आयुष्याची संध्याकाळ

आयुष्याची संध्याकाळ

संपणाऱ्या आयुष्याच्या ,

पुसट चाहूलीने ,

मन ही थकले आता ,

अनामिक हुरहूरीने .


आयुष्याची लांबलचक वाट ,

पार केली आडवळणे ,

आता तृप्त मनाने ,

फक्त वाट पाहणे .


अर्ध्य देता जीवनाचे ,

ही वाट जरी सुकर झाली ,

संघर्षाच्या भाऊगर्दीत ,

स्वप्ने सारी विरून गेली .


शृंखला तोडून साऱ्या ,

अटळ जरी जाणे ,

मावळतीच्या दारात ,

जावे सुहास्य वदने .