Aug 18, 2022
कविता

जीवनाचे कटू सत्य

Read Later
जीवनाचे कटू सत्य

जमलेल्या अश्रूंना वाट मोकळी करण्यासाठी

डोळेच असावे असे नाही

कारण डोळ्यातील वाहणारे अश्रू

इतरांनाही रडवतील असा त्याचा ध्यास नाही

मात्र मनामध्ये ध्यास असला तर.....

डोळ्यांना अश्रूंचा सहारा  घ्यावाचं लागत नाही

कारण अश्रू हे आपल्या ध्यासाला कधीच

प्रत्यक्षात उतरविण्यास आधार देत नाहीत

त्यासाठी अश्रू आणि डोळ्यांना

दोघांनाही दोष देता येत नाही

कारण जीवन जगणे हा फक्त त्याचा ध्यास नाही

ध्यासाचा हव्यास आहे..

कारण त्याचा अभ्यास करावा लागत नाही


ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
Circle Image

Ojaswi Group