काव्य

A Short Poem


झोक्यावरी,
हसणारे काव्य माझे अलवार झुलते...
तर कधी शब्दांच्या बागेमध्ये ते प्रेमाने
फुलते...


फुलता फुलता ते साऱ्या आसमंती
भावनांचा सुगंध पसरवते...
अन्
मन साऱ्यांचे तयाला क्षणात भुलते...


मग वाऱ्यावरी ते कसे आनंदी डोलते...
डोलता डोलता कसे हसुनी बोलते...


ऐकावे असे तयाचे सुमधूर "बोल" ते...
क्षणोक्षणी कुणासही हवेहवेसे वाटते... 

तर कधी दाखवते चुकलेल्याला "वाट" ते...

शब्दांत वर्णन अवघड तयाचे...
जीवनगाणेचं ते या आयुष्याचे...❤️


---हर्षदा नंदकुमार पिंपळे