Oct 16, 2021
सामाजिक

पॉर्न बघणे चांगले की वाईट

Read Later
पॉर्न बघणे चांगले की वाईट
ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
   पॉर्न हवं की नको ? 

       मी ज्या विषयावर बोलायचं ठरवलं मुळात तो विषय खूप संवेदनशील आहे . जसे की एका नाण्याच्या दोन बाजू असतात तसच काहीस ह्या विषयावरही तुमचं मत हो नाही असू शकते माझं  वैक्तिक मत मी मांडत आहे .

अनुभवाखातर काही घटनांची केस स्टडी केल्यास असं निदर्शनास येते की 

➡  एका 21 वर्षयाच्या मुलाने पॉर्न बघून 9वर्षीय बालिकेवर अत्याचार केला . 

      ( वर्तमानपत्रातील सत्य घटना ) 

➡ 1) भारतात आजही असे काही पब्लिक प्लेस आहेत जसे  उदा. रेल्वे स्टेशन 

     जिथे स्वतंत्र वेटिंगरूम्स नाही त्यात प्रामुख्याने ( सेवाग्राम स्टेशन ) एकाच जनरल वेटिंगरूम मध्ये लेडीज आणि जेन्ट्स वॉशरूम आहेत . बहुदा तिथे लेडीज जातात की नाही मला माहिती नाही तिथे जेन्ट्सच बसलेले दिसतात . एखाद्या स्त्रीने तिथून परत येताना बसलेलं पुरुष मंडळी सारखे डोळे वटाळून बघत असतात .  त्यात पन्नाशी ओलांडलेल्या पुरुषाचाही सहभाग असतो  . तेव्हा वाटतं ह्याच्या घरात महिला नसाव्यात का ? अश्या ठिकाणी पुरुषाने थांबू नये हे कसं कळतं नाही थांबणं ठीक आहे पण मग समोरून जाणाऱ्या स्त्रीकडे बघत राहणं कितपत योग्य आहे ??
???? वरील अनुभव स्वतःचा आहे . 

2) एकटी स्त्री ते स्टेशन असो की ट्रेन मंदिर पब्लिक प्लेस तिच्याकडे वाईट नजरेने बघणं तिला त्रास होईल अशी वर्तवणूक करणं हे हल्ली चालतच गर्दीचा फायदा घेऊन तिच्या शरीराशी लंगट साधनं हे ही सर्व खुलेआम घडतं  ह्याचा 
त्रास फक्त त्या स्त्रीलाच होतो . बस्स सहलेती है  वो , इसके खिलाफ आवाजभी नही उठा सकती ! आवाज उठाये तो इज्जत उसकीही निलाम होती है ये समाज मैं ! ( कशाचा परिणाम आहे हा ? ) 

काही बाबी लक्षात घेता मी तुमच्यासमोर मांडू इच्छिते पटतंय का बघा ! 

???? आपण ज्या सेक्स एज्युकेशनचा विचार करतो आहे ते आधीच्या काळातही नव्हतं . तरी उत्पत्ती होणं थांबलं का ? नाही ना ! जी शरीराची गरज आहे तिथे शिकवण्याची  मुळात गरज नसते  .  मानवप्राणी गुहेत राहत होता पँलिओलिथिक कालखंडापासून हे चालत आलं . 
  अगदी करेक्ट ओळखलंत .... क्रो मॅग्नेन माणसापासून उत्क्रांतीच्या टप्प्यावर होमो सेपियन झाल्यानंतर आजही ती क्रिया नैसर्गिक आहे . 

????  हो ती क्रिया नैसर्गिक आहे पण आपण पॉर्न बघून त्या क्रियेला बेधडक आणि अमानवी क्रियेत रूपांतरित करीत आहोत .  पॉर्न मध्ये स्त्री जातीला काहीही रिस्पेक्ट नसते एका अर्थाने उथळ भावनेचा विद्रुपी खळखळाट असतो .  खरचं नैसर्गिकरित्या अशा प्रकारे सेक्स घडून येऊ शकतो का ? की स्त्रीचा एक टाकाऊ फक्त शरीर सबंधासाठी म्हणून नुसता तेवढ्या पुरता वापरच केल्या जातो . उपभोग्य वस्तू समजून ?? त्यात भावना नसतातच असतो तो अमानवीपणा जो तुमच्या वैक्तिक जगा पेक्षा कितीतरी पटीने भिन्न आहे त्या जगात तुम्ही डोकावून पहायचा प्रयत्न करता . 

???? 90% ज्या मुलांकडे मोबाईल अँड्रॉइड आहेत ते ह्या गोष्टीकडे वळतातच . हे असं वय असतं ज्या वयात मुलांना आपल्या मानसिक आणि शारीरिक वाढीकडे लक्ष द्यायला हवं , पण या पॉर्न मुळे मुलं आपला अमूल्य वेळ गमावतात . 
व पॉर्न मध्ये नाती जपली जात नाहीत , तुम्ही जर टायटल बघितलं तर  तुम्हाला लक्षात येईल . ते इतकेच खालच्या पातळीवर नेऊन तुम्हालाही सोडतात . मुलंही तसाच विचार करायला लागतात . आणि त्यातून हवस निरामन होते ती वृत्तीच वाईट भावनांना उतेजीत करते . आणि तरुण मग कुणालाच सोडत नाहीत . कुठून मिळेल त्यांना योग्य शिक्षण ? आणि तुम्ही ज्या शिक्षणाबद्दल बोलतं आहात ते हेच शिक्षण आहे का ? 

