर बटण येत! चक्क दीड वर्षाच्या कालावधीत तिच्या youtube चॅनेलचे एक लाख subscribers झाले होते! त्यामुळेच आज घरात छान उत्साहाचं वातावरण होतं! ती एक youtuber म्हणण्यापेक्षा booktuber होती! 'वाचाल तर वाचाल' या चॅनेल वर ती दर मंगळवारी आणि गुरुवारी बुक review द्यायची आणि यामुळे बऱ्याच लोकांना वाचनाची आवड निर्माण झाली होती! रविवारी खास छोट्या दोस्तांसाठी गोष्ट सांगण्याचा कार्यक्रम असायचा.... पण, आता प्रश्न असा आहे या सगळ्याची सुरुवात झाली कशी? 
          किमया..... पोस्ट ग्रॅज्युएट झालेली, जिद्दी, महत्वकांक्षी आणि नेहमी सगळ्या परीक्षांमध्ये पहिली येणारी एक हुशार आणि जिज्ञासू मुलगी! वाणिज्य शाखेतून पूर्ण केलेलं शिक्षण, स्वभावातला हजरजबाबीपणा, एकत्र कुटुंब पद्धती त्यामुळे मिळून मिसळून सगळ्यांना समजून घेत काम करण्याची वृत्ती! घरात आई - बाबा, दोन लहान काका - काकू, त्यांची एक एक मुलं, आजी - आजोबा, असा सगळा गोतावळा.. किमया भावंडांमध्ये मोठी! म्हणूनच  अगदी गुणी आणि समजूतदार! अगदी खूप गोतावळा नाही पण जीवाला जीव देणारे मोजके मित्र मैत्रिणी.... कसलीही कमी नाही की घरातून कसला दबाव नाही..... सगळ्यात स्वातंत्र्य पण संस्कारही तितक्याच कडक शिस्तीचे! एकंदरीत किमया म्हणजे तिच्या सगळ्या मित्र मैत्रिणींसाठी एक सर्वगुणसंपन्न असलेली एक मुलगी! नेहमी हसतमुख सगळ्या समस्यांवर तोडगा तयार असणारी, कसलीच भीती न बाळगता स्पष्ट वक्ती असणारी पण समोरच्याला न दुखावता समजावून सांगणारी एक गोड मुलगी! 
       शिक्षण झाल्यावर किमया आणि तिची मैत्रीण रुची दोघी interview साठी गेल्या होत्या. बऱ्याच ठिकाणी interview झाले, पण मनासारखं काम काही मिळेना! एवढं शिकून जर कॉल सेंटर मध्ये काम करायचं तर फक्त १२ वी करून लगेच नसत का केलं? असाच विचार किमया आणि रुची करत होत्या. रुचीला तिच्या वडिलांच्या ओळखीने accountat चा जॉब मिळाला पण अजून ४ महिने झाले तरी किमया घरीच होती! किमयाला सोडून रुचीला सुद्धा कामाला जाण्यात काही रस नव्हता पण किमया ने घातलेली मैत्रीची शपथ आणि हट्ट या पुढे रुची च काही चाललं नाही. "मला सुद्धा मिळेल गं कुठेतरी जॉब! तू ही संधी सोडू नकोस!" असं सांगून तिने रुची ला मनवलं होतं! किमयला वाचनाची फार आवड! भरपूर पुस्तकं ती वाचायची.... एकदा पुस्तक हातात घेतलं कि ते संपवल्याशिवाय हातातून खाली ठेवायची नाही! Online पुस्तकं सुद्धा ही वाचायची.... त्या पुस्तकाचे reviews वाचून अंदाज घ्यायची आणि यातूनच तिला कल्पना सुचली booktubing ची! 
         लगेच ती कामाला लागली.... घरात कोणालाही काही माहित नव्हतं! किमया च्या मनाने ज्या प्रमाणे एक रूपरेखा आखली होती अगदी त्या प्रमाणे तिचा पहिला व्हिडीओ सात दिवसाच्या परिश्रमाने तयार झाला.... रात्री सगळ्यांची जेवणं आटोपल्यावर किमया ने विषय काढला....
