नवरोजी

नवरोजी

नवऱ्याची तर बातचं न्यारी...

नवरा तो नवराचं असतो...

सासुसासऱ्यांचा लाडोबा तर...

मुलांचा तो सर्वस्व असतों...


म्हणतात ना 'घर की मुर्गी दाल बराबर'...

त्याप्रमाणे ते बॅटर असतं...

' तुझं माझं जमेना तुझ्या वाचून करमेना '...

असं ते मॅटर असतं...


आपली चूक त्यांच्या माथी फोडण्याचा...

तो बापडा जीव असतो...

किंमत तेव्हांच कळते त्यांची...

जेव्हा तो आपल्यात नसतो...


किंमत करा एकमेकांची...

शेवटी दोघेचं उरणार असतो...

मुलं आपापल्या संसारात...

आपणचं एकमेकांचा आधार असतो...


समजा चुकतही असेल त्याचे...

पण आपणही नेहमीचं बरोबर असतो कां?...

नेहमीच एकमेकांची उणीदुणी काढून...

संसार कधी सुखाचा होतो कां?...


म्हणूनच म्हणतात संसार दोघांचा असतो...

दोघांनीही तो सावरायचा असतो...

एकाने जरी पसरवला...

तरी दुसऱ्याने तो आवरायचा असतो.