मुलगी

मुलगी

मुलगी जन्माला आली...

करा तिचे रे स्वागत...

तिच्या बंद मुठीमधे...

 उज्ज्वल भविष्याचे गीत...


इवल्या इवल्या पावलांनी...

 जणू लक्ष्मी घरा यावी...

जीव ओवाळून टाकावा.,.

अशी लाघवी तिची छवी...


हीच जननी उद्याची...

सासर माहेरची दीवली...

नव्या तेजस युगाची...

तप्त मशाल रे आली...


कार्य कर्तृत्वाने तिच्या...

दरवळेल आसमंत...

प्रेम त्यागाची ती मूर्ती...

घेईल आकाश कवेत...


सासर माहेरच्या किर्तीत..

मानाचा तूरा ती खोवील...

स्री शक्तिच्या रूपाने...

तुमचा उद्धार करेल...


नका करू भ्रुणहत्या...

नका घेऊ तिचा शाप...

बळी निष्पाप जीवाचा...

कुठे फेडालं हे पाप  ?