व्याख्या मैत्रीची

मैत्री

मैत्री म्हणजे एक ,

मखमली धागा असतो ,

निखळ प्रेमाचा तो  ,

आरसा असतो .

कारण त्यात असतो ,

विश्वासाचा ओलावा ,

जीवनाच्या वैशाख वणव्यात ,

जणू पावसाचा शिडकावा .

मैत्री म्हणजे ध्यास ,

मैत्री म्हणजे नातं ,

रक्ताच्याही पलीकडलं ,

रक्तामध्ये भिनलेलं ,

मैत्री म्हणजे श्रावणधार ,

हक्काने कान पकडून ,

चूक , उणीव दाखवणारा ,

आश्वासक आधार .

मैत्री म्हणजे निस्वार्थी प्रेम ,

हृदयाच्या सरगम मधील गाणी ,

सुखामधे तरळणारे ,

नयनांमधील पाणी .