कवी मनं..❤️

A Poem On Poet's Emotions..


हळवी असतात कवी मनं,
जी मनातली खदखद
कोऱ्या पानावर उतरवतात...
डोळ्यातल्या अश्रूंना
मोकळी वाट करून देतात...


हळवी असतात कवी मनं,
जी भावनांचे धागे
शब्दांमध्ये गुंफतात...
होऊ नये गुंता म्हणून
त्यांना हळुवार जपतात...


हळवी असतात कवी मनं,
जी हृदयी प्रेम जागवतात...
प्रेमाचा खरा अर्थ ती
नव्याने शिकवतात...


हळवी असतात कवी मनं,
जी शब्दांचा श्वास जाणतात...
अन् शब्दांनाच वेडा ध्यास मानतात...


हळवी असतात कवी मनं,
जी अंतरीची वेदना सहन करून
सुखाचे किनारे उभे करतात...
आनंदाची कारंजे उडवून
आयुष्यात हसरे मोरपीस फुलवतात...!!


-हर्षदा नंदकुमार पिंपळे