???? मुलांचा जो नैसर्गिकपणा असतो , जो बालिशपणा असतो तो कुठे तरी हरवतो नष्ट होतो आक्रमकता वाढते आणि बालगुन्हेगारी सारख्या घटना मोठ्या प्रमाणात घडतात . समय के साथ साथ हर बाते समझ मे आजाती है ! 
इसलीये अपना वर्तमान क्यू बरबाद कर रहे हो ? 

???? जी मुलं पॉर्न बघतात सकाळी उशिरा झोपून उठतात त्यांची स्मरणशक्ती कमी होत जाते . लक्ष लागत नाही . जी गोष्ट सरळ सरळ बघणं रटाळ आहे तिला पाठिंबा का ? 

???? मुलीकडे बहीण म्हणून आपल्याला बघायला सांगितल्या जाते तिथं ह्या पॉर्न मुळे आपण तिच्याकडे एकाच नजरेने बघतो . तेव्हा इतिहासही विसरतो . वयाच्या बाराव्या वर्षी स्वराज्य पक्षाची स्थापना करणारे बलात्काऱ्यांचे हात शरीरापासून वेगळे करणारे शिवबा आम्हाला कोण सांगेल ? हा प्रश्न उपस्थित होतोच . 

???? मोस्ट ऑफ पॉर्न मध्ये कल्पनांचा भांडीमार वेगवेगळ्या कल्पनांनी रंगवलेला असतो . ज्या कल्पना शक्य नसतात . ती जनावरी वृत्ती माणसात यावी आणि श्रुंगारच नष्ट होऊन बायकोवरही नवऱ्याने तिच्या मर्जीपलीकडे जाऊन बलात्कार करावा असं होईल . 

( केस स्टडी मध्ये  * असं होतं महिला हायकोर्टकडे धाव घेतात पॉर्न साईट बंद कराव्या म्हणून . ) 

???? तुम्हाला तुमची मुलं अशी वाईट बनलेली आवडतील काय ? जर हे सर्व आम्ही आमच्या मुलांना सांगू शकत नाही किंवा मुलं म्हणतील पॉर्न बघितल्या शिवाय होत नाही आईवडीलांना आम्ही ह्या विषयावर काही विचारू शकत नाही आणि तो एकमेव मार्ग आहे आम्हाला . तर हे चुकीचं आहे ह्या विषयावरही 
काही लेखकांनी लिहिलेली पुस्तक आहेत ... ( सिमोन ग्रोव्हर ह्या लेखिकेचे द सेकंड सेक्स हे बुक नावाजलेलं आहे वाचावे . सर्व प्रश्नचिन्हावर लेखिकेने प्रकाश टाकला आहेत विषय अभ्यासासाठी पुस्तक  काही गैर नाही .) 

???? जी हवस ह्या वयात निर्माण व्हायला नकोच ती या पॉर्न मुळे तयार होण आणि ती गरज भागवावी म्हणून बलात्कार होतात हे नाकारता येत नाही . 

???? सेक्स एज्युकेशन पाहिजे पण मूलं अशी सैराट मार्गाने इंटरनेटच्या साह्याने बिघडू नये ह्याची पालकांनी विशेष काळजी घ्यायला पाहिजे . आणि रागावून बंधीवासात ठेऊन मुलं आमची सुजाण आहेत असं ही समजू नये . हे वय खूप हळवं आणि संवेदनशील असते तेव्हा आईची मुलीने मैत्रीण होणं आणि पित्याने मुलाचा  मित्र होणं हेच श्रेष्ठ ठरेल . 20, 25 हा तरी काळ म्याच्युअर असतो तेव्हा आपण काय वाईट बघत आहोत आणि काय चांगलं हे तरुणांनाही समजायला पाहिजे . 

