व्याख्या आयुष्याची

व्याख्या आयुष्याची

आयुष्य  म्हणजे  एक..

सुखदुःखाच्या धाग्यांनी विणलेला रुमाल असतो ,

प्रेम , त्याग , विश्वासाच्या रंगछटेचा ,

मौल्यवान खजिना असतो .

सकारात्मक भावनांची नागमोडी गुंफन ,

त्यावर अधिकचे खुलून दिसते ,

आप्तस्वकीयांच्या प्रेमाची ,

त्याला सुंदर किनार असते  .

आयुष्याचा प्रवास जरी ,

असेल आडवळणाचा ,

परस्परांच्या विश्वासावर ,

इच्छित स्थळी पोहोचण्याचा .

आयुष्यात येणारचं आहेत ,

प्रसंग सुखदुःखाचे ,

पण फिके पडू देऊ नका ,

रंग आयुष्याचे .

पेलायची हिंमत ठेवा ,

नित्य नवी आव्हाने ,

तृप्ततेचा भाव चेहऱ्यावर ठेवून ,

राहू एकमेकांशी प्रेमाने , गुण्यागोविंदाने .