घराचा आधारवड - बाप

बाप

 आई कुटुंबाचा प्राण तर...

बाप कुटुंबाचा पाया असतो...

मधुरसाचा तो सागर...

कां कोरडाठाक वाटतो...


बापाच्या मागे पडण्याचा...

कधीकधी जबाबदार असते आई...

तिने सुद्धा वेळोवेळी...

मुलांसमोर बापाची ही बाजू घ्यावी...


कां प्रत्येक ठिकाणी...

आईचेच गोडवे गातो...

घराचा तो आधारवड...

कां नेहमीच दुर्लक्षिला जातो...


आई म्हणजे वात्सल्य,माया...

तर बाप खंबीरतेचा महामेरू...

कुटुंबासाठी जीवापाड कष्ट करणारं...

महान मातेचं ' लहान ' लेकरू .