पर्यावरण वाचवा

पर्यावरण वाचवा

सोन्यासारखे जंगल तुम्ही सपाट केले...

आता कायले बोंबलता घेना चांगले टोले...

ग्लोबल वार्मिंगचा धोका...

सतावतो आहे मानवाले .

झाडे लावा - वृक्ष जगवा...

हाच उपाय आहे....

पर्यावरण वाचवाले.

करा ना मग सुरुवात...

आजपासूनच झाडं लावाले.

स्वतःच तर घेतला आपण....

पायावर धोंडा पाडून...

आता काऊन रडता....

असे आडून आडून.

सज्ज व्हा रात्र वैऱ्याची आहे...

आता तरी हट्ट सोडा....

आधी दहा वृक्ष लावा...

तेव्हाच एक वृक्ष तोडा.