Dec 08, 2021
General

पोह्यांचे पौष्टिक लाडू

Read Later
पोह्यांचे पौष्टिक लाडू

❤️ ईरा दिवाळी अंक 2021 ❤️

मर्यादित प्रति.. आजच बुक करा खालील फॉर्म भरून..

नमस्कार मित्र मैत्रिणींनो,

मी बनवलेली पाहुण्यांना आवडलेली रेसिपी ह्या प्रकारामध्ये खरंतर खूप कमी लेख येतात कारण आजकाल काय सगळ्याच रेसिपी youtube किंवा इतर ठिकाणी विडिओ स्वरूपात लगेच मिळतात पण त्यातल्या काही रेसिपी बऱ्याच वेळा बिघडल्याचेही समजते. मीही youtube बघून बऱ्याच रेसिपी बनवते पण कधीकधी काहीतरी नवीन स्वतः बनवलं आणि ते छानही झालं की आनंदही होतो.अशाच माझ्या काही खास थोड्या वेगळ्या कधी न ऐकलेल्या रेसिपी मी शेयर करतेय बघा आवडल्या तर नक्की बनवून बघा आणि मला प्रतिक्रिया कळवा.

आणि माझे अजून लेख आणि रेसिपी वाचण्यासाठी मला नक्की फॉलो ही करा.

आजची आपली रेसिपी खूपच सोपी आणि कमीतकमी वेळात होणारी पण मूलांसाठी खूप पौष्टिक अशी आहे

पदार्थाचे नाव- पोह्यांचे लाडू


साहित्य- १ कप पोहे, अर्धा कप किसलेलं सुकं खोबरं, १ चमचा तीळ, १ चमचा खसखस,काजू ६-७, बदाम-६-७, पिस्ता-६-७,मनुके-७-८, वेलची पूड १ छोटा चमचा,जायफळ पूड अर्धा छोटा चमचा,अर्धी वाटी सेंद्रिय गूळ, 3 चमचे साजूक तूप

कृती-
१. सर्वप्रथम पोहे(जाड किंवा पातळ कुठलेही) चाळून व निवडून घ्यावे.मग एका कढईमध्ये नुसतेच कोरडे पोहे हलकेसे कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यावे(तेल, तूप काहीही घालायची आवश्यकता नाही) व एका ताटात थंड होण्यासाठी काढून घ्यावे.

२. त्याच कढईत अर्धा कप किसलेले खोबरे घालून तेही परतून घ्यावे(बाजारातील तयार किसलेलं खोबरं वापरलं तरी चालेल).

३.त्यानंतर त्याच कढईत एक चमचा तीळ आणि एक चमचा खसखस भाजून घ्यावी.

४.त्यानंतर भाजलेले पोहे थंड झाल्यावर ते मिक्सरमधे  वाटून घ्यावे. खूप बारीक पेस्ट नको आणि खूप जडसरही नको. त्यातच भाजलेले खोबरं,तीळ, खसखस घालून पुन्हा हे मिश्रण वाटून घ्यावं.

५. तयार मिश्रण ताटात काढून त्यात वेलची पूड आणि जायफळ पूड घालावी.

६.या मिश्रणात सुका मेवा काजू, बदाम, पिस्ता यांचे पातळ काप आणि मनुके घालावे आणि सगळं मिश्रण एकत्र करून घ्यावे.

७. आता एका कढईमध्ये साजूक तूप गरम करून त्यात किसलेला सेंद्रिय गुळ घालून गूळ वितळवून घ्यावा. हे मिश्रण खूप गरम करायचं नाहीये फक्त गूळ वितळला की  लगेच तयार गूळ तुपाचे मिश्रण पोह्याच्या मिश्रणात ओतावे.

८. चमच्याच्या साहाय्याने गुळ आणि पोह्यांचे मिश्रण व्यवस्थित एकजीव करून घ्यावे आणि मिश्रण गरम गरम असताना लाडू वळून घ्यावे.

९.काजू आणि बदामचे काप घालून सजवून सर्व्ह करावे.

टीप-
१. गूळ शक्यतो सेंद्रिय वापरावा जेणेकरून लाडू छान वळले जातात.
२.सुकामेवा (ड्रायफ्रुट) तुमच्या आवडीप्रमाणे वापरू शकता.
३.लाडू मिश्रण गरम असतानाच वळावे.

❤️ ईरा दिवाळी अंक 2021 ❤️

मर्यादित प्रति.. आजच बुक करा खालील फॉर्म भरून..
ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now