इंटरनेट

इंटरनेट

आजचे  युग

संगणकाचे युग आहे ,

जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात ,

जीवघेणी स्पर्धा आहे.


या युगात विद्यार्थ्यांनो ..

घाबरून जाऊ नका ,

हातातील ज्ञानाचा दिवा ,

सदैव तेवत ठेवा.


विविध संकेतस्थळावरुन ...

इंटरनेटद्वारे ज्ञान प्राप्त करा ,

पण ते अगदी पारखून...

योग्य तेच निवडून.


कारण इंटरनेट एक...

माहितीचा सागर आहे ,

त्यातून काय निवडायचे आहे...

ते तुम्हाला ठरवायचे आहे .