सपन

सपन

दिसभर हनुमान चालीसाचा गजर ऐकून ,

राती सपन पडलं मले,

अन् काय चमत्कार ,

खुद्द हनुमानजीचं माह्या सपनात आले.

ह्या म्हणलं मारोतीराया ,

देवळात तर तुमच्या जात नाही बाया ,

मंग तुम्ही सपनात कां बरं आले,

कां या कलकलाटात विसरलं सारे.

चुकलंच माह्य असं ते बोलले ,

अन् जायला निघाले ,

जाता जाता मात्र एवढे ते बोलले ,

सकायीचं उठून तू हनुमान चालीसा वाचाले घे.

पण घरातचं बसून प्रार्थना कर ,

म्हण, हे सारं संकट टळू दे लवकर .