???? वयात आल्यावर मुलांमध्ये होणारे बदल मुलीनं मध्ये होणारे बदल शरीराची वाढ भावनाचा अव्यस्त व्याप ह्या सर्व गोष्टींचा आढावा घेत इयत्ता दहावीतही विज्ञानात अभ्यासाला हा टॉपिक आहे . आई वडिलांना मुलांना हा विषय एकदम अचानक कसा समजवून सांगावा ह्याची भीती वाटत असेल संकोच वाटत असेल तर त्यांच्या अभ्यासाच्या पुस्तकातून हा विषय त्यांना तुम्ही चांगल्या प्रकारे समजवू शकता . इयत्ता बारावीतही बॉयलॉजी मध्ये ह्यूमन रिप्रोडकटिव्ह सिस्टम हा लेसन अभ्यासाला आहे . मुलांना वेगळं सेक्स एज्युकेशन देण्याची गरज नाही  . पण आम्ही मुलांना जवळ पुस्तक घेऊन तो विषय समजवून सांगण्यास समर्थ नसतो . आमची अशी तक्रार असते आम्हाला शाळेतच शिक्षकांनी हा लेसन शिकवला नाही . बाराव्या वर्गात बॉयलॉजी मध्ये menstruation हा टॉपिक आला आणि आम्हाला शिक्षिका होत्या शिकवायला म्हणून आम्ही सर्व मुलं वर्गाच्या बाहेर जाऊन बसलो होतो . असे ही सांगणारे असतात मग तेव्हाच आम्हाला हा टॉपिक समजत नाही .  हस्तमैथुन अवयवात बदल उचबळणाऱ्या भावना आणि त्या भावनांचा शोध घ्यायला आम्ही सुसाट होतो हे ही तेवढंच ह्या स्टेज मध्ये खर असत पण समजवून सांगणार कोणी नसत त्यामुळे एकांतात भावना उद्रेक करतात . जिथे भावनांचे दमन तिथे भावनांचा उद्रेक . 


????   वयात येणं म्हणजे नेमक काय मुलीला मासिकपाळी आली की ती वयात आली म्हणतात . पण कोणतीच आई तिला पाळी स्त्रियांना का येते पाळी येन म्हणजे नेमकं काय ? ती आता एका मुलाला जन्म द्यायला  prepared झाली आहे अस कोणतीच आई मुलीला सांगत नसते का ? हाच मोठा प्रश्न उपस्थित होतो आई आहे म्हणून संकोच की हा टॉपिक सेक्सशी लिंक आहे म्हणून . पण तीच आई आपल्या लेकीला सांगत असते घरात वडिलांना किंवा भावांना हे कळू नये . कापड कुणाला दिसू देऊ नको पॅड लपवून ठेव बस्स  इथे कळण्यामागे काय दडलं असावं ? वासना च ना ? त्रास , वेदना नाही सरळ सरळ स्वतःला शिक्षित समजणारे वासनेत गुंतवतात . पण घरातूनच 
त्या वयात मुलांमुलींना योग्य माहिती देत नाहीत . 

आम्ही मुलगा दहावीची परीक्षा उत्तीर्ण होतं नाहीतर त्याला मोबाइल लगेच घेऊन देतो का ? तर मित्रा जवळ ही मोबाइल आहे . मित्र पॉर्न बघत असेल तर आपण बघितलं तर कुठे बिघडलं मग ? त्याचीही गर्लफ्रेंड आहे आपली असली तर कुठे बिघडलं ? आणि ट्राय करायला काय जातं ? सेफटी आहेच आणि पॉर्न तर खूप जवळच साधन समजून घ्यायला  गाईड . तिथे आईबाबांना मुलं मोबाईल मध्ये काय बघतात ह्याच्याशी काही घेणं देणं नाही . तो मोबाईलवर कुणाशी बोलतो काय करतो काही घेनदेणं नाही मग आपणच ओरडायच मुलाने किंवा मुलीने अमुक अमुक ... काळ तोंड केलं . नको त्या वयात नको त्या गोष्टी . 

पॉर्न हवं की नको ? आणि कमीत कमी 21 वर्ष तरी आपण शिकतो आपलं लग्न होत नाही . मग या वयात पॉर्न बघून काय करत आहात तुम्ही ?? 

शब्द कडवे वाटत असले तरी पण सत्य आहे  . मुलांना ज्ञानेश्वरी वाचू द्या रामायण वाचू द्या कार्व्हर कळू द्या ! बुद्ध कळू द्या . कृष्ण कळू द्या ह्याच आपल्या धर्माची पुस्तक वाच अस कधी बिंबवू नका सर्व प्रकारच्या धर्माची माहिती असू द्या योग्य तेच संस्कार घडतील कारण कोणताच धर्म माणसाला वाईट शिकवण देत नाही . त्यांना मोबाईल हातात देण्यापेक्षा त्याचं किंमतीत तुम्ही पुस्तक का देत नाही ? tv चा अतिरेकी वापर होतो . ऍक्टर्स लोकांना पैसे मिळतात आपल्याला काय मिळतं फक्त मनोरंजन असं  बिनज्ञानाचं मनोरंजन काय कामाच ?? आणि पॉर्न हे  ड्रगज सारखं घातक ठरू शकत एकदाच लागलेलं व्यसन माणसाला उध्वस्त करूनच सुटतं तसं हे ही . विचार करा आपल्याला काय वाटतं ते आणि हे जे काही चालय त्यावर आळा घालण्याचा प्रयत्न करा . 
 

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
Circle Image

Komal Prakash Mankar

Student

मला वाचायला खुप आवडतं......वाचता वाचता कधी लिहायला लागले कळलचं नाही..... आयुष्यात असे काही प्रसंग घडतात जे काही गोष्टी करायला कारणीभूत ठरतात.... माझ्या लिखाणाला तशीच काहीशी गोष्ट कारणीभूत ठरली.... ती म्हणजे हॉस्टेल लाईफ ! तोच प्रवास मला इथं वर घेऊन आला......