मामा नावाचं गांव

मामा

मामा म्हणजे मामा असतो...

तुमचा आमचा सेम असतो ...

आईचा तो भाऊ असतो..

तिच्या माहेरची तो शान असतो...


गरीब असो वा श्रीमंत...

सर्वांना तो हवा असतो...

भाचे ,भाच्यांसाठी तो...

जीव की प्राण असतो.,.


लग्नात नवरीच्या असो...

वा नवरदेवाच्या...

पाठीमागे तो उभा असतो...

जणू त्यांचा पाठीराखा असतो...


आई पेक्षा लहान असो वा मोठा...

 मामा तो मामाचं असतो...

हातात खाऊ ,खेळणी घेवून...

भाच्यांच्या मागे तो धावत असतो...


काय वर्णावी मामाची माया...

जणू त्या शब्दातचं आहे...

आईचे प्रतिरूप ' मा '  ' मा '

प्रणाम माझा समस्त मामा...


लग्नात पहिला आहेर मामाचा असतो...

शेवटची साडी ही माहेर/ मामाची असते...

असा हा मामा म्हणजे मामा  असतो...

तुमचा आमचा सेम असतो .