किमया:- ऐका ऐका... आज तुमच्या लाडक्या किमया कडे तुम्हाला द्यायला एक छान Surprise आहे... लवकर सगळे माझ्या खोलीत चला..... 
वसू (किमयाची आई):- अगं मधेच कसली गडबड करतेस... नीट सांग कि, काय आहे... 
किमया:- बरं ठीक आहे पण तुला एकटीला कानात सांगते..... 
असं म्हणून किमया आईच्या कानात नाही असं ओरडते.... वसू सुद्धा मायेने तिचा कान धरते....
वसू:- आईच्या कानात ओरडतेस... 
किमया:- आ sss.... आई दुखतंय सोड ना... सॉरी सॉरी... चल ना आता खोलीत....  
सगळे किमया च्या खोलीत येतात.... तिने सगळी तयारी करून ठेवलेली असते.... 
किमया:- तो! दिल थाम के बैठीये.... शुरु होने जा रहा है....... किमया कि किमया का शो.... 
असं म्हणून व्हिडिओ स्टार्ट करते.... पहिल्यांदा तिच्या youtube चॅनेल च नाव लिहून येतं.... "वाचाल तर वाचाल" आणि व्हिडिओ सुरु होतो... थोडं animation वापरून, थोडं स्वतः काही हाव भाव करून छान सा व्हिडिओ किमया ने शूट केलेला असतो! प्रसिद्ध कादंबरी 'ययाती' चा बुक review तिने शूट केलेला असतो.... अवघ्या पंधरा मिनिटाच्या व्हिडिओत तिने अगदी उत्तम रित्या कादंबरीला न्याय दिलेला असतो! व्हिडिओ बघून सगळे थक्क होतात.... वाटतच नसतं हा या मुलीचा पहिलाच व्हिडिओ आहे! टाळ्यांच्या कडकडाटात सगळे तिला शाबासकी देतात.... 
        किमया:- थँक्यू! थँक्यू! हा व्हिडिओ बनवण्या मागचं कारण म्हणजे मी youtube चॅनेल सुरु करायचा विचार केलाय... दर मंगळवार आणि गुरुवार पुस्तकाचा review देणार आणि रविवारी खास आपल्या छोट्या दोस्तांसाठी गोष्ट सांगण्याचा कार्यक्रम असणार... बरं ते सगळं नंतर डिटेल मध्ये सांगते पण आधी सांगा सगळ्यांना आवडला हा व्हिडिओ? करूया का मग youtube वर अपलोड? 
दिलीप (किमया चे काका):- हो! एकदम झकास झालाय बघ व्हिडिओ! कर कर लवकर अपलोड कर.... 
सगळे जण फार खुश असतात... अखेर किमया चा पहिला व्हिडिओ अपलोड होतो.... सगळे आपापल्या प्रिय जनांना लिंक सेंड करतात.... 
विश्वास (किमया चे बाबा):- किमया बाळा हे तू कधी शिकलीस?
किमया:- अहो बाबा! मी गेले चार महिने घरातच तर आहे... घरातली सगळी कामं आई आणि काकू करायच्या माझ्या कडे वेळ होता... मी youtube वरूनच व्हिडिओ एडिटिंग शिकले.... माझी आवड म्हणजे पुस्तक वाचणे मग ठरवलं आपण booktuber व्हायचं! यात करियर करायला थोडा वेळ जाईल पण यात मी कधीच दमणार नाही! शिवाय मला लोकांच्या मनात वाचनाची आवड निर्माण करता येईल. या हेतूने च मी हे सुरु केलं, आणि म्हणूनच माझ्या चॅनेल च नाव; 'वाचाल तर वाचाल'.... 
नीलम (किमयाची काकी):- वा! मस्त कल्पना आहे तुझी.... या निमित्ताने लहान मुलांमध्ये सुद्धा वाचनाची आवड निर्माण होईल.
