खंत

खंत

आपणही तेच आहोत ,

पाहणारे चेहरेही तेच आहेत ,

बदलली आहे फक्त नजर ,

गैरसमजाच्या चक्रव्यूहात अडकलेली ....


प्रत्येकजण आपापल्या मनाचे..

संदर्भ घेतात ,

संशयाच्या राक्षसाला...

मनात थारा देतात...


अरे या समोरासमोर..

साधा संवाद एकमेकांबरोबर..

काढून टाका मनातले गढूळ विचार...

कुठवरं आंबट तोंड अन् लांबट चेहरा करून राहणार ..


इगो/अहंकाराला ठेवा बाजूला...

सहा पावलं आम्ही चालतो...

चार पावलं तुम्ही चला...

पण एकदा तरी मनातलं बोला...


एकमेकांनी एकमेकांबद्दल...

आपुलकी ,दया  , प्रेम , जिव्हाळा...

या शाश्वत भावना ठेवा...

आणि या सर्वांवर फ्री मिळणारा निस्सीम आनंद अनुभवा .