महती प्रेमाची

महती प्रेमाची

प्रेम म्हणजे काय असतं ? 

नेमक्या व्याख्येत बसवायचं नसतं..

आईवडिलांचं निस्वार्थी प्रेम..

प्रत्येकाला हवंहवंसं असतं...


प्रेमाची महती अपार..

प्रेम म्हणजे जीवनाचा आधार..

जोडीदाराच्या प्रेमाने...

अलगद उघडते हृदयाचे दार...


काय वर्णावी प्रेमाची गाथा...

आजीआजोबांचे प्रेम खरे..

जन्मापासून सुरू होऊन...

दुधावरच्या सायी प्रमाणे जपणारे...


प्रेम म्हणजे मैत्री...

नाते रक्ताच्याही पलिकडचे...

मित्रत्वाच्या नात्यांमध्ये...

रंग जणू इंद्रधनुचे...


प्रेम बहीण-भावंडांचे...

रक्षाबंधनाच्या रेशमी धाग्यांचे...

भाऊबीजेच्या ओवाळणीचे...

अन् सदैव रूसव्याफुगव्याचे..


प्रेम करा स्वतः वरती...

जपून ठेवा नातीगोती...

प्रेमानेच जग जिंकता येते...

हीच खरी प्रेमाची महती .