दानात दान

दानात दान

मृत्यूनंतरही जगावेसे वाटते...

अवयवदान करा ,

एखाद्या गरजवंताचा आधार बनून ,

स्मृतीरुपी  उरा .

मौल्यवान हे अवयव ,

देहाबरोबर जळतील किंवा पुरतील ,

त्यांना दान केलं तर ...

तुमच्या चांगल्या स्मृती उरतील .

तुमच्या नेत्रदानाने ,

हे सुंदर जग जो बघेल ,

त्याहून  अमूल्य तुमच्या कुटुंबियांसाठी ,

दुसरं काही नसेल .

म्हणून आजचं आरोग्य विभागाकडे ,

अर्ज सादर करा .

मृत्यूनंतरही कुणाच्यातरी ,

उपयोगी पडा .

ज्यांना ज्यांना गरज ज्याची ,

ते देतील तुम्हाला दुवा ,

हाच तुमच्या कुटुंबियांचा ,

स्मृतीरुपी  ठेवा .