गुन्हा

गुन्हा

चंद्रमोळी  झोपडीत  जन्मले  मी...

हा  काय  गुन्हा  झाला...

गालावरची  खळी  मात्र ...

उगाच  चिडवते  मला .


आशेचा  उत्तुंग  मनोरा...

बांधत  बांधत  पुढे  जात...

उद्याची  आस  धरुन..

जीवन  पुढे  पुढे  सरकवत...


शिशिरामधल्या  पाचोळ्याप्रमाणे...

स्वप्ने  विस्कटू  नये...

याची  काळजी  घेत...

आणि  वसंताची  वाट  पाहत ...


गालावरची  खळी  मात्र...

उगाच  मला  चिडवते...

भाग्यवंत  आहेस  तू ...

सारखं  सारखं  पुटपुटते...


होईलचं  कधी  तरी...

स्वप्ने  माझी  पूर्ण...

मृदगंधासम  सुगंधाने...

जीवन  होईल  परिपूर्ण .