किमया:- हो! म्हणूनच हा सगळा खटाटोप.... मनापासून वाचणारे आजकाल फार कमी राहिलेत... अगदी आपले वंश आणि निकिता (किमयाची चुलत भावंडे) सुद्धा नीट वाचत नाहीत! म्हणूनच मला याची गरज वाटली आणि हि कल्पना सुद्धा सुचली.... 
          सगळ्यांनी तिचं कौतुक केलं.... आठवडाभरात १०० subscribers झाले सुद्धा... views, likes सुद्धा छान येत होते... रविवारच्या स्पेशल व्हिडिओ मुळे तिचा ऑडिअन्स ग्रुप अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत विस्तारलेला होता.... असाच दोन महिन्यांचा काळ गेला.... किमयाने youtube चॅनेल बरोबरच affiliate marketing सुद्धा सुरु केलं होतं! ती ज्या पुस्तका बद्दल बोलायची त्याची खरेदी करण्याची लिंक ती सोबत देत होती त्यामुळे पुस्तक विकलं गेलं की तिला कमिशन मिळत होत! 
सुरुवातीला आजू बाजूचे लोक म्हणायचे हे काय करतेस त्या पेक्षा छान जॉब कर... यात करियर नाही होऊ शकत तुझं.. ती फक्त तुझी आवड आहे... पण, किमयाने या कडे दुर्लक्ष करून स्वतःचं काम सुरु ठेवलं होतं.... काही काळानंतर youtube मधून पण पैसे मिळू लागले.... शे - हजरांवरून कधी मिळकतीची रक्कम लाखात पोहोचली कळलं नाही.... हळूहळू आजू बाजूच्यांना सुद्धा कळून चुकलं... ते सुद्धा तिला प्रोत्साहन देऊ लागले... थोडा काळ गेला आणि जगावर अचानक कोरोना च संकट आलं! सगळीकडे लॉकडाऊन झालं... बऱ्याच जणांच्या नोकरीवर गदा आली... काहींना पगार मिळाले नाहीत.... पण, या काळात किमयच्या चॅनेल ने फार मोठी भरारी घेतली... बऱ्याच जणांचा पुस्तकं वाचण्याकडे कल झुकू लागला.... किमयाने सुद्धा या काळात फ्री मध्ये online वाचता येतील अश्या पुस्तकांबद्दल बोलायला सुरुवात केली... त्याच्या लिंक्स दिल्या, जे ब्लॉग तिला मनापासून आवडले होते त्या बद्दल बोलली आणि लिंक्स दिल्या... लहान मुलांसाठी आता बुधवार आणि रविवार गोष्ट सांगण्यासाठी ठेवले... मोठ्या कल्पकतेने सगळी आखणी केल्यामुळे 'वाचाल तर वाचाल' चॅनेल उंच उंच भरारी घेत होतं! शिवाय किमयाने शेअर केलेल्या लिंक्स मुळे इतर मोफत पुस्तकं सुद्धा मोठ्या प्रमाणात डाउनलोड होत होती आणि ब्लॉगर्स ना सुद्धा भरपूर views मिळत होते... किमयामुळे आज विन - विन सिच्युअशन झाली होती... किमयाचं चॅनेल सुद्धा ग्रो करत होतं आणि इतर लेखकांना सुद्धा प्रोत्साहन मिळत होतं! 
          त्यात घरी आलेल्या youtube च्या सिल्वर बटनाने सगळे किमयाची पाठ थोपटत होते.... जे बोलत होते यात करियर करता येणार नाही ते सुद्धा आज शांतपणे सगळं पाहत होते.... फक्त वाचनाची आवड आणि एक छोटासा हेतू; सगळ्यांना वाचनाची आवड लागावी... यातून निर्माण झालेलं हे सगळं किमयाचं विश्व... एक दुसरं कुटुंबं... किमायाने आज खरंच एक किमया करून दाखवली होती... इतरांपेक्षा काहीतरी वेगळं करून स्वतःचा एक आदर्श घालून दिला होता... आजच्या शतकात अगदी घर बसल्या डिजिटली कमावण्याचा एक मार्ग दाखवला! फक्त गरज आहे ती चिकाटी, परिश्रम, संयम आणि वेगळ्या दृष्टिकोनाची!