पोहे फक्त नवऱ्यासाठीच नसतात

Pohe


घरात आज सगळेच हजर होते, आजचा दिवस म्हणजे निव्वळ आराम आणि आराम करायचा बाकी काहीच नको हे ठरवले होते ,किरण मात्र रोजच ठरवते एक आणि होते एक.

आज तिला ही सगळे आवरून आराम करायचा होता, उद्या परत ऑफिस.

ती दगदग धावपळ, घाई सुरू.
तिला ही आज आराम करायचा होता. पण हे ती दर sunday ला ठरवते आणि त्या उलट सगळे होत जाते.

प्रभात किरणचा नवरा,सासू,सासरे दिर हे ही सगळे नौकरी करत असतात,फक्त सासू त्याच घरी असतात. पण मग घरी आहे म्हणून त्या काम करत नाही असे नाही, उलट त्या ही दुप्पट कामत मदत करत असतात.

किरणच्या सासूबाईला कोणी आयते खाणे पटत नाही, मग ती मुलगी असो वा मुलगा, काहितरी कामात वाटा करावा आणि मगच हिस्सा मागावा असा त्यांचा स्वभाव .त्यांची मुलगी जरी माहेरपणाला आली ,तर तिला माहेरपणाचा आराम फक्त दोन दिवस असत.

त्या तर सरळ सांगत वहिनीला मदत केली तर माहेरपण टिकून राहते. त्यामुळे किरणला सासूबाईचा ही आधार होता. त्या सासू सारख्या तर वागत पण त्रास कधीच दिला नाही. सून म्हणून आल्या त्या दिवशीपासून त्यांनी सून नाही तर घरातील एक नवा सदस्य आहेस तू आता, जितकी इतरांची जबाबदारी ,कर्तव्य आणि हक्क तितकेच तुझे ही. हो अजून एक गोष्ट त्यांनी तिला सांगितली होती, कामात कमी पणा घ्यायचा नाही .

मग तूला हवे ते स्वातंत्र्य आहे ,त्याला कोणाची ही आडकाठी नसणार, तू साडीच घाल, किंवा हेच नको घालू हे माझे काम नाही .

किरण म्हणूनच आपल्या सासूबाईचा खूप आदर करत असत, जेव्हा आपल्याला हवे ते स्वातंत्र्य मिळत असेल,मन मिळत असेल तर थोडे झिजयला काहीच कमीपणा नसावा हे तिला सासरी आल्यावर पटले होते.?

आज सगळ्यांसाठी स्वयंपाक केल्यावर, ती आराम करायला जाणार इतक्यात नवऱ्याने हुकूम सोडला, किरण आज मस्त बटाटा टाकून पोहे कर ना, खूप इच्छा झाली.
किरण आत्ताच बाहेर आली हे पाहून ही त्याला समजले नाही की ती किती वैतागली असणार जेव्हा आपण काही फरमाहिश केल्यावर काय होत असेल. ती बेडरूम मध्ये गेली ,रागातच.

राग येणे हे बरोबर आहे आता सगळे आवरून झाल्यावर कोणाला ही परत जाऊन काही करायची वेळ आली की किती कंटाळा येतो .सासूबाई तिच्या ह्या वागण्याकडे बघत होत्या. सोबत त्या आपल्या मुलाकडे ही बघत होत्या.?
चूक कोण बरोबर कोण हे मनाशी सांधात होत्या.

तितक्यात किरण बाहेर आली, kitchen कडे गेली आणि तिने पोहे बाहेर काढले,बटाटे चिरले, कांदा चिरला, शेंगदाणे, कोथींबीर कापली, ती पोहे भिजवणार इतक्यात सासूबाई आत आल्या, आणि तिला रागवल्या ,ही कोणती वेळ आहे ग पोहे करण्याची, आताच ओटा आवरला , आत्ताच तू आराम करायला गेली आणि नवऱ्याने हुकूम सोडला आणि तो आज्ञाधारक बायको सारखा तू ही डोक्यावर घेतलास, एकदा ही मला विचारले नाहीस, अशी करू का पोहे, चल बंद कर हे आणि आता त्याला जेवण वाढ पोहे खायचेच असतील तर उद्या मीच माझ्या हाताने सगळ्यांना करून खाऊ घालते.

मुलगा बाहेर बसून आई किरणला रागावते हे पाहून म्हणाला, अग राहूदे पोहे मी जेवणच करून घेतो.☺️

इकडे सासू आणि सूनबाई गालातल्या गालात हसत होत्या?