Jun 15, 2021
कविता

सर्वस्व

Read Later
सर्वस्व


सर्वस्व
आयुष्याला पूर्णत्व देणारा

तू सुरेख पूर्णविराम भाळी

काटेरी कुंपणावर अस्तित्वाचे

प्राजक्त फुलविणारा माळी

तू फुलविला प्रमोद

तू आळविला मालकंस

जीवनाच्या मैफिलीत

तू अर्थपूर्ण सारांश

पुष्पा प्रमोद
Circle Image

Pushpa Pramod Bonde

Householder

Likes Reading and Writing